शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

All The Best! आजपासून बारावीची परीक्षा; मुंबईत ३ लाखांहून अधिक विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 08:31 IST

मुंबई विभागीय मंडळाच्या अंतर्गत असलेल्या परीक्षा केंद्रांवर बारावी परीक्षेची आवश्यक तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती विभागीय सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी दिली.

मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. यंदा मुंबई विभागातून ३ लाख ४४ हजार ७४४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. मुंबईतील ६३५ केंद्रांवर परीक्षा पार पडणार असून, विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे. मंडळाने यंदा कॉपीमुक्त अभियानात अनेक प्रकारच्या उपाययोजना नव्याने केल्या आहेत.

मुंबई विभागीय मंडळाच्या अंतर्गत असलेल्या परीक्षा केंद्रांवर बारावी परीक्षेची आवश्यक तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती विभागीय सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी दिली. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे मानसिक दडपण येऊ नये म्हणून मंडळाकडून प्रत्येक विभागीय मंडळामध्ये समुपदेशन आणि हेल्पलाइनची सोय उपलब्ध करून दिल्याचेही बोरसे यांनी सांगितले. मुंबईतील परीक्षकांची संख्या ६७ आहे. शैक्षणिक हित लक्षात घेता एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, म्हणून सोमवारपर्यंत अर्ज स्वीकारल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची सगळी काळजी शाळा व्यवस्थापनाकडून घेतली जाईल. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्याव्यात. परीक्षा काळातही समुपदेशन उपलब्ध राहणार असल्याने काही अडचणी, समस्या आल्यास विद्यार्थ्यांनी त्यावर संपर्क साधावा. याशिवाय मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या अतिरिक्त दहा मिनिटांच्या सुविधेचा विद्यार्थ्यांनी उपयोग करून घ्यावा. - सुभाष बोरसे, सचिव, मुंबई विभागीय मंडळ 

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षा