शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

शुल्क भरले नाही म्हणून हॉल तिकीट अडवू नका; एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित नको 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 06:39 IST

आर्थिक परिस्थितीमुळे शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे

मुंबई : कोरोना काळानंतर अनेक विद्यार्थी आणि पालक यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाल्यामुळे अनेकांना शाळेचे पूर्ण शुल्क भरता आलेले नाही. त्यामुळे दहावी- बारावीच्या परीक्षांच्या तोंडावर हॉल तिकिटासाठी विद्यार्थ्यांची अडवणूक होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना राज्य शिक्षण मंडळाकडून विभागीय मंडळांना देण्यात आल्या आहेत. 

आर्थिक परिस्थितीमुळे शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र ही पर्यायी व्यवस्था यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या परीक्षेसाठीच उपलब्ध असेल, असे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षेचा अर्ज भरलेला कोणताही विद्यार्थी शुल्क न भरल्याच्या कारणामुळे परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता विभागीय मंडळांनी घेण्याच्या सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केल्या आहेत. गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक विद्यार्थी नोंदणी यंदा झाली असून, ३ हजार १९५ मुख्य केंद्रांवर १४ लाख ५७ हजार २८३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यंदा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा होत आहे. तर दहावीची राज्यातून १५ लाखांहून अधिक नोंदणी झाली आहे.

अशी असावी कार्यवाही 

  • शालेय शुल्क न भरल्याने मंडळाच्या १० वीच्या परीक्षेचे हॉलतिकीट शाळांकडून मिळण्यासाठी विद्यार्थ्यांची अडवणूक होत असल्यास किंवा त्यांना हॉलतिकीट प्राप्त होत नसल्यास अशा विद्यार्थ्याने शाळेशी संबंधित शिक्षण निरीक्षक/ शिक्षण उपनिरीक्षक/ शिक्षण प्रमुख/ शिक्षणाधिकारी/ प्रशासन अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
  • शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचा तपशील विभागीय मंडळाकडे सादर करीत हॉल तिकिटासाठी पाठपुरावा करावा. 
  • विभागीय मंडळाचे सचिव किंवा अध्यक्षांनी, राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट सॉफ्ट कॉपी स्वरूपात शिक्षणाधिकारी यांना अधिकृत मेलवर उपलब्ध करून द्यावे. 
  • हॉल तिकिटासाठी करण्यात आलेल्या कार्यवाहीचा एकत्रित अहवाल विभागीय मंडळांनी राज्य मंडळाला उपलब्ध करून देणे आवश्यक असणार आहे.