शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन परीक्षेत अमरावती विद्यापीठ नापास; विद्यार्थ्यांचे लाॅगीनच झाले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 15:42 IST

Amravati University, Online Exam Buldhana पहिल्याच पेपरला तांत्रिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थी पेपर देण्यापासून वंचित राहीले.

ठळक मुद्देतांत्रिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थी पेपर देण्यापासून वंचित राहीले आहेत.अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालय गाठून पेपर द्यावा लागला. 

- संदीप वानखडे बुलडाणा : दाेन वेळा परीक्षा रद्द करणार संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यात नापास झाले आहे. पहिल्याच पेपरला तांत्रिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थी पेपर देण्यापासून वंचित राहीले आहेत. त्यामुळे, विद्यार्थ्यांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. अॅपवर पेपर येत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालय गाठून पेपर द्यावा लागला. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यापीठाने अंतिम वर्ष,सत्राच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला हाेता. त्यानुसार या परीक्षा ऑनलाइन घेण्याचे नियाेजन विद्यापीठाने केले हाेते. सुरवातील काही परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने तर त्यानंतर तांत्रिक कारणामुळे पेपर पुढे ढकलण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवली हाेती. त्यानंतर २० ऑक्टाेबरपासून विद्यापीठ्याच्या परीक्षांना प्रत्यक्ष सुरूवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाडामुळे अनेक विद्यार्थ्यांचे लाॅगिनच झाले नाही. त्यामुळे सकाळी ८ वाजतापासून लाॅगीन करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पेपर देता आला नाही. तसेच दुपारी १ वाजता असलेल्या पेपर असलेल्या विद्यार्थ्यांनाही तीच समस्या आली. त्यामुळे, पहिल्याच पेपरमध्ये विद्यापीठ नापास झाल्याचे चित्र आहे. अनेक विद्यार्थी पेपरपासून वंचित राहीले. तसेच विद्यार्थ्यांना मानसिक त्रासही झाला. हा पेपर पुन्हा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. हेल्पलाइन झाली हेल्पलेस ऑनलाइन परीक्षांच्या संदर्भात येणाऱ्या अडचणीसाठी विद्यापीठाने अधिकाऱ्यांची  नियुक्ती केली आहे. तसेच त्यांचे माेबाइल क्रमांक जाहीर केले आहेत. प्रत्यक्षात लाॅगीन न झाल्याने विद्यार्थ्यांंनी हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क केला असता कुणीही प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाuniversityविद्यापीठexamपरीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्र