शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावरील नियुक्त्यांमध्ये घोळ; ‘मुक्ता’ची राज्यपालांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 06:04 IST

पेपर सेटर, परीक्षकांच्या नियुक्त्याही नियमबाह्य

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विद्यापीठ कायद्याचे उल्लंघन करत मुंबई विद्यापीठातील संपूर्ण अभ्यास मंडळांची नियमानुसार रचना न होताच पेपर सेटर, परीक्षक नेमले गेल्याची तक्रार मुक्ता या शिक्षक संघटनेने राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे पत्र लिहून केली आहे. विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर मर्जीतील व्यक्तींना नियुक्त केले गेले आहे. त्यातील काही प्राध्यापकांना त्यांनी जो विषय कधी शिकवलाच नाही, त्या अभ्यास मंडळावर नियुक्त केल्याची गंभीर तक्रार मुक्ताने केली आहे.

या आधी प्र-कुलगुरू अजय भामरे यांच्या निवडीबाबतही मुक्ताने आक्षेप नोंदवला होता. नवीन शैक्षणिक धोरण राबवायचे असेल, अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणानुसार तयार करायचा असेल तर त्या संबंधित विषयातील तज्ज्ञ आणि विषयातील सखोल ज्ञान प्राध्यापकांना असणे गरजेचे आहे. अशाच प्राध्यापकांना अभ्यास मंडळावर घेतले जाते. परंतु, विद्यापीठात धक्कादायक प्रकार उघडकीस येत असल्याचे मुक्ताचे म्हणणे आहे.

‘मुक्ता’चे म्हणणे...

  1. नुकत्याच काही विषयांची अभ्यास मंडळांची रचना केली गेली. त्यात प्राध्यापकांना नियुक्त केले गेल्याचे पत्रही पाठविले गेले. परंतु, ही पत्रे पाहता ज्या प्राध्यापकांनी विषय शिकविलाच नाही 
  2. अशा प्राध्यापकांना अभ्यास मंडळावर नियुक्त केले गेल्याचे मुक्ताचे म्हणणे आहे.
  3. बॅचलर ऑफ फायनानान्समधील किमान दोन नियुक्त्यांवर मुक्ताने थेट आक्षेप नोंदवला आहे. एका प्राध्यापकाच्या बाबत तर त्यांनी संबंधित हा विषय कधीच शिकविला नाही, असे लेखी पत्र त्यांच्या कॉलेजच्या प्राचार्यांनी विद्यापीठाला लिहिले आहे.
  4. कायद्याप्रमाणे पेपर सेटिंगसाठी परीक्षक अभ्यास मंडळातर्फे नेमले जातात. परंतु, काही अभ्यास मंडळांची रचना अद्याप व्हायची आहे. तरीदेखील सध्या कायद्याचे उल्लंघन करून पेपर सेटिंगसाठी परीक्षक नेमले गेले आहेत. त्यामुळे या सर्वच परीक्षा वैध आहेत की नाही या विषयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, असे मुक्ताचे सचिव प्रा. सुभाष आठवले यांनी सांगितले.
टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठRamesh Baisरमेश बैस