शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

महाराष्ट्रात एका मांडवात दोन लग्नं होतील का?

By यदू जोशी | Updated: June 2, 2023 12:23 IST

लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक राज्यात एकाचवेळी होईल का, यावर सध्या राजकीय तर्कवितर्क सुरू आहेत. कोणाचे म्हणणे काय आहे?

यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत

लोकसभा व विधानसभेची निवडणूक एकाचवेळी होईल असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना वाटत आहे. ‘‘एकावेळी झाली काय अन् न झाली काय, आम्हीच जिंकणार’’, असं भाजपचे माजी संकटमोचक गिरीश महाजन सांगत आहेत. हो माजीच. कारण आता मंत्री रवींद्र चव्हाण हे नवीन संकटमोचक बनत आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर हा बदल झालाय. शिंदे गटाचे संजय शिरसाट यांना मात्र निवडणुका एकावेळी होणार नाहीत, असं वाटतं.

लोकसभा अन् विधानसभेचं लग्न एकाच मांडवात होईल का, हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. दिल्लीतून माहिती अशी आहे की, तसं काही होण्याची शक्यता आजतरी दिसत नाही. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असे दोनच पर्याय लोकांसमोर असावेत आणि त्या परिस्थितीत मोदी कधीही उजवे ठरतील, असा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा विश्वास आहे. हिंदुत्व, राममंदिर, कलम ३७०, गरिबांसाठीच्या योजना, विकास अन् समान नागरी कायदा (संभाव्य) हे मुद्दे भाजपच्या झोळीत भरभरून मतं टाकतील. एकत्रितपणे सामोरे गेले तर या मुद्द्यांना राज्य सरकारचे यशापयश, उद्धव ठाकरेंना असलेली सहानुभूती, राज्यातील राजकारणाचे जातीय संदर्भ असे अनेक विषय चिकटतील व त्यातून लोकसभेला नुकसान होऊ शकते. लोकसभा आधी घेतली तर मोदी विरुद्ध राहुल असा सामना होईल; पण एकत्र निवडणूक झाली तर मोदी-शिंदे-फडणवीस विरुद्ध राहुल-शरद पवार-उद्धव ठाकरे-नाना पटोले अशी लढत होईल. प्रतिमांचा कॅनव्हास असा पसरट करणे भाजप श्रेष्ठींना मान्य नसेल. एकत्र लग्नात खर्च वाचतो हे खरं, पण दोन्ही वऱ्हाडांकडे सारखं लक्ष न दिल्यास रुसवेफुगवे होऊ शकतात.  

एकत्र निवडणूक झाली तर मोदींच्या प्रतिमेचा फायदा विधानसभेसाठीही होईल हा एक तर्क आहे; पण त्याचवेळी राज्यातील समीकरणांचा फटका लोकसभेला बसू शकतो. एक असाही मतदार आहे की जो लोकसभेला मोदी म्हणून भाजपला मत देतो; पण विधानसभेला त्याची पसंती महाविकास आघाडीला असू शकते. एकाचवेळी दोन्ही फड ठेवले तर त्याचा गोंधळ होईल अन् दोन्ही मतं तो महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकेल, अशी शक्यतादेखील आहे. दिल्लीला तसा गोंधळ नको आहे. राष्ट्रवादीला तेच हवं आहे; म्हणून तर अजित पवार बोलत आहेत. मुख्य म्हणजे, शिंदे-फडणवीस सहा महिने आधी सत्ता का सोडतील? १९९९ मध्ये तशी चूक करून एकत्र निवडणुका घेतल्या; पण राज्यातली सत्ता गेली होती. त्या चुकीची पुनरावृत्ती करतील, अशी शक्यता कमी. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात शिंदे-फडणवीस सरकार असणं आवश्यक असेल. सरकार असलं की पोलिस, प्रशासन हातात, शिवाय नवीन आश्वासनं आणि त्यांच्या  पूर्ततेची खात्री देता येते.

डबल की ट्रबल इंजिन? 

लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही शिंदे-फडणवीस यांच्यासाठी परीक्षा असेल. यश मिळाल्यास त्याचा फायदा लोकसभेला होईल. राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जादाचे देण्याचा निर्णय गेमचेंजर ठरू शकतो. डबल इंजिनचं सरकार राज्यात हवंच, हा भाजपचा प्रचार असतो. लोकसभेवेळी सत्तेत असल्यासच  तसा प्रचार अधिक प्रभावीपणे करता येईल. कर्नाटकमधील प्रचारात काँग्रेसने केलेल्या पाच लोकाभिमुख घोषणांचा फायदा झाला. 

महाराष्ट्रात दहा मोठी आश्वासनं देण्याची योजना काँग्रेस आखत आहे. त्या संभाव्य आश्वासनांमधील हवा आधीच काढून टाकण्यासाठी येत्या चार-पाच महिन्यात शिंदे-फडणवीस सरकारकडून मोठमोठ्या घोषणा केल्या जातील. मोदींच्या चरणी ४२ जागा अर्पण करणं याला शिंदे-फडणवीस यांचं सर्वोच्च प्राधान्य असेल. डबल इंजिन सरकारचे फायदे भाजपकडून सांगितले जातील. महाविकास आघाडीकडून डबल इंजिनच्या सरकारविरुद्ध ‘‘हे तर ट्रबल इंजिनचं सरकार’’, असा प्रचार केला जाईल. 

भाजपकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडी खूप पुढे असल्याचे दिसते म्हणतात. त्यामुळे ही एकत्रित निवडणुकीची जोखीम घेण्याच्या मूडमध्ये भाजप नाही. निवडणूक जिंकणं हे शहरांची नावं बदलण्याइतकं सोपं थोडीच आहे?

स्फोट होईल; पण कुठे? 

महाविकास आघाडी अभेद्य असणं ही भाजपची सर्वात मोठी डोकेदुखी! त्यामुळे त्यात फूट पाडण्याची रणनीती आखली जात आहे. काही नेते नजीकच्या काळात भाजपच्या गळाला लागू शकतात. निरोपानिरोपी सुरू आहे. पहाटेचा शपथविधी झाला तसं पहाटेचं पक्षांतर होऊ शकतं. शिंदे गटाचे अनेक आमदार, खासदार संपर्कात आहेत; लवकरच मोठा स्फोट होईल, असा दावा ठाकरे गट करीत असला तरी ती पुडी आहे. स्वत:चे उरलेले आमदार, खासदार वाचवण्यासाठीची ही धडपड दिसते. उद्धव ठाकरे सध्या सहकुटुंब परदेशात आहेत. ते परतल्यानंतर त्यांच्या गटात आणखी स्फोट करण्याची तयारी मुख्यमंत्री शिंदे करत आहेत. 

परवा देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना भेटले अन् भाजप-शिवसेना-मनसे चर्चा सुरू झाली. तसं काहीही होणार नाही. मनसेविरोधात लढणं भाजपच्या अधिक हिताचं असेल. त्यानुसारच स्क्रिप्ट लिहिली जात आहे. भाजपच्या विजयाची ब्लू प्रिंट फडणवीस तयार करत आहेत, त्यात राज ठाकरे यांचा रोल ठरवला जात आहे. अर्थात राज गळाला लगेच लागतील इतके सोपे नाहीत.. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा सुरूच राहील!

टॅग्स :Electionनिवडणूकlok sabhaलोकसभाvidhan sabhaविधानसभा