शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीनंतर कोचिंग क्लासनाही परवानगी द्यावी; संघटनांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 09:13 IST

ऑक्टोबरपासून ग्रामीण भागात पाचवी ते बारावी, तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच धर्तीवर खासगी शिकवणी वर्गांनाही परवानगी दिली जावी, अशी मागणी खासगी कोचिंग क्लासेस संघटनांकडून होत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क  मुंबई : राज्यात शाळा, मंदिरे, नाट्यगृहे, सिनेमागृहे सर्व सुरू झाले आहे. मात्र, अद्यापही कोचिंग क्लासेस सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. लॉकडाऊनपासून राज्यातील खासगी शिकविण्या बंद आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांपुढे विविध अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. ऑक्टोबरपासून ग्रामीण भागात पाचवी ते बारावी, तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच धर्तीवर खासगी शिकवणी वर्गांनाही परवानगी दिली जावी, अशी मागणी खासगी कोचिंग क्लासेस संघटनांकडून होत आहे. 

कोचिंग क्लासेस व्यवसाय ही शाळा, महाविद्यालयांना समांतर अशी शिक्षण व्यवस्था आहे. मात्र, सरकारला त्याचा विसर पडला आहे. सरकारने ज्याप्रमाणे सर्व नियम पाळून शाळा सुरू करण्याची परवानगी दिली तशीच क्लास सुरू करण्याचीही द्यावी, तसा अध्यादेश काढावा किंवा शाळांच्या शासन निर्णयात क्लासचाही उल्लेख करावा, अशी मागणी कोचिंग क्लास संघटना करीत आहेत. 

राज्याच्या अनेक भागात गेल्या चार महिन्यांपासून शाळा, महाविद्यालय जरी बंद असले तरी कोचिंग क्लासेस हे सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून सुरू आहेत. कोचिंग क्लासेस संचालकांनाही विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी असून, विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून बाहेर पडू नये याचीही चिंता आहे. 

‘क्लासेसला का डावलले जाते?’nऑनलाइन काळात शाळा बंद असताना खासगी शिकविण्यांमुळे विद्यार्थ्यांना आधार मिळाला मग आता शाळा सुरू करताना क्लासेसला का डावलले जात असल्याची प्रतिक्रिया कोचिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख सल्लागार सचिन कर्णावत यांनी दिली. nसरकारकडून या खासगी कोचिंग क्लासेस व्यवस्थेला नेहमीच डावलले जात असल्याने अद्याप क्लास सुरू करण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे ज्या अटी शर्ती, नियम शाळांना लागू केले आहेत ते लागू करून खासगी क्लासला परवानगी द्यावी, अशी मागणी क्लास संस्थाचालक यांनी केली. nवर्गांचे निर्जंतुकीकरण, मास्क, शिक्षकांचे लसीकरण, ५० टक्के उपस्थिती या सर्व नियमांचे पालन खासगी क्लासमध्येही केले जाईल. त्यामुळे सरकारने आता खासगी क्लास सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कर्णावत यांनी केली आहे.यार