शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बाेर्डात साचला 35 लाख उत्तरपत्रिकांचा ढीग; शिक्षकांच्या बहिष्कारामुळे बारावीच्या पेपर तपासणीचा पेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 06:20 IST

या परीक्षेला १४ लाख विद्यार्थी बसले आहेत. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासण्याचे काम लगेचच सुरू होणे अपेक्षित होते

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बारावीच्या परीक्षा सुरू असतानाच उत्तरपत्रिका तपासणीवर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बहिष्कार टाकल्याने अंदाजे ३५ लाखांहून उत्तरपत्रिकांचे गठ्ठे विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयात पडून आहेत. नियामकांनीही हे गठ्ठे स्वीकारलेले नाहीत. 

या परीक्षेला १४ लाख विद्यार्थी बसले आहेत. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासण्याचे काम लगेचच सुरू होणे अपेक्षित होते; मात्र परीक्षा सुरू होऊन पाच दिवस झाले तरी उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार कायम आहे. 

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघासोबत झालेल्या शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीत त्यांच्या मागण्यांसंदर्भात अनुकूल भूमिका घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र बैठकीचे इतिवृत्त महासंघाला अद्याप प्राप्त झालेले नाही. 

या पार्श्वभूमीवर इतिवृत्त मिळाल्यानंतरच महासंघाच्या कार्यकारिणीची बैठक होईल व आंदोलनाबाबतचा पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती महासंघाचे समन्वयक  प्रा. मुकुंद आंधळकर यांनी दिली. 

निकालावर परिणाम?शनिवारी झालेल्या परीक्षांच्या  उत्तरपत्रिकांचे गठ्ठेही तपासणीसाठी गेले नाहीत. अंदाजे ३५ लाखांहून अधिक उत्तरपत्रिका पडून आहेत, असे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी सांगितले. 

प्रक्रिया प्रलंबितचn पेपरनंतर संबंधित विषयांच्या मुख्य नियामकांची बैठक होते. नंतर विभागीय पातळीवर बैठक होते. यात तपासणीच्या प्रक्रियेचे नियोजन होते. n प्रत्येक नियामकाकडे सहा ते सात उत्तरपत्रिका तपासणीस असतात. त्यांना द्यावयाची प्रश्नपत्रिका व आदर्श उत्तरपत्रिका यांच्या वितरणाबाबत निश्चिती होते. त्यानंतर तपासणीची प्रक्रिया सुरू होते. परंतु नियामकांची बैठकच झाली नसल्याने सर्व प्रक्रिया प्रलंबित आहे.

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षा