शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

या बुवाला हे संरक्षण कशासाठी?

By admin | Updated: November 26, 2014 00:42 IST

तो मंत्री नाही, राजकीय पुढारी नाही आणि ज्याच्या जीवाला धोका उद्भवू शकेल असा कोणी समाजपुरुष नाही. स्वत:ला संत म्हणवून घेणारा तो एक साधा बाबा आहे

तो मंत्री नाही, राजकीय पुढारी नाही आणि ज्याच्या जीवाला धोका उद्भवू शकेल असा कोणी समाजपुरुष नाही. स्वत:ला संत म्हणवून घेणारा तो एक साधा बाबा आहे आणि त्याच्यासारखे शेकडो बाबा देशात गर्दी करून आहेत. रामदेवबाबासारखी सुरक्षा सरकार आणखी कोणाकोणाला देणार आहे?
गविद्येचे राष्ट्रीय विक्रेते बाबा रामदेव यांना ‘ङोड’ दर्जाची सुरक्षा प्रदान करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय जेवढा आश्चर्यकारक तेवढाच तो संशयास्पद व राजकीयही आहे. लोकसभेच्या निवडणुकीत या बाबाने भारतीय जनता पक्षाच्या बाजूने प्रचार केला व त्या दरम्यान गाता येईल तेवढी नरेंद्र मोदींची आरतीही गायली. त्या प्रचारादरम्यान त्याची जीभ नको तशी बरळताना दिसली तेव्हा भाजपानेच त्याच्या सभांवर बंदी आणली. सभांची परवानगी संपली तरी तो सोनिया-राहुल-प्रियंका व काँग्रेस यांच्याविरोधात कमालीची निंद्य भाषा बोलत राहिला. ‘निवडणूक संपली की सोनिया व तिच्या कुटुंबातले सारेजण देश सोडून पळणार व इटलीचा आश्रय घेणार’ अशी बाष्कळ भाषा वापरण्यार्पयत त्याची योगविद्या निम्न पातळीवर उतरलेली देशाला दिसली. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे राजकीय पराभव सोनिया गांधींनी पाहिले आहेत. त्यांच्या वाटय़ाला आलेले हिंसक मृत्यूही त्यांनी पचविले आहेत. तेवढय़ावरही त्या ठामपणो काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करीत देशात निर्भयपणो वावरताना सा:यांना दिसल्या आहेत. त्या धाडसी महिलेविषयी अशी अश्लाघ्य भाषा वापरणारा इसम ‘योगगुरू’ म्हणविणारा असणो हाच मुळात पतंजलीच्या थोर परंपरेचा अपमान ठरावा.. प्रश्न या बाबाला सरकार कुणापासून संरक्षण देऊ इच्छिते हाही आहे. त्याचा शिष्य परिवार मोठा आहे. त्यात धनवंतांपासून राजकारण्यांर्पयतचे आणि वयोवृद्धांपासून युवा वर्गार्पयतचे सारे आहेत. त्याच्या योगवर्गाना जमणारी गर्दी देशाने दूरचित्रवाहिन्यांच्या पडद्यावर पाहिलीही आहे. तो जोवर नुसता योग प्रसार करीत होता तोवर त्याला कुणी विरोध करण्याचे कारण नव्हते. पण योगवर्गाला येणारे आपले शिष्य हे आपले राजकीय अनुयायीही आहेत असा भ्रम त्याच्या डोक्यात शिरला तेव्हा त्याला राजकारणाचे वेध लागले. अण्णा हजारे यांच्या आंदोलनात तो प्रथम सहभागी झाला तेव्हाच ‘स्वच्छ देहात स्वच्छ मन आणि स्वच्छ मनात स्वच्छ देश’ अशी थेट राजकीय वळणाची भाषा तो बोलू लागला. त्याच वेळी त्याचे सोनिया गांधी आणि काँग्रेस यांच्याविषयीचे फुत्कारही सुरू झाले. परंतु अण्णांच्या आंदोलनात आपल्याला फारसा भाव नाही हे लक्षात येताच तो त्यापासून दूर झाला आणि त्याने स्वत:चे वेगळे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन सुरू केले. त्यासाठी त्याने दिल्लीच्या रामलीला मैदानावर आपल्या भगतगणांसह ठाण मांडले. त्याला हुसकावून लावायला पोलिसांचे ताफे आले त्या वेळी पोलिसांना गुंगारा द्यायला तो लुगडे नेसून पळाला आणि महिलांच्या गर्दीत दडला.. योगविद्येने त्याला फारसे मानसिक सामथ्र्य दिले नाही याचाच तो पुरावा ठरला.. त्यावरची त्याची बेशरम उक्ती ही, की लुगडे नेसून पळण्यामागे शिव छत्रपतींच्या गनिमी काव्याचे अनुकरण होते. इतिहासात छत्रपतींच्या अशा भित्र्या पलायनाचा कोठे पुरावा नाही. 
