शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी शाळांची दुरवस्थेला जबाबदार कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:47 IST

- नंदकिशोर पाटीलखासगी मालकीच्या कंपन्यांना शाळा उघडण्याचा परवाना देण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय थेट ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराची आठवण करून देणारा आहे. सामाजिक, भाषिक आणि भौगोलिक सलोखा मजबूत करणारी पारंपरिक शिक्षणपद्धती मोडीत काढून कंपनी सरकारसाठी राबणारे कारकून तयार करणारी शिक्षण प्रणाली लॉर्ड मेकॉलेंनी या देशात आणली आणि दुर्दैेवाने ती आजही ...

- नंदकिशोर पाटीलखासगी मालकीच्या कंपन्यांना शाळा उघडण्याचा परवाना देण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय थेट ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराची आठवण करून देणारा आहे. सामाजिक, भाषिक आणि भौगोलिक सलोखा मजबूत करणारी पारंपरिक शिक्षणपद्धती मोडीत काढून कंपनी सरकारसाठी राबणारे कारकून तयार करणारी शिक्षण प्रणाली लॉर्ड मेकॉलेंनी या देशात आणली आणि दुर्दैेवाने ती आजही तशीच चालू आहे. फरक झालाच असेल, तर तो एवढाच की, सरकार शिक्षणातील गुंतवणुकीतून आपला हात बाजूला काढून घेऊ पाहात आहे. शिक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीचा परतावाच दिसत नसेल तर मग जाहिरातबाजी कशी करणार? हे त्यामागचे मूळ कारण आहे. आपल्याकडच्या सरकारी शाळांना गुणवत्ता, रिटर्न्स आणि मानांकन, यासारखे औद्योगिक निकष लावून उठसूठ विद्यार्थ्यांची बौद्धिक कुवत आणि गुरुजनांची परीक्षा पाहण्याची सध्या नवीच टूम निघाली आहे. हाच निकष पुढे करून जिल्हा परिषदांच्या १३१४ शाळांना कायमचे टाळे लावण्यात आले. वाड्या-तांड्यावरील, भटक्यांच्या पालांवरील एकशिक्षकी शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ज्या उद्योगी घराण्यांनी फक्त नावापुरत्या ‘इंटरनॅशनल’ असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा उघडल्या त्यांच्या दर्जाचे काय आणि त्यांना कोणते निकष लावले जातात, हे एकदा तपासण्याची गरज आहे. तसेही आपल्याकडे शैक्षणिक गुणवत्ता मोजण्याचे परिमाण गुणांकनांच्या पलीकडे जात नाही. विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक, शारीरिक आणि मानसिक विकास हा केवळ गुणांवर नव्हे, तर कौशल्यावर मोजला जावा, हे रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनचे सूत्र आपल्याकडे असताना आपण तथाकथित पाश्चिमात्य ‘ग्रेड’च्या मागे धावू लागलो आहोत. हे करत असताना फ्रान्स, जर्मनी, जपान आणि चीनमध्ये आजही मातृभाषेतूनच शिक्षण दिले जाते आणि तिकडच्या सर्व शाळा या सरकारी मालकीच्या आहेत, हे आपण सोईस्करपणे विसरतो. आपल्याकडच्या सरकारी शाळांची आज दुरवस्था झाली असेल, तर त्यास जबाबदार कोण? ज्या देशात कधीकाळी तक्षशिला, नालंदा यासारखी विश्वविख्यात विद्यापीठं होती, त्या देशातील शिक्षणाची आपण पुरती ‘शाळा’ करून टाकली आहे! जे जे पाश्चात्त्य ते ते चांगले, हे आपल्या मनावर बिंबवण्यात मेकॉले खरंच केवढा यशस्वी झाला! आपणास पुन्हा तेच करायचे आहे का? कॉर्पोरेट कंपन्यांना शाळा उघडण्यास तशी कुणाची हरकत असण्याचे कारण नाही, फक्त तिथे गरीब विद्यार्थ्याला प्रवेश घेण्याची मुभा असेल का, हा खरा प्रश्न आहे. सरकारने कितीही हमी घेतली तरी, आपल्याकडचा शासकीय कारभार पाहता ते शक्य होईल, असे ठामपणे सांगता येत नाही.

 

टॅग्स :MumbaiमुंबईSchoolशाळा