शहरं
Join us  
Trending Stories
1
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
2
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
3
"...तर डॉ. तावरे, डॉ. हळनोरच्या जिवाला धोका, त्यांना सुरक्षा" द्या; सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती
4
थरार: भरझोपेत पत्नीचा खून, रक्ताने माखलेली कुऱ्हाड दाखवत निर्दयी पती गावभर फिरला; मग...
5
बिहारमध्ये उष्णतेचा कहर, शाळेतील ४८ विद्यार्थिनी पडल्या बेशुद्ध, रुग्णालयात करावं लागलं दाखल
6
महात्मा गांधींना जगाने ओळखावं यासाठी काहीही केलं गेलं नाही; PM मोदींचा काँग्रेसवर निशाणा
7
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर
8
इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंची सुरक्षा वाढवली; PCB च्या मागणीनंतर निर्णय, जाणून घ्या कारण
9
Best retirement Plan: २५ व्या वर्षात सुरुवात, रिटायरमेंटवर मिळतील ₹३ कोटी; पेन्शनही मिळणार, जाणून घ्या
10
बंगाल, दिल्ली, ओडिशा अन् तेलंगणा, भाजपाला किती जागा मिळणार?; अमित शाहांनी आकडा सांगितला
11
“पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचे अपयश अधोरेखित”; सुप्रिया सुळेंची टीका
12
लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला किती जागा मिळणार? योगी आदित्यनाथ यांनी थेट आकडाच सांगितला 
13
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
14
T20 World Cup मध्ये रोहित ओपनर नको; भारतीय दिग्गजाचं मत, चाहत्यांनी दाखवला आरसा
15
बापरे! "जगभरात येणार कोरोनापेक्षाही भयंकर महामारी"; तज्ञांनी व्यक्त केली चिंता
16
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
17
पाकिस्तानच्या जीडीपीच्या दुप्पट एलआयसीची संपत्ती! तीन देश मिळूनही बरोबरी करू शकत नाहीत
18
वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS
19
"त्या राजकीय पोस्टनंतर आईवडिलांना धमकीचा फोन आला आणि...", प्रियदर्शन जाधवने सांगितला 'तो' प्रसंग
20
चीनचं भारताविरोधात कटकारस्थान, सीमेवर वसवली ६२४ गावं, सैनिक तैनात करणार?

आजचा अग्रलेख - निसर्गाचा प्रकोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 2:11 AM

खासदार सुनील तटकरे यांनी पाच हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला आहे.

महाराष्ट्राच्या हिरव्यागार कोकण किनारपट्टीला गेल्या बुधवारी ‘निसर्ग’ चक्र ीवादळाचा फटका बसला. हवामान खात्याने पुरेशी पूर्वकल्पना दिली होती त्यामुळे सुदैवाने मनुष्यहानी टाळण्यात प्रशासनाला यश आले. तब्बल ४० हजारांहून अधिक लोकांचे सुरक्षित स्थानी स्थलांतर करण्यात आले होते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. परंतु, या चक्र ीवादळाचे रूप इतके रौद्र होते की, अक्षरश: लाखो संसार उघड्यावर आले. छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्ह्याची पुरती वाताहात झाली. चक्र ीवादळ होऊन आता जवळपास आठवडा होईल, तरीही नुकसानीचे मोजमाप अद्याप पूर्ण झालेले नाही आणि येत्या काही दिवसांत हे पंचनामे संपतील अशी चिन्हे नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगेचच रायगड जिल्ह्याला भेट दिली. त्यांनी तातडीची १०० कोटींची मदत देऊन जखम थोडी भरण्याचा प्रयत्न केला. शरद पवारही कोकण दौऱ्यावर गेले.

