शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणमंत्र्यांचा शालेय यंत्रणेवर विश्वास नाही का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2022 08:52 IST

तिसरीपासून परीक्षा : शिक्षकांची नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : इयत्ता आठवीपर्यंत परीक्षा न घेण्याचे आधीचे धोरण बदलून तिसरीपासूनच परीक्षा घेण्याचा विचार सुरू असल्याचे वक्तव्य शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अलीकडेच केले. या वक्तव्यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा होतात की नाही, परीक्षांबाबत शाळा आणि त्यांची यंत्रणा कशी चालते, हे शिक्षणमंत्र्यांना माहीत नाही का, असा सवाल शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडून उपस्थित होत आहे. शिक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यावर अनेकांनी नाराजीही व्यक्त केली आहे. शाळा व्यवस्थापन, शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर अविश्वास दाखवणे आश्चर्यकारक असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षकांच्या वर्तुळातून उमटत आहेत. 

विद्यार्थ्यांना एटीकेटीची सवलत देता येते का, या पर्यायावरही विचार सुरू असल्याचे शिक्षणमंत्री म्हणाले; मात्र पहिली ते आठवीपर्यंत या विषयाचा संबंध येत नसल्याचे मत शिक्षण क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.काय म्हणाले शिक्षणमंत्री?आठवीपर्यंत परीक्षाच नसल्याने  ९व्या इयत्तेत परीक्षांना सामोरे जाणारे विद्यार्थी अपयशी होताना दिसतात. परिणामी शैक्षणिक दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात तिसरीपासून परीक्षा घेण्याचा मानस आहे. 

 अनुत्तीर्ण नाही,   मूल्यमापन होते  शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करता येत नसले तरी पहिली ते आठवीच्या मूल्यमापनासाठी २० ऑगस्ट २०१० चा शासन निर्णय अस्तित्वात असून त्यानुसार विद्यार्थ्यांची लेखी चाचणी परीक्षा तसेच प्रत्येक सत्राचे शेवटी लेखी परीक्षा घेतली जाते. प्रत्येक सत्राच्या शेवटी निकाल तयार करून तो विद्यार्थ्यांना दिला जातो. तसेच प्राथमिक विभागात संबंधित क्षेत्रीय अधिकारी हा निकाल तपासून पाहून मंजूर करतात. ही सर्व व्यवस्था गेली बारा वर्षे अस्तित्वात आहे. - महेंद्र गणपुले, प्रवक्ते, राज्य मुख्याध्यापक महासंघ

शिक्षणमंत्र्यांचे वक्तव्य शाळा यंत्रणा आणि मूल्यमापन व्यवस्थेवर अविश्वास दाखवणारे आहे. विद्यार्थ्यांच्या चाचणी, सत्र, सर्व मूल्यमापन परीक्षांच्या नोंदणी शाळा व्यवस्थापनांकडे असतात; मात्र शिक्षण विभागातील निरीक्षकांचीच पदे रिक्त असल्याने त्याची नियमित चाचणी होत नाही. सरकारने अशी वक्तव्ये करण्याआधी यंत्रणेची माहिती घेणे आवश्यक आहे.- जालिंदर सरोदे, शिक्षक, आदर्श विद्यालय , चेंबूर

टॅग्स :Educationशिक्षण