शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

संपादकीय - जिनपिंगना हवा होता मोदींबरोबर ‘हसरा’ फोटो!

By विजय दर्डा | Updated: September 19, 2022 10:02 IST

शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत नरेंद्र मोदी हे शी जिनपिंग, शाहबाजना भेटले नाहीत, पुतीन यांच्याशी गळाभेटही घडली नाही! याचा अर्थ काय होतो?

विजय दर्डा

चीन आपल्या स्वभावानुसार धूर्तपणे चाल खेळला खरा; परंतु भारताला चकवा देण्यात त्याला यश आले नाही. भारतीय कूटनीतीच्या रथी- महारथींनी चीनच्या छुप्या इच्छेवर अखेर पाणी फिरवले, असेच म्हणावे लागेल. शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ)  बैठकीत भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर आपला एखादा तरी हसरा फोटो काढला जावा, त्यांच्यासोबत हास्यविनोद करतानाचा आपला एखाद दुसरा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल व्हावा, अशी चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांची इच्छा होती. 

आता प्रश्न असा पडेल, की शी जिनपिंग यांना असे का वाटले असावे? या प्रश्नावर चर्चा करण्याआधी शांघाय सहकार्य संघटना हे प्रकरण नक्की काय आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. आधी या संघटनेचे नाव ‘शांघाय ५’ असे होते आणि कझाकस्तान, चीन, किरगीजस्थान, रशिया आणि ताजकिस्तान हे या संघटनेचे सदस्य होते. २००१ मध्ये या संघटनेत उजबेकीस्थान सामील झाल्यानंतर त्याचे नाव शांघाय सहकार्य संघटना असे ठेवण्यात आले. २०१७ मध्ये भारत आणि पाकिस्तानही त्यात सामील झाले. शिक्षण, ऊर्जा, परिवहन, पर्यटन आणि पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रात एकमेकांशी सहकार्य वाढवण्याबरोबरच शांतता आणि सुरक्षा हेही या संघटनेचे उद्दिष्ट आहे; परंतु कमाल अशी की दस्तुरखुद्द चीनच या संघटनेतील  अन्य  देशांसाठी सर्वांत मोठा धोका झाला आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत चीन नेमकी कोणती चाल खेळणार होता, हेही महत्त्वाचे आहे. डोकलाममध्ये चीनबरोबर दीर्घकाळ चकमक झाल्यानंतर अचानक हे प्रकरण थंडावले. वास्तविक त्यावेळी चीनने ब्रिक्स संमेलन आयोजित केले होते आणि त्या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामील व्हावे, अशी चीनची इच्छा होती. यावेळीही चीनने हीच चाल खेळली.

१५ आणि १६ सप्टेंबरला समरकंद येथे शांघाय सहकार्य संघटनेची बैठक होणार होती आणि नऊ सप्टेंबरला अचानक बातमी आली की, भारतीय व चिनी लष्कर अधिकाऱ्यांच्या बैठकीत लडाखच्या पेट्रोल पॉइंट पंधरावर दोन्ही देशांच्या सैन्याने माघारीची तयारी दाखवली आहे. केवळ तीन दिवसांत सैन्य मागे घेण्याची चर्चाही सुरू झाली. जो चीन डझनावारी बैठका होऊनही एक इंचभरही मागे सरकायला तयार नव्हता, तो अचानक माघारीसाठी कसा तयार झाला? चीन भारताला आपल्या जाळ्यात फसवण्याची चाल खेळतो आहे, हे भारतीय कूटनीतीच्या चाणक्यांना समजायला अर्थातच वेळ लागला नाही!भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समरकंदमध्ये चिनी राष्ट्रपती शी जीनपिंग यांच्याबरोबरच्या भेटीला तयार व्हावे, यासाठी चीनने हे पाऊल उचलले होते. दोघांचे दोन- चार हसरे फोटो निघाले असते, तर चीन जगाला हे दाखवू शकला असता की, दोन्ही देशांमध्ये वादविवाद आणि तणाव  असले, तरी भारताशी चीनचे संबंध ठीकठाक आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांचा समावेश असलेल्या ‘क्वाड’ संघटनेचा भारत सदस्य आहे. याचा चीनला नेहमीच त्रास होत आला आहे. चीन एकीकडे भारताला धमक्या देतो आणि दुसरीकडे सगळे ठीकठाक असल्याचे दाखवू पाहतो. जेणेकरून भारताच्या नव्या मित्रांची फसगत व्हावी. 

