शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

वाचन संस्कृती समृद्ध करण्याची जबाबदारी नक्की कोणाची?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 13:13 IST

सरकारने पुस्तकांची दुकाने समजा दिली थाटून, तर मग साहित्यसेवेसाठी सरकारनेच ती चालवण्याचीही जबाबदारी घ्यावी, असे आपण म्हणणार आहोत काय?

- श्रीपाद भालचंद्र जोशी, ज्येष्ठ लेखक

‘‘बारा कोटींच्या महाराष्ट्रात पुस्तकांची दुकाने किती? - फक्त पन्नास’’ हा वसंत भोसले यांचा लेख (लोकमत, २९ जुलै) वाचला.  सरकारने ‘गाव तिथे एसटी’प्रमाणे एस. टी. स्टॅण्ड तिथे ललित पुस्तकांच्या विक्रीची दुकाने स्थापून द्यावीत, ही मागणी ‘गाव तिथे ग्रंथालय’ इतकी  म्हणजे सुमारे चाळीस वर्षांहूनही अधिक जुनी आहे. महाराष्ट्रात गावांची संख्या एकूण ४१००० आहे. राज्य निर्माण होऊन त्रेसष्ट वर्षे झाल्यानंतरही ग्रंथालयांची संख्या १२ हजार ७०० वर सरकलेली नाही. हा वेग काय दर्शवतो? हे कोणाचे अपयश? 

शासनस्तरावरच्या पुस्तकांच्या खरेदीच्या दर्जा व गुणवत्ता यावर कोणाचे किती नियंत्रण आहे? किती ग्रंथखरेदी ही अधिकाधिक टक्केवारी देणाऱ्या ग्रंथांची होते? ७०-८०-९० टक्के कमिशन कोणत्या दर्जाच्या पुस्तकांवर दिले जाते? यासाठी पुस्तकांच्या मूळ किमती कशा वाढवल्या जातात? सरकारी यादीतील २५ टक्के पुस्तके विकत घेण्याचे बंधन असते, त्या यादीसाठी  पुस्तके निवडणाऱ्यांचा दर्जा, गुणवत्ता काय असते?  त्या यादीत पुस्तके  कशी येतात, कशी आणली जातात, कोणती नेमकी का गाळली जातात? १२ हजार ७०० ग्रंथालयातून एकूण सभासद संख्या किती, त्यात वाढ किती, घट किती, त्यातले मुळात वाचक किती, कोणत्या प्रकारच्या पुस्तकांचे वाचक किती याचे कोणते समग्र सर्वेक्षण, संशोधन, अध्ययन कोणी कधी केले आहे? 

या व अशा सर्व बाबींचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून शासनाने एकूणच ग्रंथ संस्कृतीसंबंधाने एक श्वेतपत्रिका काढावी आणि त्यानंतर त्या अध्ययनावर आधारित राज्याचे ग्रंथ, ग्रंथालय धोरण ठरवावे. लेखक, प्रकाशक, वितरक, वाचक, वाचन संस्कृतीच्या प्रचार प्रसारासाठी परस्परावलंबी असणाऱ्या सर्व घटकांच्या समन्वयाचाही विचार व्हावा.  १२ हजार ७०० ग्रंथालयांच्या ग्रंथसेवकांना साधी वेतन श्रेणी देण्याचा प्रश्न कोणतेही सरकार गेल्या ५० वर्षांपासून नुसत्या समित्यामागून समित्या नेमून  जिथे मार्गी लावू शकले नाही ते ४१ हजार गावात काय ग्रंथालये स्थापणार? 

या राज्याने ग्रंथालय चळवळीचा सुवर्ण काळ बघितला आहे. त्यावेळी शासनाचे ग्रंथालय संचालनालय, ग्रंथालय चळवळ चालवणारा महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, त्याच्या विभागीय, जिल्हा, तालुक्यातील शाखा, विभागीय, जिल्हा शासकीय ग्रंथालये, त्यांचे अधिकारी, प्रकाशक, वितरक, शाळा - महाविद्यालये, वृत्तपत्रे, विभागीय साहित्य संस्था या साऱ्यांचा आपसात मोठा सुसंवाद होता. परस्परांच्या सहकार्याने गावोगावी, खेडोपाडी ग्रंथ प्रदर्शनांच्या आयोजनासाठी उत्साहाने राबणारे अधिकारी, कर्मचारी होते. पुस्तकांचे प्रकाशन समारंभ होते, त्यांचे वृत्त सविस्तर देणारी वृत्तपत्रे होती. ग्रंथ समीक्षणे भरभरून येत होती. शासनाची वाहने चळवळीसाठी उपलब्ध होती. राज्य निर्मितीनंतर सुमारे तीन दशके हा उत्साह होता. प्रत्यक्ष पुस्तक विक्रीला या साऱ्या बाबी मिळून पूरक असतात, हे भान होते. वाचन संस्कृतीचा विकास होत होता, तो कोणत्याही एका घटकामुळे नव्हे तर या साऱ्यांच्या  सामूहिक प्रयत्नांमुळे! 

- आज यातल्या साऱ्यांमध्ये काडीचाही संवाद नाही. सुसंवाद फार दूरची गोष्ट! वाचक संख्येने फार मोठा नसूनही एकेकाळी पुस्तकांची आवृत्ती किमान हजार-पाचशेची तर होतीच होती. काहींची दोन, तीन हजारांचीही! आज तो आकडा शंभरावर आला आहे. त्यातही ऑन डिमांडची सोय आहेच!  इंटरनेट, मोबाईल, नेटफ्लिक्स व तत्सम आणि हातातील बहुमाध्यमी उपकरणानंतर लोकच आपली अभिव्यक्ती करू लागले, स्वतः लिहिलेले देखील पुनः न वाचताच पुढे सरकवू लागले. या बदलत्या विश्वाला कवेत घेणारी धोरणेच तयार करण्याची गरज राज्याला वाटेनाशी झाली. जाहिरातदार आणि राज्यकर्त्यांसाठी सोयीचा समाज निर्माण करणे हे एकमेव धोरण उरले. त्यात व्यक्तीला समृद्ध करणारे वाचन, ग्रंथ, ग्रंथालये समृद्ध करणे कसे बसणार? shripadbhalchandra@gmail.com