शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

कुठे चाललीत बौद्ध समाजातील लग्ने?

By admin | Updated: June 4, 2015 23:12 IST

आंबेडकरी चळवळीचा परिणाम म्हणून शहरातील बौद्ध समूह आज बंगल्यात राहायला गेला. बौद्ध कुटुंबात जिथे उच्चशिक्षित अभावाने दिसत होते तिथे बौद्ध कुटुंबात दोन-चार सदस्य उच्चशिक्षित दिसू लागले.

आंबेडकरी चळवळीचा परिणाम म्हणून शहरातील बौद्ध समूह आज बंगल्यात राहायला गेला. बौद्ध कुटुंबात जिथे उच्चशिक्षित अभावाने दिसत होते तिथे बौद्ध कुटुंबात दोन-चार सदस्य उच्चशिक्षित दिसू लागले. आंबेडकरी चळवळीचे ध्येय दलित समाजाचा आर्थिक विकास करणे हेच आहे. तेव्हा शहरी बौद्ध समाजाची आर्थिक उन्नती झाली असेल तर ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे याविषयी दुमत नको. पण कालचा श्रमजीवी बौद्ध समाज आजचा मध्यमवर्गीय झाल्यामुळे मध्यमवर्गाचे सर्व गुणधर्म त्याच्यात आले. आता हा वर्ग तोंडाने आंबेडकरवाद जरी सांगत असला, तरी आंबेडकरी विचारांशी त्याची नाळ केव्हाचीच तुटली आहे. आत्मकेंद्रित झालेल्या बौद्ध मध्यमवर्गीयांची ‘बहुजन हिताय - बहुजन सुखाय’ या ऐवजी ‘स्वहिताय - स्वसुखाय’ अशी स्वार्थप्रेरित अप्पलपोटी घोषणा झाली आहे. राखीव जागेमुळे प्रस्थापित व्यवस्थेत त्याने आपले एक स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे दीन-दुबळ्या दलित समाजावर अन्याय करणाऱ्या व्यवस्थेशी त्याचे आता कुठलेच भांडण राहिलेले नाही. सबब मध्यमवर्गीय खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी तो आता चुकीच्या प्रथा-परंपरा रूढ करीत आहे ही बाब चिंताजनकच म्हटली पाहिजे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक नवा समतावादी आदर्श समाज निर्माण करण्यासाठी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. धम्म स्वीकारल्यानंतर बौद्ध समाजाने जीर्ण व समाजघातकी परंपरांना नाकारणारी एक आदर्श अशी बौद्ध सांस्कृतिक जीवनपद्धती निर्माण करणे अपेक्षित होते; पण असे झाले नाही. बौद्ध म्हणविणाऱ्यांचे एकूण वर्तन काही अपवाद वगळता हिंदू रूढी-परंपरांना अनुसरूनच होत आहे, याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे बौद्ध समाजातील लग्नविधींचे होय. हिंदू समाजातील हुंडा प्रथेमुळे कितीतरी तरुणींना हुंडाबंदीचा कायदा असतानाही सासरच्या मंडळीकडून शारीरिक - मानसिक छळ सोसावा लागतो, प्रसंगी जीव गमवावा लागतो अशा स्वरूपाच्या बातम्या - घटना नित्यही ऐकण्या-वाचण्या- पाहण्यात येत असतात. हिंदू समाजातील हीच जीवघेणी हुंड्याची चाल आता बौद्ध समाजातही आली आहे. इकडेही आता हुंड्याचे भाव ठरू लागले आहेत. लाखोंनी हुंडा दिला-घेतला जात आहे. प्रश्न असा की, बौद्ध समाजातही जी हुंडा प्रथा मूळ धरीत आहे ती