शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

एकटी गुरमेहर.. विरोधातला आवाज बुलंद करते तेव्हा...!

By admin | Updated: March 3, 2017 23:54 IST

सोशल मीडियावर दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी गुरमेहर कौरने ‘मी अभाविपला घाबरत नाही’, असा विरोधातला आवाज बुलंद केला.

सोशल मीडियावर दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी गुरमेहर कौरने ‘मी अभाविपला घाबरत नाही’, असा विरोधातला आवाज बुलंद केला. तिच्या पाठीशी सुरुवातीला कोणीही उभे नव्हते. समाजमाध्यमांवर सर्रास दादागिरी करणाऱ्या संतप्त भक्तांनी तर तिला बलात्काराच्या धमक्या देण्यापर्यंत मजल गाठली. स्वयंघोषित देशभक्तांच्या वेशातले तथाकथित गुंड मुळात भेदरट असतात. तंत्रज्ञानाचा फायदा उठवीत ते स्वत:ची ओळख लपवतात. गुरमेहर कोणत्याही संघटनेची प्रतिनिधी नव्हती, तिने एकटीने आवाज उठवण्याचे धाडस केले. एखादी एकटी व्यक्ती जेव्हा साऱ्या शक्तिनिशी असा आक्रोश खुलेपणाने व्यक्त करते, तेव्हा गर्दीच्या आवाजापेक्षाही तो आवाज अधिक परिणामकारक ठरतो. गुरमेहरचा आवाज मोठा ठरला, कारण केंद्र सरकारमध्ये गृहराज्यमंत्रिपद भूषवणाऱ्या किरण रिजिजूंना त्यावर प्रतिक्रिया द्यावीशी वाटली. दुसरे मंत्री हंसराज अहिर यांना तर या घटनेत परकीय हात दिसू लागला. खरं तर या मंत्रिद्वयांनी गुरमेहरच्या धाडसाचे कौतुक करीत तिच्या पाठीशी उभे राहायला हवे होते. त्यांच्या प्रतिक्रिया इतक्या दुर्दैवी होत्या की, अवघे केंद्र सरकार गुरमेहरच्या विरोधात उभे असल्याचा संदेश ध्वनित झाला.सोमवारी अभाविपने (संभवत: स्वत:च्या बचावासाठी) तिरंगा यात्रेचे आयोजन केले. याच सुमारास केवळ सत्ताधाऱ्यांबाबत आपल्या निष्ठा सिद्ध करण्यासाठी, क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, कुस्तीपटू बबिता फोगट, सिनेअभिनेता रणदीप हुडा आदिंनी ट्विटरवर गुरमेहरला शहाणपणा शिकवण्याचा खटाटोप केला. भाजपाचे खासदार प्रताप सिन्हा तर थेट दाऊद इब्राहिमशी गुरमेहरची तुलना करून मोकळे झाले. या तमाम आक्रमणांचे मंगळवारी दिल्लीत तीव्र पडसाद उमटले. ‘अभाविपच्या गळचेपीपासून विद्यापीठांना वाचवा’ अशी हाक देत दिल्ली विद्यापीठ, जेएनयू, जामिया मिलिया विद्यापीठातले हजारो विद्यार्थी आणि प्राध्यापक रस्त्यावर उतरले. ‘देशाच्या लोकशाहीपेक्षा तुमचा राष्ट्रवाद मोठा नाही’ असे फलक त्यांच्या हातात होते. दिल्लीच्या रामजस कॉलेजमध्ये अभाविप आणि आॅल इंडिया स्टुडण्ट्स असोसिएशन (आयसा)मध्ये गेल्या बुधवारी संघर्ष उद्भवला, तेव्हापासून देशभरातील विद्यापीठे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. राजधानी दिल्लीत विद्यार्थी संघटनांचा संघर्ष केवळ क्रिया प्रतिक्रियांपुरता मर्यादित नाही. देशाच्या राजकारणाच्या दशदिशाही त्याने व्यापलेल्या आहेत. वर्षभरापूर्वी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात, स्वयंघोषित देशभक्तांनी देशविरोधी घोषणा झाल्याचा आरोप करीत त्यावर प्रश्नचिन्ह उभे केले. पाठोपाठ सरकारने काही विद्यार्थ्यांवर राजद्रोहाचा खटला दाखल केला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आझादी मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर सरकारनेच अशी दडपशाही सुरू केल्यामुळे त्याचे पडसाद उमटणे स्वाभाविक होते. रामजस कॉलेजमध्ये त्याचीच पुनरावृत्ती वर्षभरानंतर झाली. जेएनयू प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्याचा निकाल येण्यापूर्वीच त्यातील आरोपींना राजरोस देशद्रोही ठरवणे चुकीचे आहे. जेएनयू प्रकरणात चर्चेत आलेल्या उमर खालिदला रामजस कॉलेजने चर्चासत्रासाठी बोलावले. लगेच अभाविपने आंदोलन सुरू केले. वस्तुत: कोणालाही परस्पर देशद्रोही ठरवण्याचा अधिकार अभाविपला नाही. म्हणूनच हा मुद्दा वादग्रस्त आहे.