शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सर्व मेडिकल कॉलेजवर ‘वॉच’ ठेवणार; प्राध्यापक लेक्चर्सच्या ‘पळवापळवीवर’ अंकुश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 07:14 IST

राज्यात सध्या एमबीबीएसचे शिक्षण देणारी ६२ मेडिकल कॉलेजेस आहेत. त्यामध्ये १०,०४५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आरोग्य क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मेडिकल कॉलेजची गुणवत्ता सुधारावी, यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) आता थेट राज्यातील सर्व मेडिकल कॉलेजेसवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून वॉच ठेवणार आहे. यात कॉलेजेसमधील सर्व शिक्षकांची उपस्थिती त्यांच्या आधार कार्डशी जोडणी असलेल्या बायोमेट्रिक्सनेच करावी, अशा सूचना आयोगाने दिल्या. सर्व कॉलेजचे सीसीटीव्ही फीड आणि उपस्थितीची माहिती थेट आयोगातील कार्यालयाशी जोडावी, असेही आयोगाने सांगितले आहे. त्यामुळे आयोगाची थेट नजर कॉलेजेसमधील सर्व शिक्षकांवर राहणार आहे.  

राज्यात सध्या एमबीबीएसचे शिक्षण देणारी ६२ मेडिकल कॉलेजेस आहेत. त्यामध्ये १०,०४५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये सरकार आणि महापालिकेची २७, खासगी २०, अभिमत विद्यापीठाची १२, तर केंद्र सरकारच्या अखत्यारितील तीन मेडिकल कॉलेजेसचा समावेश आहे. 

नव्या नियमांमुळे बसणार चापनव्या कॉलेजची परवानगी मिळताच आयोगाचे पथक तेथे तपासणीसाठी जाते. शिक्षकवर्ग आहे की नाही, याचीही तपासणी होते. सरकारच्या अखत्यारितील एखादे नवीन कॉलेजेस येत असेल, तर ते तपासणीपुरता त्यांच्या इतर कॉलेजेसमधील शिक्षकवर्ग काही दिवसांसाठी नवीन कॉलेजची तपासणी होईपर्यंत घेत असे. त्यामुळे नवीन कॉलेजमधील पदे भरण्यास मोठा कालावधी जातो. हीच स्थिती खासगी आणि अभिमत विद्यापीठाच्या कॉलेजेसमध्येही आहे. आता नवीन नियमांमुळे शिक्षकांच्या ‘पळवापळवीवर’ अंकुश येईल.

सर्व कॉलेजेसना पत्रराज्यातील सर्व मेडिकल कॉलेजेसना आयोगाने सूचनांचे पत्र सोमवारी पाठविले आहे. त्याचे पालन ऑगस्टमध्ये करणे बंधनकारक आहे. 

आमच्याकडे काही पदे रिक्त आहेतच, हे मी नाकारत नाही; तसेच तपासणीवेळी एका कॉलेजचा शिक्षक वर्ग दुसऱ्या नवीन उघडणाऱ्या कॉलेजेसमध्ये दाखविला तर त्याला आम्ही तेथेच ठेवतो. त्यानंतर जी काही पदे रिक्त आहेत त्याची भरती करण्यात येते.    - डॉ. दिलीप म्हैसेकर, संचालक,     वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन     संचालनालय, महाराष्ट्र राज्य

टॅग्स :Medicalवैद्यकीय