शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

जोश आहे की नाही...! ‘आहे ना सर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 04:12 IST

डॉ. गोपाळराव देशमुख मार्गावरचा फिल्म्स डिव्हिजनचा जुनाट परिसर... वातावरणात नवीन तजेला... एरव्ही सिनेमापेक्षा सरकारी फायलीसदृश गोष्टीची लगबग असलेल्या या परिसराला शनिवार दुपारपासूनच एक वेगळाच रंग चढला होता.

मुंबई : डॉ. गोपाळराव देशमुख मार्गावरचा फिल्म्स डिव्हिजनचा जुनाट परिसर... वातावरणात नवीन तजेला... एरव्ही सिनेमापेक्षा सरकारी फायलीसदृश गोष्टीची लगबग असलेल्या या परिसराला शनिवार दुपारपासूनच एक वेगळाच रंग चढला होता. निमित्त होते भारतीय सिनेमाच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनाचे आणि तेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते.यजमान असलेले केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याचे राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांची लगबग सुरू होती. मनोज कुमार, आशा भोसले, जितेंद्र, रणधीर कपूर, रमेश सिप्पी, आमिर खान, ए.आर. रहमान, बोनी कपूर, परिणिती चौप्रा यांचे स्वागत झाले आणि मग आगमन झाले, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे. त्यांच्यासोबत राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल, प्रसून जोशी आदी मंडळी होती.मोदी यांनी संग्रहालयाचे उद्घाटन केल्यानंतर संपूर्ण संग्रहालय फिरून पाहिले. गांधी आणि सिनेमा यावरील प्रदर्शनात त्यांनी विशेष रस दाखविला. संग्रहालयात ठेवण्यात आलेली जुनी सामुग्री त्यांनी आवर्जून पाहिली आणि मग ते नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रेक्षागृहात उपस्थितांशी संवाद साधण्यासाठी दाखल झाले.सिनेमा आणि समाज हे एकमेकांचे प्रतिबिंब आहे, असे सांगत भारतीय चित्रपट संस्कृतीचे जतन आणि संवर्धन ही काळाजी गरज आहे. ते करण्यासाठी हे संग्रहालय महत्त्वाचे काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हागणदारी मुक्त भारत, क्रीडा, महिला सक्षमीकरण आदी विषयांसह सामाजिक विषयांवरही सिनेमे तयार होत असून, त्यांना चांगला प्रेक्षकवर्ग लाभत आहे, असे निरीक्षणही मोदी यांनी नोंदविले.सिनेमा चित्रीकरणासाठी लागत असलेल्या परवानग्या लवकरच एका वेब पोर्टलवर मिळणार आहे, तसेच दाओसमध्ये होत असलेल्या आंतरराष्ट्रीय उद्योग परिषदेच्या धर्तीवर, भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट परिषद घेण्याचा विचार सरकार करत असल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले.पंतप्रधानांनी उपस्थितांमधील सिनेमाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन, त्यांना ‘काय जोश आहे की नाही....’ असे विचारले आणि त्याला ‘होय सर...’ असा प्रतिसाद मिळाला. व्यासपीठावरील कार्यक्रम संपल्यावर मोदी आवर्जून सिनेसृष्टीतील बुजुर्गांची विचारपूस करण्यासाठी खाली उतरले आणि मनोज कुमार, आशा भोसले, किरण शांताराम आदींशी संवाद साधत त्यांनी उपस्थितांचा निरोप घेतला.