शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

कुठं नेऊन ठेवलाय रिपोर्ट माझा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 03:39 IST

​​​​​​​इंद्रलोकचा स्टार रिपोर्टर मनकवडे ... एमके... अर्थात आपला यमके आज खूपच डिस्टर्ब होता.

- राजा मानेइंद्रलोकचा स्टार रिपोर्टर मनकवडे ... एमके... अर्थात आपला यमके आज खूपच डिस्टर्ब होता. यावेळी इंद्रदेवांना काय आणि कसा रिपोर्ट द्यावा, या मुद्याने त्याच्या मेंदूचा खुळखुळा झाला होता. अखेर त्याने आपले गुरू नारदमुनींना व्हॉटस्अ‍ॅपवर मेसेज देऊन सल्ला घ्यायचे ठरवले. मोबाईलवर व्हॉटस्अ‍ॅप मेसेज लिहायला सुरूवात केली...गुरुवर्य नारदसर यांसी,साष्टांग दंडवत,मराठीभूमीचा आँखो देखा हाल इंद्रदेवांना काय रिपोर्ट सादर करावा याविषयी आपल्या मार्गदर्शनाची मला गरज आहे गुरुवर्य ! रिपोर्टमध्ये काय लिहावे हेच मला कळेनासे झाले आहे. अहो, तटकरेंच्या सत्काराला देवेंद्रभाऊ गेले नाहीत, त्या दिवसापासून जे घडतंय त्याचं विश्लेषण कोण करणार? काल परवा त्या ‘पद्मावती’ बरोबर आमच्या मराठमोळ्या भांडांच्या बाबाचा ‘दशक्रिया’ आणि जाधवांचा ‘न्यूड’ सिनेमा भरडला गेला. साहेब देवेंद्रभाऊंना ‘बालीश’ म्हणून थांबले नाहीत तर ते चक्क कपाशीवरील बोंड अळीचा मागोवा घ्यायला विदर्भात पोहोचले. इकडे आमच्या अजितदादांनी पण देवेंद्रभाऊंना आपल्या स्टेजवर न बोलवायची प्रतिज्ञा केली. साहेब व उद्धव यांची भेट उभ्या महाराष्ट्राला ‘भेटी लागी जीवा ठरली’. काय काय म्हणून सांगू नारदसर तुम्हाला? खड्ड्यांचं अवघड ‘कोडं’ सोडवता सोडवता आमचे बच्चू पाटील बेजार झाले आहेत. तिकडे राजसाहेब वेताचा फोक घेऊन फेरीवाल्यांच्या पाठी दौडता दौडता वेगळा विदर्भ होऊ देणार नाही असे म्हणतात. राज्यातील गुरुजन विनोदभाऊंच्या ‘कपटी सासू’ भूमिकेमुळे मेटाकुटीस आले आहेत. एका विद्यार्थ्यावर होणाºया ९६ हजार रुपये खर्चाचे व्हाऊचर आता थेट संस्था चालकांनाच देण्याची भाषा ते करू लागलेत. हे कमी होते म्हणून की काय अहो, राहुलबाबा ‘पप्पूृ’ नसून आता दमदार नेते बनत असल्याचा साक्षात्कार आपल्या साहेबांना झाला आहे. कोकणनरेश दादा गुडघ्याला बाशिंग बांधून तिष्ठत आहेत. आता सरसकट कर्जमाफी साहेबांनीच होऊ दिली नाही, अशी दवंडी सुभाषबापू पिटू लागले आहेत. आता सांगा या सगळ्यांचा इंद्रदेवाला काय रिपोर्ट देऊ.(गुरुवर्य नारदांनी शिष्य यमकेला लगेचच उत्तर दिले....)नारद : शिष्या फक्त एका ओळीचा रिपोर्ट दे २०१९ च्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे...

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarayan Raneनारायण राणे