शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CET च्या निकालात १०० पर्सेंटाइलचा दबदबा; राज्यातील २७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 05:32 IST

पीसीएम गटातील १०० पर्सेंटाइलच्या यादीत मुंबईच्या सात विद्यार्थ्यांचा समावेश असून, पुण्याच्या दोन आणि ठाणे, पालघर, सोलापूर, नागपूर, अकोला येथील प्रत्येकी एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेत पीसीएम गटातून १३ विद्यार्थ्यांना १०० पर्सेटाइल मिळाले आहेत, तर पीसीबी गटातून १४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल गुण प्राप्त झाले आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल गुरुवारी सीईटी सेल मार्फत जाहीर करण्यात आला आहे.

१०० पर्सेंटाइलच्या या यादीमध्ये मुंबई व पुण्याच्या विद्यार्थ्यांचा वरचष्मा दिसून आला. हा निकाल विद्यार्थ्यांसाठी सीईटीच्या https://mhitcet2022.mahacet.org/StaticPages/HomePage या अधिकृत संकेतस्थळवर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी दिली.

मुंबई पुण्याचा वरचष्मापीसीएम गटातील १०० पर्सेंटाइलच्या यादीत मुंबईच्या सात विद्यार्थ्यांचा समावेश असून, पुण्याच्या दोन आणि ठाणे, पालघर, सोलापूर, नागपूर, अकोला येथील प्रत्येकी एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राखीव प्रवर्गातील विविध संवर्गातून पहिल्या तीन क्रमांकाच्या यादीत आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १२ आहे.  पीसीबी गटातून १०० पर्सेंटाइलच्या यादीत मुंबईच्या चार, पुण्याच्या दोन, तर ठाणे, सांगली, सातारा, नागपूर, नांदेड, पालघर, अमरावती, लातूर येथील प्रत्येकी एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पीसीबी गटातील राखीव प्रवर्गातील विविध संवर्गातून प्रथम ३ क्रमांकामध्ये आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे.

सीईटीच्या निकालानंतर आता प्रवेश प्रक्रियेसाठी चुरसयंदाच्या निकालात १०० पर्सेंटाइलचेच पीसीबी व पीसीएम गटाचे २७ हून अधिक विद्यार्थी असल्याने ९५ आणि त्याहून अधिकच्या विद्यार्थ्यांची संख्या निश्चितच अधिक असल्याने नामांकित महाविद्यालयांमध्ये काॅम्प्युटर सायन्स, मॅकेनिकल आणि आयटी या शाखांमध्ये प्रवेशासाठी चुरस पाहावयास मिळणार आहे. सीईटीचा निकाल सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आला असला तरी अद्याप संबंधित शाखांच्या संचलनालयाकडून प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक अंतिम नियमावली तयार आहे की नाही, प्रवेशप्रक्रिया केव्हा व कशी सुरू होणार याची विद्यार्थ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.