मुंबई - महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आज, मंगळवार ११ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. मुंबई विभागातून नियमित ३,२५,५७१ विद्यार्थ्यांसह एकूण ३,४२,०१२ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. कॉपीसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.
वाणिज्य शाखेचे सर्वाधिक म्हणजे एक लाख ६६ हजार ४२९ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. त्या खालोखाल विज्ञान शाखेचे १ लाख २७,७०४ विद्यार्थी आणि कला शाखेचे ४७,८७९ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.
मुंबईतून १ लाख २६ हजार ६३० विद्यार्थी परीक्षेला बसले असून ठाणे जिल्ह्यातून १ लाख १५ हजार ४८४, रायगडमधून ३५ हजार ९७८ आणि पालघर जिल्ह्यातून ६३ हजार ९२० विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. परीक्षेसाठी येताना विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे.