शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘नीट पीजी’ ६ ते ८ आठवडे पुढे ढकलली, केंद्राचा निर्णय; एमबीबीएस विद्यार्थ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 06:46 IST

Exam News : यंदाच्या वर्षी होणारी नीट पीजी परीक्षा सहा ते आठ आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नवी दिल्ली : यंदाच्या वर्षी होणारी नीट पीजी परीक्षा सहा ते आठ आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा येत्या १२ मार्चला होणार होती. नीट पीजी २०२१ चे काउन्सिलिंग सध्या सुरू असून, त्याच कालावधीत ही परीक्षा होणार होती. त्यामुळे ती पुढे ढकलावी, अशी मागणी अनेक डॉक्टरांनी केंद्र सरकारकडे केली होती. राष्ट्रीय परीक्षा मंडळाशी (एनबीई) सल्लामसलत करून केंद्रीय आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे. नीट पीजी परीक्षा व गेल्या वर्षीच्या नीट पीजीचे काउन्सिलिंग एकाच वेळी आल्याने अनेक परीक्षार्थींनी त्याविषयी नाराजी व्यक्त केली होती. यंदा नीट पीजी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी त्यांनी केली, अन्यथा त्यांना मे किंवा जून महिन्यात होणाऱ्या पीजी काउन्सिलिंगमध्ये सहभागी होता आले नसते. या सर्व स्थितीचा आढावा घेऊन यंदाची नीट पीजी परीक्षा सहा ते आठ आठवडे पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी घेतला आहे. १२ मार्चला होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलावी, या मागणीसाठी एमबीबीएसच्या सहा विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. देशात कोरोनाच्या साथीमुळे एमबीबीएस डॉक्टरांची इंटर्नशिप स्थगित झाली आहे. ती ३१ मार्चपर्यंत पूर्ण करावी, असे बंधन घालण्यात आले होते. 

मंगळवारी होणार याचिकेची सुनावणीनीट पीजी परीक्षा सहा ते आठ आठवडे लांबणीवर टाकण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. मात्र हा कालावधी आणखी वाढविण्यात यावा, असे काही एमबीबीएस विद्यार्थ्यांचे मत आहे. यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर मंगळवारी, ८ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. 

टॅग्स :examपरीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्र