जगाच्या विद्यमान परिस्थितीवर आपण नजर टाकली तर एक गोष्ट स्पष्ट होते, की चीनविषयी संपूर्ण जगात नाराजी वाढली आहे. तैवानच्या मुद्यावर अमेरिकेच्या भूमिकेतही कडकपणा आलेला दिसतो आहे. एकुणात गोळाबेरीज ही, की आपल्या उद्योगामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन खलनायकाच्या भूमिकेत गेला आहे. श्रीलंका आणि पाकिस्तानसह ४२ देशांना चीनने आपल्या कर्जाच्या जाळ्यात अडकवले आहे. कर्जात फसलेल्या देशांच्या साधनसामुग्रीवर चीन आता ताबा मिळवू पाहतो आहे. याच्या बरोबर उलट नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत जगभर चमकतो आहे. शक्तिमान देश होण्याच्या सर्व शक्यता भारतामध्ये दिसतात. चीनला हे नेमके कळते. म्हणून तो भारताला धोका देण्याचे, गुंगवण्याचे प्रयत्न करत राहतो. भारत आता १९६२ मधला देश राहिलेला नाही, हे चीनला पक्के ठाऊक आहे. त्यामुळे हल्ला करण्याचा विचार करणेही चीनला शक्य नाही. त्यामुळे चाली आणि धोकेबाजी हाच चीनसाठी एकमेव रस्ता उरतो. चीनची ही चाल भारताच्या पंतप्रधानांनी ओळखली. त्यामुळे जीनपिंग यांच्याशी काही भेट, बोलणे होण्याची शक्यताच नव्हती. 

चीनच्या इच्छेवर पाणी तर पडलेच. शिवाय जागतिक प्रश्नांवर भारताने जी स्पष्ट भूमिका घेतली त्याची चीनच काय; पण रशियानेही कल्पना केली नव्हती. पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज हेही तेथे होते; परंतु त्यांना भेटण्याचा प्रश्न तर कुठे दूरवरूनही दृष्टिपथात नव्हता. शांघाय सहकार्य संघटनेच्या या शिखर संमेलनात पंतप्रधान मोदींनी अत्यंत स्पष्ट शब्दांत पाकिस्तान आणि चीनवर उघड टीका केली. पुतीन यांच्याबरोबर झालेल्या संवादातही त्यांनी स्पष्ट सांगितले, की ही युद्धाची वेळ नव्हे! युक्रेनवरील हल्ल्यासंदर्भात चीन पूर्णपणे रशियाच्या बरोबर आहे, असे असताना मोदींनी घेतलेली भूमिका पुतीन यांनाही मोठा संदेश देणारी होती. जगभरातील माध्यमांमध्ये मोदींच्या या संदेशाची चर्चा होत आहे. आणखी एक ठळकपणे जाणवलेली बाब! यापूर्वी जेव्हा जेव्हा पुतीन यांच्याशी मोदींची भेट झाली, तेव्हा तेव्हा गळाभेट झाली! यावेळी मात्र या दोघांमध्ये संवाद झाला, तरी तशी गळाभेट झाली नाही. हाही भारतीय कूटनीतीचाच भाग होता का? - कदाचित!

एका छोट्या देशावर हल्ला करणाऱ्या देशाच्या राष्ट्रपतींशी आम्ही गळाभेट करणार नाही, हेच त्यातून भारताला सांगायचे होते! तूर्तास चीनची चाल असफल ठरली आहे. त्यामुळे चीन अर्थातच भडकलेला आहे. पुढचा धोका काय द्यावयाचा याच्या तयारीला चीन एव्हाना लागलाही असेल. आपल्याला सावध राहावे लागेल.

(लेखक लोकमत एडिटोरियल बोर्ड आणि लोकमत समुहाचे चेअरमन आहेत)

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीXi Jinpingशी जिनपिंगchinaचीन