शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

विकासाचे तरुण आश्वासन

By admin | Updated: October 29, 2014 01:25 IST

देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर भाजपाने केलेली निवड हे देशात पहिल्या क्रमांकावर असलेल्या या राज्याला मिळालेले विकासाचे तरुण आश्वासन आहे.

देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर भाजपाने केलेली निवड हे देशात पहिल्या क्रमांकावर असलेल्या या राज्याला मिळालेले विकासाचे तरुण आश्वासन आहे.  अतिशय स्वच्छ चारित्र्याचा, उमद्या मनाचा व निर्वैर वृत्तीचा हा नेता वयाच्या 44व्या वर्षी राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान होत असेल तर ते राज्याच्या गतिशील वाटचालीचे व त्यांच्या स्वत:च्या उज्‍जवल भवितव्याचे सुचिन्ह ठरणार आहे. नागपूर या राज्याच्या उपराजधानीचे महापौरपद ओळीने दोन वेळा भूषवून फडणवीसांनी राज्याच्या विधिमंडळात प्रवेश केला. महापौरपदाची त्यांची कारकीर्द जेवढी आश्वासक व यशस्वी झाली तेवढेच त्यांचे आमदारपदही आरंभापासून गाजत व गजर्त राहिले. एक अतिशय अभ्यासू व लोकांच्या प्रश्नांविषयीची तळमळ असणारा पारदर्शक लोकप्रतिनिधी अशी ख्याती त्यांनी अल्पावधीतच संपादित केली. विरोधी बाकावर बसून सरकारच्या कारभारावर दक्ष नजर ठेवणा:या या तरुणाच्या तोंडून त्याच्या सत्तारूढ विरोधकांविषयी कधी अपशब्द निघाला नाही, की त्याने उच्चरलेला शब्द त्याला कधी मागे घ्यावा लागला नाही. विधायक टीका कशी करावी,  सरकारला धारेवर कसे धरावे आणि आपला दर्जा कायम राखून सरकारची लक्तरे वेशीवर कशी टांगावी याचा आदर्शच त्या काळात त्यांनी घडविला. फडणवीसांना वक्तृत्वाची देण आहे. आपले म्हणणो मोजक्या पण परिणामकारक शब्दांत मांडून सभागृहाएवढेच सा:या राज्याचे लक्ष आपल्याकडे व आपण मांडत असलेल्या प्रश्नांकडे वेधून घेण्याची हातोटी त्यांना साधली आहे. असे वक्तृत्व आत्मविश्वासातून येते व तो आत्मविश्वास अध्ययनातून येतो. देवेंद्र फडणवीसांनी राज्याच्या अंदाजपत्रकांवर केलेली भाषणो याचसाठी सगळ्या होतकरू लोकसेवकांनी अभ्यासावी अशी आहेत. लक्ष्यावर नजर ठेवून व तपशीलावर पकड राखून सरकारच्या आर्थिक धोरणातील त्रुटी व कार्यक्रमातील उणिवा सभागृहाच्या व्यासपीठावर उघड करता येणो ही लोकप्रतिनिधीची कसोटी पाहणारी बाब आहे. देवेंद्र फडणवीस या कसोटीला पूर्णपणो यशस्वी होऊन उतरले आहेत. त्यांची अंदाजपत्रकावरची दरवर्षीची भाषणो एकाहून एक सरस होत गेली. नंतरच्या काळात त्यांनी केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकावर जनतेसमोर अभ्यासपूर्ण भाषणो करण्याचा उपक्रम हाती घेतला. अंदाजपत्रक ही सामान्य माणसांच्या समजापलीकडची बाब फडणवीसांनी त्यांना विद्याथ्र्याना सांगावी तशी समजावून दिली. आपल्या अध्ययनाकडे एवढय़ा काळजीने पाहणा:या या जागरूक लोकप्रतिनिधीने आपल्या मतदारसंघाकडे कधी दुर्लक्ष केले नाही, आपल्या मतदारांना आपली वाट पाहायला लावली नाही, की घरी भेटीला येणा:या तक्रारकत्र्याना समाधानावाचून परतू दिले नाही. देवेंद्र फडणवीस हा लोकसंग्रहातून पुढे आलेला अभ्यासू नेता आहे. राजकारणात सा:याच गोष्टी कोणाच्या मनासारख्या होत नाहीत. हर्ष व विषादाचे क्षण त्यात फार येतात. मात्र या सा:या काळात या तरुणाच्या चेह:यावरचे प्रसन्नपण कधी मावळलेले वा म्लान झालेले दिसले नाही. फडणवीसांच्या काही भूमिका ठाम आहेत. रा.स्व.संघ हा त्यांच्या निष्ठेचा विषय आहे. त्यांचे वडील व राज्य विधान परिषदेचे माजी सदस्य कै. गंगाधरराव फडणवीस हा त्यांच्या श्रद्धेचा व आदर्शाचा भाग आहे. पक्षनिष्ठा, नेतृत्वाविषयीची श्रद्धा आणि लोककार्याविषयीची तळमळ हा त्यांच्या स्वभावाचा विशेष आहे. भारतीय जनता पक्षाने छोटय़ा राज्यांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय फार पूर्वी घेतला. देवेंद्र फडणवीस तेव्हापासूनच लहान राज्यांचे व त्यातही विदर्भ राज्याचे पुरस्कर्ते बनले. ऐन निवडणुकीच्या काळातही ते त्या मागणीशी जुळून राहिले. या हिशेबाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर येणारे दादासाहेब कन्नमवारांच्या नंतरचे ते दुसरे विदर्भवादी मुख्यमंत्री ठरतील. अर्थातच आपली व्यापक जबाबदारी ते त्यांच्यातील सर्वसमावेशक वृत्तीच्या व माणसे जोडण्याच्या स्वभावाच्या बळावर नीट पार पाडतील. आपल्या आमदारकीच्या काळात फडणवीसांनी सा:या महाराष्ट्रात आपल्या मित्रंचे व चाहत्यांचे एक मोठे जाळे निर्माण केले आहे. त्यामुळे त्यांची दृष्टी सा:या प्रदेशांना न्याय देणारी व समतोल राहील याविषयी कोणी शंका बाळगण्याचे कारण नाही. काही काळापासून राज्याचे सरकार दुभंगल्यागत व थांबल्यागत झाले होते. नव्या नेतृत्वात त्याची चाके पुन्हा पूर्ववत चालू लागतील व हे राज्य अतिशय वेगाने पुढे जाईल अशी उमेद आपण बाळगूया. देवेंद्र फडणवीसांचे नव्या जबाबदारीसाठी मन:पूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या कामातील यशासाठी त्यांना अंत:करणपूर्वक शुभेच्छा !