शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

इंग्रजी भाषा चाचणी; ६२ टक्के भारतीयांना उच्चारांची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 09:18 IST

अभ्यास, काम व पर्यटन व्हिसासाठी ‘पिअर्सन टेस्ट ऑफ इंग्लिश’ने केलेल्या सामाजिक धारणा सर्वेक्षणातून मिळालेली माहिती या अहवालात उघड झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : भारतात इंग्रजी भाषेची परीक्षा देणाऱ्या ६२ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना वाटते की त्यांच्या भारतीय उच्चारांचा त्यांच्या बोलण्याच्या कौशल्याच्या परीक्षेच्या निकालावर नकारात्मक परिणाम होईल, तर ७४ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना वाटते की जेव्हा ते परीक्षकांसमोर प्रत्यक्ष परीक्षेला बसतात तेव्हा त्यांच्या दिसण्याचा त्यांच्या परीक्षेतील गुणांवर परिणाम होऊ शकतो. पिअर्सनच्या सर्वेक्षण अहवालात हा दावा करण्यात आला आहे.

अभ्यास, काम व पर्यटन व्हिसासाठी ‘पिअर्सन टेस्ट ऑफ इंग्लिश’ने केलेल्या सामाजिक धारणा सर्वेक्षणातून मिळालेली माहिती या अहवालात उघड झाली आहे. परीक्षार्थ्यांच्या धारणांबद्दल, विशेषतः रंग-रूप, उच्चार आणि पोशाखाबद्दल असलेल्या पूर्वग्रहांबद्दल माहिती देताना या अहवालात केवळ विद्यार्थ्यांच्या ज्ञानावर आणि क्षमतांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या निष्पक्ष प्रणालींची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. ही माहिती १,००० जणांच्या सर्वेक्षणावर आधारित आहेत. 

तर आदराची वागणूक९६ टक्के जणांनी वैयक्तिक परीक्षकांबरोबर इंग्रजी भाषेची परीक्षा दिली होती. सर्वेक्षणानुसार, ५९ टक्के जणांना असा विश्वास आहे की त्यांच्या त्वचेच्या रंगावर आधारित त्यांना वेगळी वागणूक दिली जाईल. जवळजवळ ६४ टक्के परीक्षार्थ्यांना असे वाटले की ते ज्या पद्धतीने कपडे घालतात त्यावरून त्यांना चुकीचे गृहीत धरले जाऊ शकते. महाराष्ट्र, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशातील १० पैकी सात जणांना असे वाटते की जर त्यांच्याकडे उत्तम नोकरी असेल किंवा त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी चांगली असेल तर त्यांना अधिक आदराने वागवले जाईल.

निकालांवर परिणामसर्वेक्षणानुसार, पाचपैकी तीन (६३ टक्के) उमेदवार, विशेषतः आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमधील, असे मानतात की इंग्रजी बोलताना भारतीय उच्चार न स्वीकारल्याने त्यांच्या परीक्षेतील गुणांवर सकारात्मक परिणाम होईल. एखादी व्यक्ती बाहेरून कशी दिसते, याचाही त्याच्या निकालांवर परिणाम होतो, असे मानले जाते. पंजाबमध्ये हे सर्वात जास्त जाणवते, जिथे राज्यातील ७७ टक्के प्रतिसादकर्त्यांना वाटते की त्यांचा पोशाख त्यांच्या बोलण्याच्या चाचणीच्या निकालांवर परिणाम करू शकतो. तामिळनाडूमधील लोकांसह ३५ टक्के परीक्षार्थ्यांचा असा विश्वास आहे की, अमेरिकन उच्चार चांगले गुण मिळविण्यात योगदान देतात, तर २१ टक्के, विशेषतः उत्तर प्रदेशातील, म्हणाले की ब्रिटिश उच्चार त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतील.