शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

देवाच्या दारी भक्त आणि ‘व्हीआयपी’ यांना वेगळा न्याय का?

By नंदकिशोर पाटील | Updated: January 31, 2026 11:29 IST

Devotees: अतिविशिष्ट व्यक्ती, ‘दर्शन पास’ विकत घेणारे आणि देणगीदारांना तत्काळ प्रवेश; पण सामान्य भाविकांनी मात्र रांगेत तिष्ठत उभे राहायचे, हे थांबायला हवे.

- नंदकिशोर पाटील(संपादक, लोकमत, छत्रपती संभाजीनगर)

कोणतेही तीर्थक्षेत्र असो, सामान्य भाविकांच्या लांबच लांब रांगा सर्वत्र दिसतात. तासन‌्तास उभे राहणे, उन्हापावसाची पर्वा न करता प्रतीक्षा करणे आणि अखेर काही क्षणांचेच दर्शन मिळणे, हा अनुभव बहुसंख्यांचा. याच रांगांच्या शेजारून मात्र ‘अतिमहत्त्वाच्या व्यक्ती’ विनासायास आत जातात. सुरक्षा, प्रोटोकॉल, प्रतिष्ठा अशी कारणे दिली जातात; पण या सवलतींमुळे समाजमनात निर्माण होणारी अस्वस्थता दिवसेंदिवस तीव्र होत आहे.

उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरातील व्हीआयपी दर्शन आणि गर्भगृह प्रवेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. धार्मिक विधी आणि मंदिरातील प्रवेशाचे नियम ठरवणे हा न्यायालयीन विषय नसल्याचे सांगत, न्यायालयाने मंदिर व्यवस्थापनाच्या स्वायत्ततेला महत्त्व दिले. हा निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्य असला, तरी त्यातून निर्माण होणारा सामाजिक प्रश्न मात्र दुर्लक्षित करता येणार नाही.

देवाच्या दरबारात सगळे समान असतात, ही संकल्पना भारतीय समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जाणिवेत खोलवर रुजलेली आहे.  प्रत्यक्षात चित्र वेगळे दिसते. व्हीआयपी दर्शन, विशेष पास, प्राधान्य रांगा या सगळ्या सोयी धर्माच्या समतेच्या तत्त्वाशी विसंगतच. न्यायालयाने हस्तक्षेप न करण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्यामुळे हा प्रश्न संपत नाही; उलट तो न्यायालयाबाहेर अधिक ठळकपणे उभा राहतो.

समस्या केवळ धार्मिक स्थळांपुरती मर्यादित नाही. अजिंठा-वेरूळ सारखी जागतिक पर्यटन स्थळे, किल्ले, राष्ट्रीय उद्याने, विमानतळ, रेल्वे स्थानके आदी सर्वत्र ‘विशेष’ लोकांसाठी वेगळी दारे उघडी असतात. लोकशाही व्यवस्थेत सर्व नागरिक समान असतात, ही घोषणा कागदावर असते; प्रत्यक्षात मात्र श्रेणीव्यवस्था प्रकर्षाने दिसते. धार्मिक स्थळांमध्ये ही विषमता अधिक बोचरी ठरते, कारण येथे श्रद्धा आणि समतेचा दावा केला जातो. ‘देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी | तेणें मुक्ति चारी साधियेल्या’ असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. तुकोबांच्या या ओळी केवळ भक्तीचा उत्कट भाव व्यक्त करत नाहीत, तर देवाच्या दारातील समतेचा मूलभूत संदेशही देतात. दरवर्षी लाखो वारकरी अनवाणी पायाने चालत पंढरीची वारी करतात. गर्दीमुळे मंदिरात जाता आले नाही तरी लांबूनच कळसाचे दर्शन घेऊन धन्यता मानतात. तासन‌्तास रांगेत उभे राहून गर्भगृहापर्यंत पोहोचलेल्या वारकऱ्यांसह मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना आषाढी-कार्तिकी महापूजेचा मान दिला जातो. वारकरी संप्रदायातील ही समानता इतरत्र मात्र अभावानेच आढळते. देवाच्या द्वारी उभे राहणे हेच मुक्तीचे साधन मानले गेले, तर त्या द्वारी ‘विशेष’ आणि ‘सामान्य’ असा भेद कसा स्वीकारायचा? 

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात न्यायालयीन संयम दाखवला आहे. धार्मिक संस्थांच्या अंतर्गत व्यवस्थापनात हस्तक्षेप टाळणे, ही घटनात्मक मर्यादा न्यायालयाने अधोरेखित केली. पण त्याच वेळी सुधारणा न्यायालयाकडून नव्हे, तर समाजातून आणि व्यवस्थापनातून यायला हव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. आज अनेक धर्मस्थळांमध्ये व्हीआयपी दर्शन हे श्रद्धेचे नव्हे, तर प्रतिष्ठेचे साधन बनले आहे. देणगीच्या नावाखाली जलद दर्शन, विशेष पूजा, गर्भगृह प्रवेश दिला जातो.

हा प्रकार सर्वसामान्य भाविकांना चीड आणणारा आहे. अतिविशिष्ट व्यक्तींच्या सुरक्षेचा मुद्दा व्यवस्थापनाकडून पुढे केला जातो. तो मान्य केला तरी त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था केली जाऊ शकते. सामान्य भाविकांना त्यांच्यासाठी तासन‌्तास तिष्ठत ठेवणे कितपत योग्य? 

न्यायालयाने हस्तक्षेप न केल्यामुळे आता जबाबदारी थेट मंदिर व्यवस्थापन, सरकारे आणि समाजावर येऊन ठेपली आहे. व्हीआयपी संस्कृतीवर मर्यादा घालायची की नाही, दर्शन व्यवस्थेत पारदर्शकता आणायची की नाही, समानतेचा भाव प्रत्यक्षात उतरवायचा की नाही हे प्रश्न आता न्यायालयात नव्हे, तर सार्वजनिक चर्चेतून आणि लोकदबावातून सुटले पाहिजेत.

देवाच्या दारातही ‘प्रोटोकॉल’च महत्त्वाचा ठरणार असेल, तर लोकशाहीतील समतेचा दावा कुठे उरतो? सर्वोच्च न्यायालयाने कायदेशीर सीमारेषा आखून दिली आहे. त्या सीमारेषेपलीकडे जाऊन समतेचा भाव प्रत्यक्षात उतरवण्याची नैतिक जबाबदारी आता मंदिर व्यवस्थापन, सरकारे आणि समाजावर आहे.     nandu.patil@lokmat.com

English
हिंदी सारांश
Web Title : VIP Treatment at Temples: Is God's Court Unequal?

Web Summary : VIP treatment in temples raises equality questions. Court's non-intervention shifts responsibility to temple management, government, and society to address discrimination and ensure fairness for all devotees.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र