खासदार सुनील तटकरे यांनी पाच हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला आहे. प्रशासकीय पातळीवर थोड्या वेगाने हालचाली सुरू आहेत. तरीही या किनारपट्टीवरील सौंदर्याने नटलेल्या जिल्ह्यांची जी भयंकर पडझड झाली. ती भरून निघण्यास मोठा कालावधी लागणार हे नक्की. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड तालुक्यांना मोठा फटका बसला, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तालुके या चक्र ीवादळाच्या तडाख्यात सापडले. मात्र, रायगड जिल्ह्यातील मुरुड, रोहे, माणगाव, अलिबाग, म्हसळा, पेण, तळा, महाड, श्रीवर्धन, पोलादपूर या तालुक्यांची मोठी हानी झाल्याचे चित्र आहे. सुपारीच्या बागा, नारळाची झाडे, आंबा, काजूच्या बागा यांचे अतोनात नुकसान झाले. एकट्या रायगड जिल्ह्यात सुमारे एक लाखाहून अधिक घरांची पडझड झाली. १४ हजारांहून अधिक विजेचे खांब पडले. अनेक झाडे विजेच्या तारांवर पडल्याने वीजपुरवठा ठप्प झाला. गेला आठवडाभर अनेक गावांत वीजपुरवठा खंडित आहे. त्याचा प्रामुख्याने फटका पाणीपुरवठा यंत्रणेला बसला आहे. शेकडो गावांत पिण्याचे पाणी नाही. गावेच्या गावे तहानलेली आहेत. मोबाईल टॉवरही पडल्याने संपर्क यंत्रणा ठप्प आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने प्रशासकीय यंत्रणाही गावांपर्यंत पोहोचू शकत नाही, असे विदारक चित्र रायगड जिल्ह्याचे आहे. त्यामुळे नुकसानीचा नेमका आकडा समजू शकलेला नाही. मात्र, गेल्या कित्येक दशकांत इतक्या तीव्र अस्मानी संकटाचा भयावह अनुभव विशेषत: रायगड जिल्ह्याने घेतलेला नव्हता, असे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. त्यावरून या चक्रीवादळाची कल्पना यायला हरकत नाही. आधीच कोरोनाचे संकट घोंगावत असताना कोकणावर ‘निसर्ग’ चक्रीवादळाने जो आघात केला, त्यातून या जिल्ह्यांना सावरायला नक्की वेळ लागेल यात शंका नाही. परंतु, शासकीय पातळीवर जर गांभीर्याने दखल घेऊन हालचाली केल्या आणि नुकसान झालेल्यांच्या घरांपर्यंत मदत पोहोचविण्याची व्यवस्था सुयोग्य पार पडली, तर कोकण पुन्हा झटकन् उभे राहील. कोकणचे सुपुत्र सगळे महामुंबईत चाकरमानी आहेत. कोरोनामुळे काहीजण आधीच गावाकडे पोहोचले आहेत. काही स्वयंसेवी संघटनांनी मदतीचा हात पुढे केला आहे. परंतु, नुकसानीचे प्रमाण इतके अक्राळविक्राळ आहे की, या तुटपुंज्या मदतीने फारसा फरक पडणार नाही. शरद पवार कोकण दौºयावर आपतग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी आले आहेत. त्यांच्या दौºयामुळे कोकणी माणसांच्या अपेक्षा उंचावणे स्वाभाविक आहे. सबंध कोकणाचा नुकसानीचा आकडा मोठा असल्याने राज्य सरकारला केंद्राच्या मदतीवर अवलंबून राहावे लागणार आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने राज्याला केंद्राशिवाय पर्याय नाही. केंद्राने हात आखडता घेतल्यास त्यांच्याकडून मदत खेचून आणण्याची धमक राज्य सरकारला ठेवावी लागणार आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या कोकण भूमीला पुन्हा उभे करण्यासाठी प्रसंगी केंद्राशी दोन हात करण्यास भाग पडले तरी चालेल. परंतु, पावसाळा तोंडावर असताना फार वेळ दवडून चालणार नाही. वेगाने होणाºया मदतकार्याच्या हालचालीच कोकणाला चक्रीवादळाच्या जखमेतून लवकर बाहेर काढतील हे मात्र नक्की.रायगड जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये आर्थिक संकटाबरोबर पाणीसंकटही उभे राहिले आहे. ते प्राधान्याने सोडवायला हवे. चक्रीवादळाने जोरदार आघात केल्याने कोकणी जनता मदतीच्या प्रतीक्षेत आहे. त्यांना मदतीचा हात मिळायला हवा.

टॅग्स :Lokmatलोकमतcycloneचक्रीवादळ