शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

यशवंत सिन्हांचा ‘मौका’; मुख्यमंत्र्यांचा ‘चौका’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 04:07 IST

सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वावर नाराज असलेल्या झारखंडमधील राष्ट्रीय नेत्याने महाराष्ट्रातील अकोल्यासारख्या जिल्हा मुख्यालयी विदर्भातील शेतक-यांच्या प्रश्नांवर आंदोलन छेडावे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सगळ्याच मागण्या मान्य करून, आंदोलनाची इतिश्री करावी! सारेच कसे अगम्य, अनाकलनीय!

- रवी टालेसत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वावर नाराज असलेल्या झारखंडमधील राष्ट्रीय नेत्याने महाराष्ट्रातील अकोल्यासारख्या जिल्हा मुख्यालयी विदर्भातील शेतक-यांच्या प्रश्नांवर आंदोलन छेडावे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सगळ्याच मागण्या मान्य करून, आंदोलनाची इतिश्री करावी! सारेच कसे अगम्य, अनाकलनीय!गत आठवड्यातील अकोल्यातील या घटनाक्रमाने विविध राजकीय पक्षांचे नेते, शेतकरी नेते, राजकीय विश्लेषक, पत्रकार अशा सगळ्याच घटकांना बुचकळ्यात पाडले. यशवंत सिन्हा यांनी शेतकºयांच्या प्रश्नांवर आंदोलन छेडण्यासाठी अकोल्याचीच निवड का केली, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा, मग प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केला. कुणाला त्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचे कटकारस्थान दिसले, कुणाला विरोधी पक्षांची हवा काढण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न दिसला, तर कुणाला भाजपामध्ये स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या अंतर्गत कलहाचा पुढील अध्याय दिसला.पूर्वी आपल्या देशात काहीही अवांछित घडले, की काही लोकांना त्यामागे परकीय हात असल्याचा साक्षात्कार होत असे. हल्ली विदेशी हाताची जागा संघाच्या स्वदेशी हाताने घेतली आहे! संघ आणि भाजपाच्या इशाºयावरूनच सिन्हा अकोल्यात दाखल झाल्याची मांडणी करणाºयांनी, सिन्हांची नाळ संघाशी नव्हे, तर समाजवाद्यांशी जुळली असल्याची आणि त्यांनी २०१४ पासूनच भाजपाच्या विद्यमान नेतृत्वाच्या विरोधात आघाडी उघडली असल्याची वस्तुस्थितीही विचारात घेतली नाही. सिन्हांप्रमाणेच, त्यांना अकोल्यात आमंत्रित करणाºया मंडळीपैकीही कुणी संघाशी जुळलेला नाही. त्यांनी सिन्हांसोबतच नाना पटोले, राजू शेट्टी या भाजपावर नाराज असलेल्या खासदारद्वयांनाही आमंत्रित केले होते. मग पटोले व शेट्टीही संघ व भाजपाच्या कारस्थानात सहभागी होते का? आणि संघ किंवा भाजपाला कटकारस्थान करून सिन्हांना पाठवायचेही होते, तर अकोलाच का?वस्तुस्थिती ही आहे, की ज्या शेतकरी जागर मंच नामक संघटनेने आंदोलन छेडले होते, ती संघटना नवी आहे. त्या संघटनेकडे कोणतेही मोठे नाव नाही. त्यामुळे गत महिन्यात एका व्याख्यानाच्या निमित्ताने अकोल्यात निमंत्रित केलेल्या यशवंत सिन्हा यांनाच त्यांनी आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी निमंत्रण दिले आणि सध्या राजकारणात अवकाश शोधत असलेल्या सिन्हांनी ती संधी साधली!यशवंत सिन्हा यांनी शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करण्याचा आयताच चालून आलेला ‘मौका’ हेरला; पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ‘मौके पे चौका’ हाणून, विरोधकांच्या भात्यातील अस्त्र अलगद काढून घेतले. विधिमंडळाच्या अधिवेशनात शेतकºयांच्या प्रश्नांवर विरोधक आपल्याला घेरणार, याची मुख्यमंत्र्यांना पुरेपूर कल्पना आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळावर मोर्चाची तयारी चालविली आहे. आपण मागे राहू नये, याची काळजी काँग्रेसही घेणारच आहे. सत्तेत सहभागी असलेली शिवसेनाही वार करणारच आहे. या पार्श्वभूमीवर, सिन्हांच्या आंदोलनाच्या निमित्ताने शेतकºयांच्या प्रमुख मागण्या मान्य करून, विरोधकांचे शस्त्र बोथट करण्याची चतूर खेळी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हा