शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

यंत्रांच्या तालावर नाचायची वेळ येईल, तेव्हा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 06:41 IST

सतत बदलत्या प्रगत तंत्रज्ञानाचा आपल्या आयुष्यावर कसा परिणाम होईल? आपली जीवनशैली कशी बदलेल? याचा आढावा घेणारी पाक्षिक लेखमाला..

- अच्युत गोडबोले, ख्यातनाम लेखक, 

सहलेखिका- आसावरी निफाडकर

आज आपले बहुतांशी आर्थिक व्यवहार, संवाद, ठरावीक दैनंदिन व्यवहार हे डिजिटल झाले आहेत. पण अर्थातच, हे एका रात्रीत घडलेलं नाही. १८वं शतक ते २१वं शतक यात अनेक तंत्रज्ञानांची भर पडत गेली आणि आपल्या जीवनशैलीचा भाग बनत गेली. १९५०-६०च्या दशकात मर्यादित ऑफिसेस आणि कामांसाठी उपयोगी पडणारा कॉम्प्युटर, पर्सनल कॉम्प्युटरच्या रूपात सर्वसामान्यांच्या घरात शिरला. कॉम्प्युटर्सच्या आगमनामुळे माणसाच्या आयुष्याला प्रचंडच वेग आला. आधुनिक कारखाने उभे रहायला लागले. टेलिकम्युनिकेशन्स, लेझरचा विकास, ऑप्टिकल फायबर अशा अनेक तंत्रज्ञानांचा झपाट्यानं विकास होत असल्यानं आपण या डिजिटल युगाकडे आपोआपच ओढले गेलो. 

आता पुढे काय? हा प्रश्न सध्या अनेकांना सतावतो. उद्याचं जग कसं असेल? उद्याचं तंत्रज्ञान कसं असेल? असे प्रश्न आपल्याला अनेकदा पडतात. याचाच आढावा आपण या मालिकेत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.माणसाच्या अनेक स्वप्नांपैकी एक स्वप्न म्हणजे ‘यंत्रांना आपल्या तालावर नाचवणे’. आतापर्यंत आपण यंत्रांची मदत घेत होतो. पण यापुढे आपण पूर्णपणे यंत्रांवरच अवलंबून राहणार आहोत. त्याला अनेक तंत्रज्ञानं कारणीभूत ठरणार आहेत. पण  २०व्या शतकात आलेलं ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)’ हे तंत्रज्ञान प्रचंडच गदारोळ माजवणार आहे. त्याच्यासोबत आलेली ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज (IOT)’ आणि ‘इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्ज (IIOT)’, बिग डेटा, ऑटोनॉमस रोबॉट्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग, ऑग्मेंटेड रिॲलिटी (AR) आणि व्हर्च्युअल रिॲलिटी (VR), 3D प्रिंटिंग, 5G यांच्या आगमनामुळे आणि त्यांच्यातले विकासामुळे उद्या माणसाच्या बरोबरीनं काम करणारी यंत्रं मानवी हस्तक्षेपाशिवायही काम करायला लागतील. 

कारखाने, ऑफिसेस, मोटारगाड्या इतकंच काय पण आपली घरगुती उपकरणं ‘ऑटोमेटेड’ होणार आहेत. याशिवाय इतरही अनेक तंत्रज्ञानांचा समावेश या मालिकेत असेल.ही तंत्रज्ञानं नेमकी काय आहेत ? त्यांचा आपल्या आयुष्यावर कसा परिणाम होईल? यापुढच्या काळात आपली जीवनशैली कशी बदलेल ? -  याशिवाय मेंदू, बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी, औषधं, शस्त्रक्रिया, वाहतूक, करमणूक, मीडिया, प्रवास, कम्युनिकेशन्स या सगळ्यांचं भवितव्य काय आहे, यामुळे काय बदल होतील याविषयीही आपण या मालिकेत माहिती घेऊ.उदाहरणार्थ उद्याचं मेंदूविज्ञान / तंत्रज्ञान कसं असेल? यंत्राला माणसाच्या भावना ओळखता येतील का? यंत्रं आपले विचार नियंत्रित करू शकतील का?  आपल्या मनात येणारे विचार आपण थेटपणे छापू शकू का? कृत्रिम मेंदू तयार करू शकू का (क्लोनिंग), तसंच कृत्रिम माणूस  तयार करू शकू का? आपल्या आठवणी आपण डिजिटल रूपात साठवून ठेवू शकू का? उडत्या मोटारगाड्यांचं भविष्य काय? ‘डिजिटल ट्विन्स’ म्हणजे काय? त्यांचं भवितव्य, जेनेटिक आणि अतिसूक्ष्म औषधं यांचं भविष्य, आपल्या आरोग्यावर लक्ष कसं ठेवलं जाईल? प्रत्यक्ष ऑपरेशन थिएटरमध्ये हजर न राहता डॉक्टरला शस्त्रक्रिया करणं शक्य होईल का? ‘डिझाइनर बेबीज’ म्हणजे काय? उद्याचे कारखाने कसे असतील? उद्याच्या जगात इंधन कसं असेल? उद्याचा आपला प्रवास कसा असेल? - अशा अनेक प्रश्नांचा या सदरात आपण शोध घेऊया.

यातल्या अनेक तंत्रज्ञानांचा-उदा. ब्रेन मॅपिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑग्मेंटेड रिॲलिटी, व्हर्च्युअल रिॲलिटी अशा अनेकांचा-वापर आजही होतोय. नजीकच्या काळात त्यांचा अधिक विकास होईल. काही तंत्रज्ञानं नजीकच्या काळात धुमाकूळ घालायला सज्ज होतील; तर काहींना अजून काही काळ वाट बघावी लागेल. विशेष म्हणजे ही सगळी तंत्रज्ञानं एकमेकांत गुंतलेली तर आहेत. शिवाय त्यांचा वापर अनेक क्षेत्रातही होतो आहे आणि होणार आहे. यातली अनेक तंत्रज्ञानं आपल्याला कपोलकल्पित वाटतील. उदाहरणार्थ डिझाइनर बेबीज, क्लोनिंग, वृद्धत्वावर मात करणारी औषधं, परग्रहांवरची वस्ती वगैरे. आपल्याला काही शतकांपूर्वी अशक्य वाटलेल्या, हे कधीच शक्य होणार नाही असं वाटलेल्या कल्पना आज प्रत्यक्षात उतरल्या आहेत आणि आपण त्यांचा स्वीकारही केला आहे हे आपण जाणतोच. 

यांत्रिकीकरण, वाफेचं आणि नंतर आलेली इंजिन्स, वीज, विमान, मोटारगाड्या, टेलिकम्युनिकेशन्स, लेझर, ऑप्टिकल फायबर यांसारखी अनेक तंत्रज्ञानं आपल्याला पूर्वी अशक्य वाटायची, पण ती प्रत्यक्षात उतरली आणि आपल्या नकळतपणे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली. इतकंच कशाला पण कॉम्प्युटर, इंटरनेट आणि मोबाइल हे तर आपल्याला अन्न, पाणी आणि कपडे यांच्याइतकेच गरजेचे वाटताहेत. आज आपण ‘अंशत:’ डिजिटल युगात जगत असलो तरी उद्याचं जगच संपूर्णत: डिजिटल असणार आहे. आपण डिजिटल व्हायचं की नाही याचा पर्याय निदान आजतरी आपल्याकडे आहे. पण उद्याच्या जगात डिजिटल होण्याशिवाय आपल्याकडे इतर दुसरा पर्यायच उरणार नाही. 

जागतिक सुरक्षा सल्लागार आणि भविष्यवादी (futurist) मार्क गुडमन यानं तर ‘उद्याच्या जगात ज्याला कोड कंट्रोल करता येईल, त्याला जगावर नियंत्रण मिळवता येईल (If you control the code, you control the world)’ असं म्हटलं आहे. त्यामुळे उद्याच्या जगाचं ‘कोड’ आपण या मालिकेत उलगडण्याचा प्रयत्न या मालिकेतून करणार आहोत. तंत्रज्ञानाच्या तोट्यांचाही आढावा अर्थातच असेल. ज्यांना तंत्रज्ञानाची अजिबात ओळख नाही त्यांच्यासाठीही ही मालिका खूप आनंददायी आणि ज्ञानवर्धक ठरेल अशी आम्हाला आशा आहे.godbole.nifadkar@gmail.com.