शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
3
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यंवशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
4
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
5
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
6
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
7
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
8
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
9
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
10
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
11
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
12
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
13
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
14
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
15
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
16
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
17
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
18
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
19
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
20
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला

मुलांच्या पाठीवर आठ-दहा किलोचे ओझे कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2022 09:19 IST

नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या वजनाच्या दहा टक्के किंवा त्यापेक्षा कमी दप्तराचे वजन असायला हवे; पण हा नियम कोणीही पाळताना दिसत नाही. 

- टिळक उमाजी खाडे, माध्यमिक  शिक्षक, नागोठणे (जि. रायगड) 

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याची अधूनमधून चर्चा होत असते. न्यायालयाने काही वर्षांपूर्वी दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत.  शासनानेही यासंदर्भात काही उपाययोजना जाहीर केल्या. काही शाळांनीही यासंदर्भात काही प्रयोग केले;  पण अजून तरी म्हणावे तसे यश आले नाही. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्र्यांनी यासाठी पाठ्यपुस्तकालाच वहीची पाने जोडण्याचा अभिनव उपाय नुकताच सुचवला आहे. हा उपाय कितपत यशस्वी व व्यवहार्य ठरेल हे येणारा काळच ठरवेल ! सुप्रसिद्ध लेखक आर. के. नारायण जेव्हा पहिल्यांदाच राज्यसभेचे खासदार झाले तेव्हा त्यांनी  विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याचा मुद्दा राज्यसभेत मांडला होता. 

नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या वजनाच्या दहा टक्के किंवा त्यापेक्षा कमी दप्तराचे वजन असायला हवे; पण हा नियम पाळतो कोण? या नियमाची सर्रास व सर्वत्र पायमल्ली होताना दिसते. लिहिणे म्हणजे अभ्यास या पारंपरिक कल्पनेला छेद द्यायला हवा. त्यासाठी पालकांची व शिक्षकांची मानसिकता बदलायला हवी. इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळा तसेच राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा व इतर मंडळाच्या शाळा यांच्यात एक अदृश्य स्पर्धा सुरू झाली आहे. विद्यार्थी परीक्षार्थी असावा की ज्ञानार्जन करणारा असावा याचे प्रामाणिक उत्तर आपण कधी व कसे शोधणार? विद्यार्थ्यांच्या पाठीवरील आठ-दहा किलो वजनाचे दप्तराचे ओझे पाहून मुले शाळेत शिकायला जातात की दमायला जातात, असा प्रश्न पडतो !दप्तराच्या ओझ्यामुळे मुलांमध्ये आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. भविष्यात मान, पाठीचा कणा  इत्यादी व्याधी विद्यार्थ्यांमध्ये बळावू शकतात. दप्तराच्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांची उंची वाढण्यास अडथळे निर्माण होत आहेत.  वाढत्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांची उभे राहण्याची पद्धतच बदलली आहे. किंबहुना या वाढत्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांची शारीरिक ठेवण बदलत आहे असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.

विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा केल्यावर दप्तराचे ओझे वाढण्याची अनेक कारणे पुढे आली.  मोठ्या आकाराची जाडजूड वह्या-पुस्तके, वाढलेले विषय व त्यामुळे वाढलेली वह्या-पुस्तके, प्रकल्प वह्या, संस्थेने वा शाळेने खासगी प्रकाशकांशी ‘हातमिळवणी’ करून विद्यार्थ्यांच्या माथी मारलेल्या अनावश्यक नोंदवह्या व कृतिपुस्तिका, लोहचुंबक असलेले जड पेन्सिल बाॅक्स, दप्तरात कोंबलेली खासगी शिकवणीची वह्या-पुस्तके, पाण्याची जड व मोठी बाटली, जेवणाचे २ - २ डबे, जड स्कूल बॅग्ज यांसारख्या अनेक बाबींच्या एकत्रित परिणामामुळे दप्तराचे ओझे वाढते.  

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी काही सर्वमान्य उपाय सुचवावेसे वाटतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूर्वप्राथमिक विभागाची (नर्सरी, शिशूवर्ग इत्यादी) शाळा ‘दप्तरविरहित’ असावी. इयत्ता आठवीपर्यंत आठवड्यातून एक दिवस ‘दप्तरमुक्त  शाळा’ असावी. काही शाळांनी हा प्रयोग केला आहे व तो यशस्वीही झाला आहे. साधारणपणे २० वर्षांपासून शिक्षण विभागाने पहिली ते बारावीपर्यंतची पुस्तके मोठ्या आकारात काढली आहेत. त्यांचा आकार पुन्हा कमी करावा. सर्वच पाठ्यपुस्तकातील अनावश्यक धडे, माहिती, चित्रे, आकृत्या, तक्ते कमी करावेत. फक्त महत्त्वाच्या बाबींचाच पाठ्यपुस्तकात अंतर्भाव करावा. त्यामुळे पाठ्यपुस्तकातील पानांची संख्या आपोआप कमी होईल.  प्रत्येक इयत्तेसाठी सत्रनिहाय पाठ्यपुस्तकाची रचना करावी. पाठ्यपुस्तकाचे वजन निम्म्याने कमी होईल ! 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Schoolशाळा