शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

साक्षीदाराचे संरक्षण हा कळीचा मुद्दा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 05:01 IST

भारतात २०१८ साली मा. सर्वोच्च न्यायालयाने महेंद्र चावला विरुद्ध भारतीय संघराज्य या खटल्यातील न्यायनिर्णयाने ‘साक्षीदार संरक्षण  कायदा’ अस्तित्वात आला.

शीला घोडेस्वार, सहाय्यक सरकारी अभियोक्ताउत्तर प्रदेशातल्या हाथरस घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा भारतीय न्यायसंस्थेतील अत्यंत महत्त्वाचा दुवा असलेला साक्षीदाराच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान उत्तर प्रदेश सरकारला हाथरस घटनेच्या साक्षीदारांना उत्तर प्रदेश सरकार कशी सुरक्षा प्रदान करेल याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करावयास सांगितले आहे. साक्षीदार तसेच गुन्ह्यातील पीडितांना धमकावणे त्यांच्यावर दबाव आणि प्रभाव टाकणे आपल्या देशात नवीन नाही. भारतात २०१८ साली मा. सर्वोच्च न्यायालयाने महेंद्र चावला विरुद्ध भारतीय संघराज्य या खटल्यातील न्यायनिर्णयाने ‘साक्षीदार संरक्षण  कायदा’ अस्तित्वात आला. परंतु त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्याची आवश्यकता प्रकर्षाने जाणवत आहे. साक्षीदार हा त्याने अनुभवलेली, पाहिलेली व त्याला माहीत असलेली वस्तुस्थिती मा. न्यायालयास अवगत करून देत असतो. बहुतांशी फौजदारी खटल्याचा निकाल साक्षीदारांच्या साक्षीवरच अवलंबून असतो. म्हणून बेंथॅम यांनी १५० वर्षांर्वीच म्हणून ठेवले आहे की, साक्षीदार हे न्यायाचे डोळे आणि कान आहेत. (विटनेसेस आर आइज अ‍ॅण्ड इअर्स ऑफ जस्टिस)

सध्या भारतात सर्वत्र साक्षीदारांची परिस्थिती समाधान व्यक्त करता येईल अशी नाहीये. जीवे मारण्याच्या धमकीच्या भीतीमुळे तसेच आरोपीच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक दबाव तसेच प्रभावामुळे अनेक खटल्यांमध्ये साक्षीदार सर्रास फितूर होताना दिसतात. अगदी जेसिका लाल खटल्यापासून ते त्याआधी व नंतरच्या काळातदेखील बऱ्याच खटल्यांमध्ये अशी परिस्थिती दिसून आलेली आहे.  नीलम कतारा विरुद्ध भारतीय संघराज्य या खटल्यात मा. सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे की, जर साक्षीदार न्यायालयात जिवाच्या भीतीने, कुणाच्या प्रभावाखाली किंवा कुणाच्या फायद्यासाठी साक्ष देत असतील तर यामुळे केवळ न्यायव्यवस्था कमजोरच होत नाही तर खिळखिळी होते आहे.

स्वरानसिंग विरुद्ध पंजाब राज्य या खटल्यात मा. न्यायमूर्ती वाधवा यांनी नमूद केले आहे की,  साक्षीदारांना न्यायालयात प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असतो. साक्षीदार लांबून स्वत:च्या खर्चाने साक्ष देण्यासाठी मा. न्यायालयात हजर राहतात; परंतु खटल्यात वेळोवेळी आरोपीकडून विविध कारणांमुळे तारखा घेतल्या जातात. शेवटी साक्षीदार कंटाळून न्यायालयात येणं बंद करतात किंवा फितूर होताना दिसतात. साक्षीदारांना न्यायालयात सन्मानजनक वागणूक दिली जात नाही. ते शिपायाद्वारे न्यायालय दालनाच्या बाहेर काढले जातात. तसेच त्यांना न्यायालयाच्या आवारात दिवसभर खटल्याच्या सुनावणीची वाट बघत थांबून राहावे लागते आणि शेवटी साक्ष नोंदविली न जाता पुढची तारीख आरोपीकडून घेतली जात असते. साक्षीदारांना किमान मूलभूत सुविधादेखील मिळत नाही. उदाहरणार्थ बसायला चांगली जागा व प्यायला पाणीही उपलब्ध केले जात नाही. सुनावणीदरम्यान साक्षीदारांची प्रचंड लांबलचक उलटतपासणी घेतली जाते. अशा अनेक कारणांमुळे सामान्य माणसे साक्षीदार होण्याचे टाळतात. यामुळे न्यायव्यवस्था कमकुवत होत आहे. मागील काही वर्षांत अनेक खटल्यांमध्ये जसे रमेश व इतर विरुद्ध हरियाणा राज्य, कृष्णा मोची विरुद्ध बिहार राज्य, झहिरा हबिबूल्ला शेख विरुद्ध गुजरात राज्य, साक्षी विरुद्ध भारतीय संघराज्य या व इतर अनेक खटल्यांत मा. सर्वोच्च तथा उच्च न्यायालयाने साक्षीदार फितूर होण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे साक्षीदार का फितूर होतात याची कारणमीमांसा करून हे टाळण्यासाठी सरकारने काय उपाययोजना करणे आवश्यक आहे याबाबतही निर्देश दिलेले आहेत. साक्षीदार संरक्षण कायद्याप्रमाणे साक्षीदारांना संरक्षण पुरविणे बंधनकारक आहे.

साक्षीदार संरक्षण कायद्याची प्रभावीरीतीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी शासन व प्रशासन यांच्याकडून प्रामाणिकपणे कार्यवाहीची अपेक्षा आहे. तसेच सामान्य जनतेतही या कायद्याबाबत जाणीव व जागृती होणे गरजेचे आहे. 

टॅग्स :advocateवकिलGovernmentसरकारCourtन्यायालय