शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पेंडॉल ठोकायचा तरी कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 06:46 IST

यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याचे बेत आखले जात असतानाच रस्त्यांवर मंडप ठोकण्यास मनपानं मनाई केल्याची बातमी आली.

यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याचे बेत आखले जात असतानाच रस्त्यांवर मंडप ठोकण्यास मनपानं मनाई केल्याची बातमी आली. एरवी हिंदुत्वाच्या नावानं शिमगा (सामना नव्हे!) करणाऱ्यांची सत्ता मनपात असताना, असा निर्णय झालाच कसा? हा लाख मोलाचा (अर्थात, देणगीचा) प्रश्न असल्याने ‘राज’गडावरील एका शिष्टमंडळानं ‘वर्षा’वर धडक दिली. रविवारची सुटी असल्याने सीएम घरीच होते. कुटुंबीयांसमवेत टीव्हीवरील कार्यक्रम पाहण्यात दंग असतानाच, मनसैनिकांनी दार ठोठावलं. ‘कोण आहेऽऽ?’ सीएमच्या गृहमंत्र्यांनी आतूनच जरा रागानं विचारलं. बाहेरून उत्तर न येता दारावर पुन्हा नुसतीच टकटक झाली. ‘कोण आहे रे तिकडेऽऽ?’ सीएमचा त्रासिक स्वर ऐकून माजघरातून एक शिपाई धावत-पळत आला. ‘बघ जरा कोण आलंय बाहेर’ साहेबांचा आदेश शिरसावंद्य मानून मागच्या दारानं शिपाई बाहेर पडला आणि गेल्या पावली परत आला. ‘साहेब, मनसेचं शिष्टमंडळ आलंय!’ शिपायाने माहिती पुरवली. ‘काय काम आहे?’ सीएमच्या या उपप्रश्नाचं शिपायाकडे उत्तर नव्हतं त्यामुळे ‘विचारून येतो’ म्हणत ते परत मागच्या दाराकडे निघाले. ‘आधीच का नाही विचारलंत?’-सीएम. ‘सरकारी काम असंच असतं साहेब. जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. पाय धुवा म्हंटलं की फक्त पायचं धुवायचे...!’ शिपायाच्या या उत्तराने वैतागलेल्या सीएमनी रागारागानं रिमोट आपटला, सोफ्यावर टाकलेले पाय बाजूला केले आणि बाजूच्या टेबलावर ठेवलेले जॅकेट अंगात चढविले. तेवढ्यात शिपाई आला. ‘साहेब ते गणपतीची...’ शिपायाचं बोलणं पूर्ण होण्यापूर्वीच सीएम ओरडले, ‘अरे गणपतीची वर्गणी मागायला हेच ठिकाण सापडलं का त्यांना? लोकांना हल्ली काळ, वेळ, स्थळाचं काही भानच राहिलेलं नाही. कामधंदा काही करायचा नाही अन् ऊठसूठ वर्गणी...वर्गणी...!’संडेमूडचा असा पार विचका झाल्यामुळे सीएमचा चांगलाच मूडआॅफ झाला होता. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून शिपायानं फ्रीजमधल्या थंडगार पाण्याचा ग्लास त्यांच्या पुढ्यात ठेवला. गटागट पिऊन सीएमंनी तो एका दमात संपविला आणि दार उघडण्याची सूचना केली. ‘वर्षा’चं दार किलकिलं होताच ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ’चा गजर करत मनसैनिकांचं शिष्टमंडळ आत घुसलं. ‘हे कोण?’ शिष्टमंडळाचं नेतृत्व करणाºया केस वाढविलेल्या एका तरण्याबांड पोराकडं बघून सीएमंनी विचारलं. ‘ज्युनिअर राज!’ एकानं ओळख करून दिली. ‘बोला, काय काम काढलंत?’ सीएमनी मुद्याला हात घातला. ‘साहेब, यंदा आम्ही पेंडॉल कुठे ठोकायचा?’ शिष्टमंडळाच्या म्होरक्यानं मोठ्या ठेचात विचारलं. ‘काय प्रॉब्लेम आहे? कुठेही ठोका...म्हणजे जागा मिळेल तिथे ठोका!’ त्यावर मनपातील एक मनसैनिक पुढे सरसावत म्हणाला, ‘पण साहेब, जागोजागी मेट्रोची कामं सुरू आहेत. सगळे रस्ते उखडलेत...जागा उरलीय कुठे?’थोडा वेळ शांतता पसरली. ‘हे बघा, हा मनपाचा प्रश्न आहे. सगळे सणवार उत्साहात साजरे झाले पाहिजेत ही राज्य सरकारची भूमिका आहे’-सीएमंनी खुलासा केला.‘आम्हीही तेच म्हणतोय; पण पेंडॉल ठोकायचा कुठे?’-मनसैनिकांचा समूहसूर.‘या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बांद्र्यात मिळेल तिकडे जा!’ सीएमचं उत्तर ऐकून शिष्टमंडळानं काढता पाय घेतला म्हणे!- नंदकिशोर पाटील

टॅग्स :Ganpati Utsavगणपती उत्सवganpatiगणपती