शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

१२ वी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मोठी चूक; विद्यार्थ्यांना ६ मार्क फुकटात मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 06:04 IST

इंग्रजीच्या पेपरात प्रश्नांऐवजी उत्तरे! ८० गुणांच्या इंग्रजीच्या कृतिपत्रिकेत प्रश्न क्रमांक ३ मध्ये कवितेवर आधारित १४ गुणांचे प्रश्न विचारले जातात.  

मुंबई - बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा गोंधळ समोर आला असून, इंग्रजीच्या पेपरमधील तीन प्रश्नांमध्ये चक्क उत्तरच (मॉडेल ॲन्सर) छापून आल्याने बोर्डाच्या कामकाजाची लक्तरे पुन्हा वेशीवर टांगली गेली.   प्रश्नपत्रिकेतील त्रुटीबाबत संयुक्त सभेच्या अहवालानुसार विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय देण्यात येईल, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या चुकांचे सहा गुण परीक्षार्थीला मिळण्याची शक्यता आहे.

झाले काय?८० गुणांच्या इंग्रजीच्या कृतिपत्रिकेत प्रश्न क्रमांक ३ मध्ये कवितेवर आधारित १४ गुणांचे प्रश्न विचारले जातात. मात्र प्रश्नपत्रिकेत ए-३, ए-४, ए-५ या तीन कृतींमध्ये दोन प्रश्न छापण्यात आलेले नाहीत, तर प्रश्नाऐवजी उत्तर छापण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात पडले. मंडळाने तयार केलेल्या नमुना उत्तरपत्रिकेतील ए-३, ए-४, ए-५ ही उत्तरे सूचानांसह जशीच्या तशीच कृतिपत्रिकेत छापून आली आहेत.

१७ ठिकाणी गैरप्रकार उघडकीसपहिल्याच दिवशी राज्यात १७ गैरप्रकार उघडकीस आले असून, सर्वाधिक सात प्रकरणे पुण्यातील असल्याचे राज्य शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले. नागपूर, औरंगाबाद येथे प्रत्येकी तीन, तर नाशिक विभागीय मंडळात दोन गैरप्रकार घडले. अमरावती आणि लातूर विभागीय मंडळात प्रत्येकी एक, गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले.

पेपर व्हॉट्सॲपवर : वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे २२ मिनिटांतच इंग्रजीच्या पेपरची १२ ते १५ छायाचित्रे मोबाइलवर व्हायरल झाली. यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन (ता. झरी) येथील महाविद्यालयातील केंद्रावरूनही पेपर व्हायरल झाला असून पोलिसांनी केंद्रप्रमुखासह तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले.

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षा