शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश नोंदणीला मुदतवाढ, आतापर्यंत १ लाख २९ हजारांहून अधिक अर्जांची पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2023 11:47 IST

१५ ते १७ जून दरम्यान हरकती नोंदविता येणार

लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: केंद्रीय प्रवेश समितीकडून सुरू असलेल्या अकरावीसाठी असलेल्या प्रवेश नोंदणीसाठी १४ जून रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही प्रवेश नोंदणी म्हणजे प्रवेश प्रक्रियेत भाग-  १ असून आतापर्यंत राज्यातील ३ लाख ९१ हजार विद्यार्थ्यांनीच भाग १ ची प्रक्रिया पूर्ण केली आहे. यात  मुंबई विभागातून आतापर्यंत २ लाख ६२ हजार ८५२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, तर ३२ विद्यार्थ्यांनी अर्ज मागे घेतले आहेत. तर १ लाख २९ हजार २०४ विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे.

काही कारणांमुळे विद्यार्थ्यांना नोंदणी आणि प्रवेश अर्जाचा भाग एक भरता आला नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शिक्षण विभागाने प्रवेश अर्जाचा भाग एक ही मुदतवाढ दिली. तसेच अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी २१ जूनला जाहीर होईल.

राज्यात अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी  ३ लाख २९ हजार १९८ विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी पूर्ण झाली आहे.  २ लाख ५२ हजार ४२३ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरले आहेत. 

....म्हणून प्रक्रियेस मुदतवाढ

  • राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांना दहावीच्या गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला १४ जूनला मिळणार आहे. 
  • त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत प्रवेश अर्जाचा भाग एक भरता आला नाही. त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

१५ ते १७ जून दरम्यान हरकती नोंदविता येणार 

१५ जूनला सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. १५ ते १७ जून दरम्यान सर्वसाधारण गुणवत्ता यादीवर आक्षेप, हरकती नोंदविता येतील. १७ जूनला प्रवेश अर्जाचा भाग दोन भरता येईल. पहिली अंतिम गुणवत्ता यादी २१ जूनला जाहीर करण्यात येईल. तर २१ ते २४ जून या कालावधीत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल. राखीव जागा अंतर्गत प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांना  १८ ते २० जून या कालावधीत अर्ज करता येईल. कोट्यांतर्गत प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी २१ जूनला जाहीर केली जाईल. कोट्यांतर्गत पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश २१ ते २४ जून या कालावधीत निश्चित करण्यात येतील. तर २४ जूनला कोट्यांतर्गत रिक्त जागा घोषित करता येतील असे स्पष्ट करण्यात आले.

 

टॅग्स :Educationशिक्षण