शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

शाळांना कुलुपे ठोकायची बेजबाबदार घाई कशासाठी?

By अतुल कुलकर्णी | Updated: January 15, 2022 10:11 IST

दोन वर्षे झाली, आज आदेश निघतो आणि उद्यापासून शाळा बंद होतात. मुले साधीसाधी कौशल्ये गमावून बसली आहेत, त्यांच्या नुकसानाला जबाबदार कोण?

- अतुल कुलकर्णी

एका गावात शाळा सुरू होती. मुले शिकत होती. शिक्षक त्यांना शिकवत होते. त्याच गावात शहरातले काही पर्यटक आले. त्यांनी शाळा सुरू असलेली पाहून थेट शिक्षकांनाच प्रश्न केला. ‘शाळा बंद करण्याचा निर्णय असताना तुम्ही शाळा कशी काय सुरू केली..?’ शिक्षक उलट उत्तर देऊ शकले असते, ‘की, काहो, पर्यटनावर बंदी असताना तुम्ही कसे फिरायला आलात..?’ मात्र त्यांनी तसे केले नाही. एकाच आठवड्यात असा प्रश्न त्या शिक्षकास किमान दहा लोकांनी केला. शेवटी त्यांनी ती शाळा कोणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी सुरू केली. काही दिवसांनी गावातल्या काही उडाणटप्पू लोकांनी ती शाळा बंद केली. 

ही घटना महाराष्ट्रातील एका छोट्या गावात घडलेली आहे. आई-वडिलांसोबत मुले मॉलमध्ये  फिरायला गेलेली चालतात. मात्र, तीच मुले शाळेत आल्यानंतर त्यांना कोरोना कसा होतो.., असा प्रश्न  मुंबईतल्या पालकांच्या गटाने केला होता. जे लोक  कामधंदा करून घरी येतात; ते कोरोना घेऊन येत नसतील कशावरून..? त्यांच्यामुळे मुले बाधित होत नसतील का? कोरोना काय फक्त शाळेत गेल्यानंतरच होतो का?  या आणि अशा अनेक प्रश्नांनी सध्या जागृत पालकांना त्रस्त करून सोडले आहे. शाळा चालू झाल्या पाहिजेत. मुलांचे शिक्षण व्यवस्थित झाले पाहिजे, असे वाटणाऱ्या पालकांची व शिक्षकांची संख्या खूप मोठी आहे. मात्र, कोणालाही हा प्रश्न गंभीरपणे सोडविण्याची इच्छा नाही. ग्रामीण भागात अत्यंत वाईट परिस्थिती आहे.

गेली दोन वर्षे, आज आदेश निघतो आणि उद्यापासून शाळा बंद होतात. एक शिक्षिका पोटतिडकीने सांगत होत्या, ‘त्यांच्या चौथीच्या मुलांना त्यांना तिसरीचे शिक्षण द्यावे लागत आहे. तेदेखील मुलांना कळत नाही.’ एका गावात तर ‘शाळा सुरू का राहिल्या?’ अशी विचारणा करणारे अर्ज माहिती अधिकारात आले. त्यामुळे चांगले शिक्षकही विनाकारण भानगड नको म्हणून काम करायलाच तयार नाहीत.  शाळा बंद असल्यामुळे चारचौघांत वागण्याचे कौशल्य मुले गमावत चालली आहेत. संवादाची क्षमता  हरवत चालली आहेत.नर्सरीसारख्या वर्गात मुले एकत्र येतात, एकमेकांशी बोलतात, त्या बोलण्यातून त्यांची बोलण्याची क्षमता विकसित होते. ती प्रक्रिया गेली दोन वर्षे पूर्णपणे ठप्प झाली आहे. एकाग्रतेने काम करण्याची क्षमता, लेखनाची  क्षमता मुले विसरून गेली आहेत. दोन तासही मुले एका जागी स्थिर बसू शकत नाहीत. मानसिक ताण घेण्याची क्षमता  नष्ट होत चालली आहे.  

चांगल्या दर्जाचे मोबाईल असंख्य पालकांकडे नाहीत. तीस मिनिटांचे लेक्चर झाले पाहिजे, असा सरकारी खाक्या! मात्र, त्या तीस मिनिटांत अनेक वेळा इंटरनेट कनेक्शन कट होते. काही जिल्ह्यांतील मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतःच्या ईगोपलीकडे काहीही बघायला तयार नाहीत. त्यांची स्वतःची मुले जर अशा परिस्थितीतून गेली असती तर त्यांनी काय केले असते, असा सवाल  जिल्हा परिषदेच्या एका शिक्षिकेने अत्यंत पोटतिडकीने केला.

ग्रामीण भागात वेगळेच प्रश्न आहेत. तेथे मुलांची संख्या कमी झाली तर त्या शाळा बंद करण्याचा सरकारचा जुना निर्णय आहे. आज मुलांची संख्या कमी झाल्याचे कारण दाखवून अनेक शाळा जर भविष्यात बंद केल्या गेल्या तर ग्रामीण भागात शिक्षणच उपलब्ध होणार नाही. जेथे मुले कमी आहेत त्या ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवून शाळा चालू शकतात. मात्र ‘सब घोडे बारा टक्के’ याप्रमाणे सगळ्याच शाळांना सारखे नियम लावले जात आहेत. शाळा होत नाहीत हे लक्षात आल्यानंतर ग्रामीण भागातील पालक मुलांना शेतीच्या कामाला जुंपू लागले आहेत. शिक्षकांच्या बाबतीतही अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांची शिकवायची सवयच सुटत चालली आहे. ज्यांना चांगले शिकवायचे आहे, ज्यांना स्वतः अध्ययन आणि वेगळे प्रयोग करायचे आहेत, ते शिक्षक अस्वस्थ आहेत.

परदेशात आपल्यापेक्षा रुग्ण संख्या कितीतरी जास्त आहे. मात्र त्या ठिकाणच्या शाळाही सुरू आहेत. आपल्याकडे असे अजब निर्णय का घेतले जातात? याचे उत्तर सरकार, शिक्षण विभाग आणि शिक्षणमंत्री कोणीही ठामपणे देत नाही. इतकी विदारक स्थिती कधीही पाहायला मिळाली नव्हती. गेली दोन वर्षे शाळा बंद आहेत. याचे परिणाम ही मुले जसजशी मोठी होत जातील तसतसे जाणवू लागतील.  त्यांच्या मानसिकतेवर होणारे परिणाम या मुलांचे पुढचे सगळे आयुष्य धोक्यात आणणारे ठरतील, अशी भीती मानसोपचार तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. कोणीतरी याकडे गंभीरपणे पाहणार आहे का..?

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा