शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

इंडेक्सेशन रद्द करणे फायद्याचे कसे, हे सरकार सांगेल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 10:06 IST

भांडवली नफ्यासंबंधीच्या बदलांमुळे सरकारच्या उत्पन्नात मोठी वाढ अपेक्षित आहे. इंडेक्सेशनची तरतूद रद्द करून कराचा दर कमी करणे करदात्यांच्या हिताचे आहे?

- अॅड. कांतीलाल तातेड, अर्थशास्त्राचे अभ्यासकयावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात भांडवली नफ्यावरील कर आकारणीत मोठ्या प्रमाणात बदल केलेले असून, स्थावर मालमत्ता विकल्यानंतर होणाऱ्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कर आकारणी करताना करदात्याला मिळणारी किंमत 'महागाई निर्देशांका'शी (कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स) निगडित (इंडेक्सेशनची) तरतूद रद्द केली असून, आता दीर्घकालीन भांडवली नफ्यावर करदात्यांना २० टक्क्यांऐवजी १२.५० टक्के दराने कर भरावा लागेल. यामागे कररचनेत सुसूत्रता आणण्याचा हेतू असल्याचे सरकार सांगत असले तरी भांडवली नफ्यासंबंधी केलेल्या बदलांमुळे सरकारच्या उत्पन्नात २० ते २५ हजार कोटी रुपयांची वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे इंडेक्सेशनची तरतूद रद्द करून कराचा दर २० टक्क्यांवरून १२.५० करणे करदात्यांच्या हिताचे आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

सतत वाढणाऱ्या महागाईमुळे मालमत्तेचे वास्तव खरेदीमूल्य कमी होत असते. त्यामुळे वाढत्या महागाईचा खरेदीमूल्यावर होणारा परिणाम प्रभावहीन करण्यासाठी स्थावर मालमत्ता विकल्यानंतर दीर्घकालीन भांडवली नफा काढताना मालमत्तेच्या खरेदी व विक्री दरम्यानच्या कालावधीत वाढलेल्या महागाईचा विचार करणे व इंडेक्सेशनच्या साहाय्याने वास्तव खरेदीमूल्य निश्चित करून भांडवली नफा ठरविण्याची व्यवस्था प्राप्तिकर कायद्यात करण्यात आलेली होती. वास्तव खरेदीमूल्याच्या आधारे भांडवली नफ्यावरील कराची आकारणी करणे हे मूलभूत तत्त्व आहे.

परंतु, सरकारने इंडेक्सेशनची तरतूद रद्द केल्यामुळे आता वास्तव खरेदीमूल्याऐवजी मूळ खरेदीमूल्याच्या आधारे दीर्घकालीन भांडवली नफा काढण्यात येणार असून, त्यामुळे भांडवली नफ्यात व त्यावरील करात मोठ्चा प्रमाणात वाढ होणार आहे. म्हणून सरकारने भांडवली कराचा दर जरी कमी केलेला असला तरी इंडेक्सेशनची तरतूद रद्द केल्यामुळे पूर्वीपेक्षा जास्त कर भरावा लागणाऱ्या करदात्यांची संख्या फार मोठी राहणार असून, सदरच्या बदलामुळे फायदा होणाऱ्या करदात्यांची संख्या त्यामानाने फार कमी असणार आहे.

सहजगत्या मिळणारे गृहकर्ज, नवीन सदनिकांमध्ये देण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या नव्या सुविधा तसेच मोठ्या शहरांमध्ये विक्रीवाचून पडून असलेल्या हजारो नवीन सदनिका यामुळे खरेदी करणाऱ्यांचा कल जुन्या सदनिकांऐवजी नवीन सदनिका विकत घेण्याकडे जास्त असतो. अशा जुन्या अगदी चार-पाच किमतीत फारशी वाढ होत नाही. त्यामुळे अशा सदनिका विकल्यास त्यांना इंडेक्सेशनमुळे कमी भांडवली कर भरावा लागत होता. परंतु, आता त्यांना वास्तव भांडवली नफा कमी झालेला असतानाही जास्त कर भरावा लागेल. त्यामुळे इंडेक्सेशनची तरतूद रद्द करणे हे भांडवली कर आकारण्याच्या मूलभूत तत्त्वाशी विसंगत व करदात्यांवर अन्याय करणारे आहे.

राज्य सरकार मुद्रांक शुल्काच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून बहुतांश वेळा सरकारी मूल्यांकात दरवर्षी दहा टक्क्यांपेक्षा जास्त दराने वाढ करते. परंतु, भांडवली कर काढण्यासाठीच्या किंमत महागाई निर्देशांकामध्ये (इंडेक्सेशन) होणारी वाढ ही बहुतांश वेळा चार-पाच टक्के इतकीच असते. भांडवली कराचा दर जरी कमी केला असला तरी इंडेक्सेशनची तरतूदच रद्द केल्यामुळे कराचा आणखी मोठा वाढीव बोजा पडणार आहे. एका साध्या उदाहरणाचा विचार करू, एक वर्षात बाजारमूल्यात समजा १०० रुपयांची वाढ झालेली असल्यास इंडेक्सेशनमुळे वास्तव खरेदीमूल्यातील वाढ साधारणतः ५० रुपये असेल. जुन्या पद्धतीप्रमाणे इंडेक्सेशनमुळे ५० रुपयांवर २० टक्के दराने १० रुपये, तर नव्या पद्धतीप्रमाणे १०० रुपयांवर १२.५० टक्के दराने १२.५० रुपये भांडवली कर भरावा लागेल. म्हणजेच करदात्याला नवीन पद्धतीमुळे २५ टक्के जास्त कर भरावा लागेल. अर्थात, मालमत्ता ग्रामीण भागात आहे की शहरी भागात आहे, तसेच शहराच्या कोणत्या भागात आहे, मालमत्तेच्या खरेदी व विक्रीमधील कालावधी किती आहे, या कालावधीत 'योग्य वाजारमूल्या'त किती वाढ झालेली आहे आदी अनेक बाबींच्या आधारे करभार निश्चित होणार असला तरी इंडेक्सेशनची तरतूद रद्द केल्यामुळे करदात्यांवरील करभार वाढणार हे निश्चित आहे.

टॅग्स :TaxकरBudgetअर्थसंकल्प 2024