शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीच्या एक लाख जागा प्रवेशाच्या प्रतीक्षेत; दुसरी विशेष फेरी १५ सप्टेंबरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 08:26 IST

या विशेष फेरीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी अजूनही १ लाख ०७ हजार ७२६ जागा रिक्त आहेत.

मुंबई : अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आता दुसरी विशेष फेरी आजपासून राबवली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान अर्ज भरण्यासह अर्जात दुरुस्ती, पसंतीक्रम नोंदवणे, अर्जाचा भाग दोन भरणे, आदी प्रक्रिया करता येणार असून, दुसऱ्या फेरीची निवड यादी १५ सप्टेंबरला जाहीर होईल. या विशेष फेरीत आता पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही अर्ज करता येणार आहे. 

या विशेष फेरीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी अजूनही १ लाख ०७ हजार ७२६ जागा रिक्त आहेत.  अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या, तर एक विशेष फेरी अशा एकूण चार फेऱ्या राबवण्यात आल्या. मात्र, अद्यापही काही विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्याने, तसेच राज्य मंडळाने घेतलेल्या पुरवणी परीक्षेच्या निकालातील उत्तीर्ण आणि एटीकेटी सवलत प्राप्त विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळण्यासाठी दुसरी विशेष फेरी राबवली जाणार आहे. दरम्यान, पहिल्या विशेष फेरीमध्ये अलॉटमेंट प्राप्त ७९ हजार ५१३ विद्यार्थ्यांपैकी ५८ हजार ७७२ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. 

एटीकेटी विद्यार्थ्यांनी असा भरावा अर्जएटीकेटी सवलत प्राप्त विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेतील सहा विषयांचे गुण भरावेत. गुणपत्रिका एकापेक्षा जास्त असल्यास सर्वांत शेवटच्या परीक्षेचा बैठक क्रमांक अर्जात नोंदवून गुणपत्रके अपलोड करावीत.एटीकेटी असल्यास उर्वरित एक किंवा दोन विषयांचे सर्वोत्तम गुण मोजून सहाशेपैकी गुण नोंदवावेत. ते गुण पाचेशपैकी रूपांतरित करून गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरले जातील.एटीकेटी विद्यार्थ्याने प्रवेश अर्ज भरून भाग एक आणि भाग दोन पुन्हा लॉक करणे आवश्यक आहे.भाग एक यापूर्वी भरला असल्यास त्यातील माहिती आवश्यकतेनुसार सुधारित करून अर्ज लॉक करावा. जुलै २०२२ च्या पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी रिपीटर म्हणून अर्ज भरावा.