शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वय वाढलं पण जिद्द कमी नाही झाली; वयाच्या ४७ वर्षी दहावीची परीक्षा पास केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 19:04 IST

मनीषा राणे यांनी १९९३ साली ८ वी ची परीक्षा दिली. त्यानंतर मात्र घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांचे शिक्षण थांबले.

ठाणे - आज दहावीचा निकाल लागला. अनेक मुले पास झाले आणि आनंदीत झाले. मात्र डोंबिवलीमधील  एका महिलेने वयाच्या ४७ व्या वर्षी परीक्षा दिली आणि त्या उत्तीर्ण झाल्या आहेत. मनीषा राणे असं या महिलेचे नाव असून डोंबिवली त्या सामाजिक काम करतात. तसेच त्या भाजपा कल्याण ग्रामीणच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा म्हणून सुद्धा काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मेहनतीने आणि चिकाटीचे कौतुक केले जात आहे.

मनीषा राणे यांनी १९९३ साली ८ वी ची परीक्षा दिली. त्यानंतर मात्र घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांचे शिक्षण थांबले. १९९५ साली त्यांचं लग्न झाल्यानंतर त्या मुंबईला आल्या. सासरची परिस्थिती देखील जेमतेम असल्याने त्या जेवण बनविणे, धुणी भांडी अशी कामे केली. गणेशनगर मधील महिलांच्या साथीने त्यांनी फंडचा व्यवसाय सुरू केला आणि त्यांची परिस्थिती हळूहळू सुधारू लागली. यादरम्यान एका व्यक्तीने मनीषा यांना तुम्ही काय शिकणार असे बोल लगावल्याने मनीषा यांनी आपले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केला. 

जुनी ८ वी पास असल्याने त्यांना पदवीची परीक्षा देता आली. त्यानुसार २०२१ मध्ये त्यांनी सोशल सायन्स या विषयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. मात्र १० वी व १२ वी बोर्डाची परीक्षा राहिल्याने मनीषा यांही या परीक्षा देण्याचे ठरविले. कामातून जसा वेळ मिळेल तसा अभ्यास करत केला व परीक्षेत बसले. परीक्षेत त्यांना  भूमिती, बीजगणित या विषयाचे पेपर कठीण गेले होते, त्यामुळे त्याची थोडी धाकधूक होती की विषय सुटतो की नाही. परंतु त्या चांगल्या मार्काने पास झाल्याने त्यांना अभिमान वाटू लागला असून मला माझे शिक्षण पूर्ण करायचे आहे आणि ते मी करणारच असा विश्वास व्यक्त करत १२ वी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर लॉ चे शिक्षण घ्यायचे असल्याचे मनिषा राणे यांनी सांगितले.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल