शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पदवीच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीतही घसरण, तिसऱ्या यादीसाठी धाकधूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 06:49 IST

सेल्फ फायनान्सकडील कलामुळे गुणवत्ता यादीत चढ-उतार 

मुंबई : पदवी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी गुरुवारी शहरातील महाविद्यालयांनी जाहीर केली. अपेक्षेप्रमाणे दुसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये काही ठिकाणी २ ते ३ टक्क्यांची, तर काही ठिकाणी ५ ते ७ टक्क्यांची घसरण दिसून आली. सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाचे निकाल या आठवड्यात जाहीर झाले, तर पुढच्या आठवड्यात जाहीर होणाऱ्या गुणवत्ता यादीवर त्याचे प्रमाण निश्चित होणार असून ‘कट ऑफ’ पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, आता तिसऱ्या गुणवत्ता यादीतील नावासाठी प्रतीक्षा करावी की नाही, या संभ्रमात विद्यार्थीं असल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

‘कट ऑफ’ तिसऱ्या किंवा चौथ्या गुणवत्ता यादीतही वाढण्याची शक्यता आहे. पारंपरिक अभ्यासक्रमासाठी ‘कट ऑफ’ घसरला असला तरी स्वयं अर्थसहाय्यित अभ्यासक्रमाचे ‘कट ऑफ’ मात्र काही महाविद्यालयांत अद्यापही नव्वद टक्क्यांच्या वर असलेले दिसून आले. विशेष म्हणजे, काही महाविद्यालयांत तर दुसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये कॉम्प्युटर सायन्स, आयटी सारख्या अभ्यासक्रमाचे ‘कट ऑफ’ वाढलेले दिसून आले आहेत. रुपारेल महाविद्यालयात पाहिल्या गुणवत्ता यादीनंतर दुसऱ्या गुणवत्ता यादीत बीएमएस (विज्ञान ) शाखेचा, साठ्ये महाविद्यालयात बीएस्सी आयटीसाठी ‘कट ऑफ’ वाढलेला दिसून आला आहे. 

सीबीएसई, आयसीएसईसाठी किती जागा ?साठ्ये महाविद्यालयातील बीएमएस (कला ) शाखेच्या जागा दुसऱ्या यादीसाठी उपलब्ध नसल्याचे जाहीर झाले. अनेक महाविद्यालयांच्या जागा या दुसऱ्या गुणवत्ता यादीनंतर भरल्या जातात. काही स्वायत्त महाविद्यालयांनी विविध शाखांमध्ये या विद्यार्थ्यांसाठी काही जागा राखीव आहेत. मात्र, त्यामुळे सीबीएसई व  आयसीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी किमान जागा तरी उपलब्ध असतील का, हा प्रश्न आहे.

साठ्ये महाविद्यालय एफवाय बीए     ३८. १६ % एफवाय बीएस्सी     ४०. ८३ % एफवाय बीकॉम     ४२. ८% बीएस्सी आयटी     ६७% बीएमएस (आर्टस्)- जागा नाहीत बीएमएस (कॉमर्स )    ७८. ३३ % बीएमएस (सायन्स )    ४९. १६ % रुईया महाविद्यालय एफवाय बीएस्सी (सीएस)    ८२.५% एफवायबीएस्सी     ५०% एफवय बीए - (इंग्रजी )    ८७. ५% एफवाय बीए (मराठी )    ४०. १७%

रुपारेल महाविद्यालय एफवाय बीए     ८३. ६६ % एफवायबीकॉम     ७२. ५०% एवायबीएससी (आयटी )    ६४ एफवायबीससी (सीएस)    ७०. ८३% बीएमएस (आर्टस्)    ६४%बीएमएस (कॉमर्स )    ८१. ३३% बीएमएस (सायन्स )    ६०. ६६ % विल्सन महाविद्यालय एफवायबीकॉम     ८१% एवायबीएस्सी (आयटी )    ८३. ५% बीएमएस (आर्टस्)    ७३. ३३%बीएमएस (कॉमर्स )    ८६.५%