शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘कट ऑफ’ पुन्हा वाढले; बहुतांश नामांकित महाविद्यालयांच्या जागा फुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 05:28 IST

अकरावी प्रवेश दुसरी विशेष फेरी : नामांकित महाविद्यालयांचे कट ऑफ ८० टक्क्यांच्या वर स्थिरावल्याने त्याखालील गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची मात्र यामुळे धाकधूक वाढली आहे.

मुंबई : अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या दुसऱ्या विशेष फेरीत मुंबई विभागातून २६ हजार ३७ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट देण्यात आल्या आहेत. दुसऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली असून, यासाठी एकूण ३९ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. अकरावीच्या विशेष फेरीच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीतही महाविद्यालयांचा कट ऑफ वाढलेला पाहण्यास मिळाला. एकीकडे एचआर, रुईया, पोदारसारख्या नामांकित महाविद्यालयांच्या जागा फुल्ल झाल्या आहेत, तर दुसरीकडे भवन्स, मिठीबाईसारख्या महाविद्यालयांतील कला , वाणिज्य, विज्ञान शाखेच्या कट ऑफमध्ये १३ ते १५ टक्क्यांहून वाढ दिसून आली.  

नामांकित महाविद्यालयांचे कट ऑफ ८० टक्क्यांच्या वर स्थिरावल्याने त्याखालील गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची मात्र यामुळे धाकधूक वाढली आहे. अकरावीच्या विशेष फेरीच्या दुसऱ्या यादीत पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी देण्यात आली होती. 

१७ सप्टेंबरपर्यंत प्रवेश निश्चितीया गुणवत्ता यादीमध्ये कला शाखेच्या २००५ , वाणिज्य शाखेच्या १५ हजार ७४९, विज्ञान शाखेच्या ७ हजार ९४८ आणि एचएसव्हीसीच्या ३३५ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळालेल्या आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये पहिला पसंतीक्रम मिळालेले एकूण १४ हजार ९३९ विद्यार्थी आहेत. दुसऱ्या पसंतीचे महाविद्यालय प्राप्त ३ हजार ८१३ आणि  तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय प्राप्त २ हजार २५७ विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांनी येत्या १७ सप्टेंबरपर्यंत आपले प्रवेश निश्चित करावेत, असे आवाहन उपसंचालक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.