कोणत्या फुले-आंबेडकरवादात बसते आणि कोणती आदर्श बौद्ध संस्कृती निर्माण करते हा विचार करण्यासारखाच प्रश्न नाही काय? हिंदू समाजातील हुंडा प्रथेमागे एक फसवे का असेना; पण लबाड तर्कशास्त्र तरी आहे, ते असे की, आमच्या मुलाला शिक्षणासाठी अमुक इतका खर्च आला आहे तेव्हा तुमची मुलगी सुखात राहावयाची असेल तर तुम्ही अमुक इतका हुंडा दिला पाहिजे किंवा नोकरी लावण्यासाठी तमुक इतके पैसे दिले पाहिजेत. अथवा एखादा फ्लॅट घेऊन दिला पाहिजे वा सोने-नाणे घातले पाहिजे. जणू मुली या हवा-पाण्यावरच वाढलेल्या असतात वा मुलींना वाढविण्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी वधूपित्याला काही खर्चच आलेला नसतो; पण प्रश्न असा की, बौद्ध तरुण जेव्हा हुंड्याची अपेक्षा ठेवतात वा हुंडा घेतात तेव्हा त्यांनी त्यांच्या शिक्षणासाठी कोणता वैयक्तिक खर्च केलेला असतो? सबब हुंड्याची प्रथा ज्या गतीने रुजत आहे ती पाहता भविष्यात बौद्ध समाजातही हुंडाबळी पडू शकतात. हा सामाजिक धोका समाजातील शहाण्या-सुरत्यांच्या लक्षात का येऊ नये?बौद्ध समाजासाठी कुठलीही आदर्श लग्न नियमावली नसल्यामुळे लग्नपत्रिकांवर विशेष पाहुणे म्हणून काही तथाकथित बड्यांची नावे टाकण्यात येतात. लग्नाची वेळ टळली तरी उपस्थितांना ताटकळत ठेवून तथाकथित प्रतिष्ठितांचे सत्कार सोहळे करण्यातच दोन-तीन तास घालवितात. मंत्री-आमदार-खासदार असेल तर ते येईपर्यंत लग्न लावण्यात येत नाही. मग किती का वेळ लागेना. पण असे वागताना चार-दोन तथाकथित प्रतिष्ठितांसाठी बहुसंख्य उपस्थितांना दुय्यम-तिय्यम ठरवून त्यांचा कळत-नकळत आपण अपमानच करीत असतो याचे भान संबंधिताना राहत नाही. लग्नात श्रीमंतीचे उर्मट प्रदर्शन करणे, बँडबाजाच्या तालावर चार घोट घेऊन नाचत-डुलत येण्यामुळे लग्न वेळेवर न लागणे, लग्नात अन्न-पाण्याची नासाडी होणे हे सारे प्रकार घडत असतात; पण गंभीर बाब अशी की, जातिव्यवस्थेला स्थान नसणारा बौद्ध धम्म स्वीकारणारे बौद्धानुयायी पूर्वाश्रमीच्या पोटजाती पाळून पोटजातीतच लग्ने करतात (काही अपवाद) यास काय म्हणावे? मध्यमवर्गीय बौद्धांकडे चार पैसे असल्यामुळे स्वत:च्या बडेजावाचे प्रदर्शन करण्याकडे जर त्यांचा कल असेल तर ते मानवी स्वभावासच धरून आहे; पण प्रश्न असा की, हिंदू समाजातील हुंडा प्रथा स्वीकारणे, पोटजाती पाळणे, कर्मकांडे करणे या परंपरा जर आपण पाळत असू तर मग हिंदू जीवन पद्धतीत व बौद्ध जीवन पद्धतीत फरक तो काय राहिला? शिवाय बौद्ध भिक्खूसंघ, धम्मपरिषदा आयोजित करणारे महाउपासक बौद्धांसाठी आदर्श अशी विवाह आचारसंहिता का तयार करू शकत नाहीत? किमान हुंडा फेम लग्नास भिक्षू संघ वा धम्म प्रचाराचे कार्य करणारे महाउपासक हजर राहणार नाहीत, अशी भूमिका तरी संबंधितांनी का घेऊ नये? - बी. व्ही. जोंधळे