जोर्पयत हा बाबा योग प्रसार करीत होता तोर्पयत याला सुरक्षा लागली नाही. तो राजकारणात शिरला आणि त्याला तिची गरज वाटू लागली. त्याच्या राजकारणाचा रोख काँग्रेसवर असल्याने व सोनिया गांधींविषयी कोणतेही बेछूट विधान करण्याएवढा उद्दाम उथळपणा त्याच्याजवळ असल्याने भाजपाच्या पुढा:यांनाही त्याच्याविषयी त्या काळात विशेष जवळीक वाटू लागली. या बाबाला पोलिसांनी तुरुंगात डांबले तेव्हा त्या कारवाईविरुद्ध गदारोळ करण्यासाठी ज्या परिवाराने आपली सारी शक्ती एकवटली तो परिवारही भाजपाचाच होता. रामदेवबाबाने हजारो कोटींची माया योगाच्या विक्रयातून व आपल्या कारखान्यातील औषधांच्या विक्रीतून उभी केली. ही औषधे प्रमाणित, की अप्रमाणित याची शहानिशा पूर्वीच्या सरकारला करता आली नाही आणि आताचे सरकार तर या बाबाकडून उपकृतच झाले आहे. या उपकाराची फेड म्हणून आता त्याला ङोड प्रतीची सुरक्षा या सरकारने प्रदान केली आहे. तो मंत्री नाही, राजकीय पुढारी नाही आणि ज्याच्या जीवाला धोका उद्भवू शकेल असा कोणी समाजपुरुष नाही. स्वत:ला संत म्हणवून घेणारा तो एक साधा बाबा आहे आणि त्याच्यासारखे शेकडो बाबा देशात गर्दी करून आहेत. रामदेवबाबाला दिलेली सुरक्षा आताचे सरकार आणखी कोणाकोणाला देणार आहे? रामपाल नावाच्या अशाच एका बाबाने सरकारी सुरक्षेऐवजी स्वत:चाच कमांडो फोर्स आपल्या भोवती उभा केला व पुढे या फोर्सनेच आपल्याला बंदी बनवून ठेवल्याचे त्याने न्यायालयाला परवा सांगितले. 
प्रश्न हा, की समाजसेवेचे निष्काम व्रत घेतलेल्या योगाचार्याला सुरक्षा हवी कशाला? नौखालीत धार्मिक दंगलीचा वणवा चहूबाजूंनी पेटला असताना गांधी नावाचा नि:श माणूस त्यात आपल्या चार-सहा अनुयायांसह शांती प्रस्थापित करीत असलेला या देशाने पाहिला आहे. त्याने भारत सरकारची वा त्या वेळी नव्यानेच निर्माण झालेल्या पाकिस्तान सरकारची सुरक्षा मागितली नाही. त्या सरकारांनी देऊ केली असती तरी त्याने ती घेतलीही नसती. त्याचे आत्मबलच एवढे मोठे होते, की हातात झाडू घेऊन त्याने नौखालीची आग शमविलेली देशाने पाहिली.. नक्षली हिंसाचाराने ग्रासलेल्या क्षेत्रत समाजसेवेचे कंकण बांधून राहणारी अभय बंग किंवा प्रकाश आमटे यांसारखी माणसे नि:शच असतात. त्यांना पोलिसांचे साधे संरक्षणही नसते. मृत्यूचे आव्हान सातत्याने आ वासून समोर उभे असतानाही ते असे संरक्षण मागत नाहीत आणि त्यांना ते द्यावे असे सरकारलाही वाटत नाही. याखेरीज गुंडांच्या धमक्या, अपहरणाची धास्ती आणि तशाच इतर जीवघेण्या भयाखाली वावरणा:या माणसांना सरकार असे संरक्षण कधी देत नाही आणि ते कोणी मागितले तर त्याचा मोबदला वसूल करण्याबाबत ते जागरूकही असते.. अक्षरश: एकेका राज्यातील हजारोंच्या संख्येने तरुण िया आज बेपत्ता आहेत आणि अपहरण झालेल्या मुलांची संख्याही जिल्हावार शंभरावर जाणारी आहे. ज्यांच्या घरची माणसे अशी बेपत्ता झाली त्यांनी त्या अपहृतांच्या शोधासाठी नंतर आकांत केला असला, तरी त्या अपहरणाआधीही त्यांना त्याचे भय होतेच. अशी किती माणसे जिवाच्या आकांतानिशी आतार्पयत पोलिसात पोहोचली आणि त्यातल्या कितीजणांना सरकारने ‘ङोड’ सोडा पण साधे संरक्षण तरी दिले? जे मुळात सुरक्षित आहेत, ज्यांच्या सुरक्षेची काळजी घेणा:या शिष्यगणांचा मोठा समुदाय त्यांच्याभोवती सदैव उभा आहे आणि ज्यांची मिळकत व मालमत्ता त्यांचे संरक्षण करण्याएवढी सक्षम वा भक्कम आहे त्यांना ङोड सुरक्षा देऊन सरकार समाजात सुरक्षितांची नवी जमात जन्माला घालू इच्छिते काय, हा यातला खरा व कळीचा प्रश्न आहे. 
(व्यंगचित्र साभार)
 
सुरेश द्वादशीवार
संपादक, लोकमत, नागपूर