लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारत सरकार दरवर्षी उच्च शिक्षणावर तब्बल ५०,०७८ कोटी रुपये खर्च करते. त्यापैकी १०,३८४ कोटी रुपये (सुमारे २०.७३ टक्के) आयआयटींसाठी राखून ठेवले आहेत. म्हणजे उच्च शिक्षणाच्या प्रत्येक पाच रुपयांपैकी एक रुपया या संस्थांसाठी! पण या ‘प्रीमियर’ संस्थांमधून तयार झालेले टॉप इंजिनिअर देशाच्या विकासासाठी नव्हे, तर परदेशातील कंपन्यांसाठी काम करतात.
हार्वर्ड बिझनेस स्कूलचे संशोधक पृथ्वीराज चौधरी यांच्यानुसार, टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जण परदेशात नोकरी वा उच्च शिक्षणासाठी जातात.
भारतात बॉन्ड मॉडेल वापरता येईलभारतामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी काही राज्यांनी आधीच ‘बॉन्ड मॉडेल’ लागू केले आहे. या धर्तीवर आयआयटींसाठीही अशी प्रणाली लागू करता येईल, अशी मागणी तज्ज्ञांकडून होत आहे.
चीन-सिंगापूरकडून शिकण्याची वेळचीनने ‘थाऊजंड टॅलेंट प्लॅन’सारखे २०० कार्यक्रम राबवून परदेशी गेलेल्या तरुणांना परत आणण्यात मोठे यश मिळवले. परतणाऱ्या तज्ज्ञांना ६० लाख ते ३.७५ कोटी रुपयांपर्यंतचे पुरस्कार, कर सवलती, उच्च पगार व स्टार्टअप निधी दिला जातो. २०२३ मध्ये एक लाखांहून अधिक युवा चीनमध्ये परतले.सिंगापूरने १९९० पासून विद्यार्थ्यांना सरकारी मदतीच्या बदल्यात ३ ते ६ वर्षे देशात कामाची बंधनकारक अट ठेवली आहे.
वार्षिक ७.६९ लाख खर्चसध्या देशात २३ आयआयटींमध्ये सुमारे १.३५ लाख विद्यार्थी शिकत आहेत. एका विद्यार्थ्यावर सरकारचा वार्षिक खर्च सुमारे ७.६९ लाख रुपये आहे. १० वर्षांपूर्वी ही त्यावेळी प्रतिविद्यार्थी खर्च सुमारे पाच लाखांच्या आसपास होता.
‘नेटवर्क’मुळे सोपे होते जाणेसंशोधनानुसार, आयआयटी विद्यार्थ्यांचे परदेशात जाण्याचे प्रमाण जास्त आहे. यामागे माजी विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे एक मजबूत ‘नेटवर्क’ कार्यरत आहे. हे नेटवर्क विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठे व कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध करून देते.
Web Summary : Despite significant government investment in IITs, a majority of top graduates pursue opportunities abroad. Experts suggest bond models, learning from China and Singapore, to retain talent within India. Strong alumni networks facilitate overseas placements, impacting national development.
Web Summary : आईआईटी में भारी सरकारी निवेश के बावजूद, अधिकांश शीर्ष स्नातक विदेश में अवसर तलाशते हैं। विशेषज्ञों ने भारत के भीतर प्रतिभा बनाए रखने के लिए बॉन्ड मॉडल, चीन और सिंगापुर से सीखने का सुझाव दिया है। मजबूत पूर्व छात्र नेटवर्क विदेशों में प्लेसमेंट की सुविधा प्रदान करते हैं, जो राष्ट्रीय विकास को प्रभावित करते हैं।