लेडी श्रीराम कॉलेजची विद्यार्थिनी गुरमेहर कौरने या घटनेनंतर अभाविपला आव्हान देणाऱ्या मजकुरासह आपले छायाचित्र फेसबुकवर टाकले. देशासाठी बलिदान केलेल्या सैन्यदलातील शहीद फौजीची गुरमेहर ही कन्या. प्रस्तुत प्रकरणात एकटीने आवाज बुलंद केल्यानंतर, गुरमेहर आता थांबली आहे. ती म्हणते, ‘मला जे सांगायचे होते, ते सांगून झाले, माझी भूमिका व्यक्तिगत नव्हती तर विद्यार्थ्यांसाठी होती. माझ्या धाडसावर ज्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले, त्यांना एकच गोष्ट मी सांगू इच्छिते की, क्षमतेपेक्षा बरीच हिंमत मी दाखवली. यापुढे धमक्या अथवा हिंसेचा मार्ग निवडणाऱ्यांना दहा वेळा विचार करावा लागेल’ गुरमेहरला जे शक्य होते, ते तिने करून दाखवले, आता हा लढा पुढे नेण्याचे काम इतरांचे आहे. या प्रसंगाच्या निमित्ताने महात्मा गांधींचे स्मरण झाल्याशिवाय रहात नाही. स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश राजसत्तेविरुद्ध शस्त्राविना अहिंसक मार्गाने लढण्याची हिंमत गांधींनीच समस्त भारतवासीयांना दिली होती. राजसत्तेच्या भीतीपासून सामान्यजनांना मुक्त करण्याचे महत्त्वाचे काम गांधींच्या संदेशातून झाले होते. गुरमेहरने आपल्या संदेशात गांधीजींचेच अनुसरण केले. ती म्हणते, ‘माझ्या वडिलांच्या मृत्यूला पाकिस्तान नव्हे तर दोन देशातले युद्ध जबाबदार आहे. युद्ध झालेच नसते तर माझे पिता आज माझ्या जवळ असते. उभय देशात शांतता नांदावी यासाठी मी संघर्ष करते आहे. द्वेषाला विराम देणे खूप अवघड असते. पित्याच्या मृत्यूनंतर ही शिकवण आईने मला दिली.’ गुरमेहरच्या या संदेशाचा अर्थ स्वयंघोषित देशभक्तांना कितपत समजला कल्पना नाही. कारण त्यांनी तिच्या विरोधात काहूर उठवले आहे. २४ वर्षांच्या या तरुणीने मात्र गांधीजींच्या सिद्धांताची सर्वांनाच आठवण करून दिली आहे. गुरमेहरच्या विरोधातले सूर सुरुवातीपासून तीव्र होते. तिच्या समर्थनासाठी मात्र स्वयंस्फूर्तीने विद्यार्थी आणि प्राध्यापक उभे राहिले. लेडी श्रीराम कॉलेजच्या इंग्रजी विभागातल्या प्राध्यापकांनी गुरमेहरचे समर्थन करणारे निवेदन जारी केले. आता या प्राध्यापकांचा छळ सुरू झाला तर कोणाला आश्चर्य वाटणार नाही. रामजस कॉलेजमध्ये संघर्ष का उद्भवला, दगडफेक कोणी केली, पोलीस यंत्रणा त्यावेळी काय करीत होती, याची चौकशी सुरू आहे. चौकशीतून काही निष्पन्न होईल की नाही, याचे उत्तर आज कोणापाशी नाही. लोकशाही व्यवस्थेत कायदा आपले काम करीतच असतो. तथापि व्यवस्था आणि सरकार एकतर्फी वागू लागले तर शांततापूर्ण मार्गाने विरोध कोणी कसा करावा, हे ठरवण्याचा अधिकार सरकारला नक्कीच नाही.गुरमेहरने सध्या शांत रहाण्याचे ठरवले आहे. दिल्लीतून ती जालंधरला रवाना झाली आहे. तिचे काम तिने केले. आता सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांचा विरोध करण्यासाठी अनेक आवाज बुलंद झाले आहेत. मंगळवारी दिल्लीत अभाविपच्या विरोधातला मोर्चा त्याचेच प्रतीक होता. आपले मत खुलेपणाने व्यक्त करण्याआधी प्रत्येक तरुणीला स्वत:शी व त्यानंतर सभोवतालच्या समाजव्यवस्थेशी झगडा करावा लागतो. भारतात तरुण मुलींच्या मनातली हिंसेची भीती दूर करण्याची जबाबदारी खरं तर सरकारची आहे. अन्यायाच्या विरोधात तरुण मुली आणि महिला जगभर रस्त्यांवर उतरत आहेत. शनि शिंगणापूरचे मंदिर, मुंबईतल्या हाजीअलीच्या दर्ग्यात महिलांच्या मुक्त प्रवेशासाठी झालेले आंदोलन महिलांनीच केले होते. सरकार कोणाचेही असो, आंदोलनकारी तरुणींचे, महिलांचे म्हणणे नेमके काय आहे, याकडे सरकारने अधिक संवेदनशीलतेने लक्ष दिले पाहिजे. सरकारचे मंत्रीच अशा प्रकरणात अप्रस्तुत विधाने करू लागले तर या देशाचा प्रवास फॅसिझमच्या दिशेने तर सुरू झाला नाही, अशी शंका येऊ लागते. संसदेच्या बजेट अधिवेशनाचे दुसरे सत्र गुरुवारी सुरू होते आहे. रामजस कॉलेज प्रकरणासह गुरमेहरला मिळालेल्या धमक्यांचे पडसाद या अधिवेशनात उमटणारच आहेत. पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून देशातल्या तमाम खासदारांनी हा विषय अधिक समंजसपणे हाताळावा, अशी अपेक्षा आहे.-सुरेश भटेवरा(राजकीय संपादक, लोकमत)