शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मोफत प्रवेशाच्या जागा १९४६, अर्जांचा आकडा गेला २९७६ वर

By atul.jaiswal | Updated: March 9, 2023 11:56 IST

बुधवार, १ मार्च रोजी आरटीई पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात होताच गत अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेल्या पालकांची अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.

अकोला : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्के जागांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळत असून, राखीव असलेल्या एकूण १९४६ जागांसाठी गुरुवार, ९ मार्चपर्यंत २९७६  पेक्षा अधिक अर्ज दाखल झाले. अर्ज करण्यासाठी असलेल्या १७ मार्च या अंतीम मुदतीपर्यंत अर्जांचा आकडा आणखी वाढणार असल्याने प्रत्यक्ष सोडतीत अनेकांचा हिरमोड होणार हे निश्चित आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठी खासगी, विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागांवर ऑनलाइन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. आर्थिक दुर्बल घटकाअंतर्गत ज्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाखांपर्यंत आहे अशा पालकांची बालके, वंचित गटांतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्व जाती-धर्मातील विकलांग बालके आरटीईअंतर्गत मोफत प्रवेशासाठी पात्र आहेत. यावर्षी जिल्ह्यातील १९० शाळांनी आरटीई पोर्टलवर नोंदणी केलेली असून, या शाळांमध्ये १९४६ जाग राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी पालकांना १ ते १७ मार्च या कालावधीत अर्ज सादर करता येणार आहेत. बुधवार, १ मार्च रोजी आरटीई पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात होताच गत अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेल्या पालकांची अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.

केजीसाठी केवळ २९ जागाजिल्ह्यातील १९० शाळांनी इयत्ता पहिलीसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. मात्र, ‘केजी’च्या वर्गांसाठी जागा आरक्षित ठेवण्याकडे बहुतांश शाळांनी पाठ केल्याचे चित्र आहे. केजी प्रवेशासाठी अकोला शहरातील केवळ दोन शाळांनी २९ जागा राखीव ठेवल्याचे आरटीई पोर्टलवर दिसते.

संकेतस्थळाची गती मंदावलीआरटीई पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पालकांची मोठी झुंबड उडत आहे. त्यामुळे आरटीई संकेतस्थळाची गती मंदावत असल्याच्या तक्रारी येत आहे. अर्ज भरताना संकेतस्थळ हँग होत असल्याने एक अर्ज भरण्यासाठी पालकांना खूप वेळ लागत आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा