शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

प्रत्येक गाडी जेव्हा ड्रायव्हरशिवाय चालेल...; काय काय सोपे होईल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 08:47 IST

या गाड्या स्वत:हून पळतील,  इंधन भरायला जातील, काही गडबड वाटली तर स्वत:हूनच गॅरेजला जातील. माणसाला यातलं काहीच करावं लागणार नाही!

अच्युत गोडबोले ख्यातनाम लेखकसहलेखिका - आसावरी निफाडकर

१९६८ सालच्या ‘दि लव्ह बग’ या धमाल चित्रपटात ‘हर्बी’ नावाच्या कारची जिम नावाच्या एका कार रेसरबरोबर कशी मैत्री होते आणि मग सतत रेस हरणाऱ्या जिमला ती कशी जिंकायला मदत करते वगैरे दाखवलं होतं. अशा स्वयंचलित कार्सची कल्पना आता प्रत्यक्ष उतरते आहे.

याच त्या ‘सेल्फ ड्रायव्हिंग कार्स’ किंवा ‘ऑटोनॉमस कार्स’! यात चालक नसतो. या गाड्या चक्क बघू शकतात, निर्णय घेऊ शकतात आणि स्वत:वर नियंत्रणही ठेवू शकतात. त्यासाठी सेन्सर्स, कॅमेरे, सॉफ्टवेअर अशा अनेक गोष्टी  असतात. समोर आलेला अडथळा वेळीच ओळखून तो टाळून या गाड्या पुढे जाऊ शकतात. एकदा आपल्याला कुठे जायचं आहे हे त्यांना सांगितलं, की  नेव्हिगेशन सिस्टिमचा वापर करून त्या आपल्याला इच्छित ठिकाणी पोहोचवू शकतात आणि हे सगळं  कोणत्याही प्रकारच्या मानवी हस्तक्षेपाशिवाय होतं!

१९३९ साली ‘फुटूरामा’ या जागतिक प्रदर्शनात ऑटोनॉमस गाड्यांबरोबरच ऑटोनॉमस बसेस, ट्रक्स तसंच त्यांना नियंत्रित करणारं टॉवर असं सगळं मांडलेलं होतं. १९७० च्या दशकात कॉम्प्युटर आणि इमेज प्रोसेसिंग विकसित झालं. १९७७ साली जपानमधल्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ सुकुबा मेकॅनिकल इंजिनिअरिंग लॅब’ची पहिली सेल्फ-ड्रायव्हिंग कार ताशी २० मैल इतक्या वेगानं रस्त्यावर धावली. १० वर्षांनी अर्नेस्ट डिकमन्स या जर्मन इंजिनिअरनं एक ‘VaMOR’ नावाची ‘डायनॅमिक व्हिजन’ सिस्टिम गाडीच्या मागे आणि पुढे बसवली. त्यामुळे फिल्टर होऊन गाडीला इमेजेस दिसणं आणि ठरावीकच आवाज ऐकू येणं शक्य व्हायला लागलं.  वेगाची मर्यादा नसलेल्या जर्मनीच्या ‘ऑटोबान’ हायवेवर या गाड्या प्रतितास ६० मैल वेगाने धावल्या !

८ ऑक्टोबर, २००५ रोजी डिफेन्स ॲडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट्स एजन्सी (DARPA)नं आयोजित केलेली एक स्पर्धा ‘टाउरंग’ या गाडीने जिंकली. ७ तासांत आपल्या मार्गातली शंभर-एक तीव्र वळणं, तीन बोगदे, चिखल आणि खडबडीत उंच-सखल भाग असं सगळं पार करत तिनं ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर २००७ साली DARPA नं. ३०-३५ ऑटोनॉमस सिग्नल्स वगैरेंचे अनेक नियम पाळून या गाड्या बागा, रहदारी असलेल्या रस्त्यावर उतरवून बघितल्या. यात स्टॅन्फर्ड विद्यापीठाच्या गाडीने ही स्पर्धा जिंकली; तरीही त्या गाडीने ड्रायव्हिंगचे नियम  पाळले नसल्यामुळे तिला हे बक्षीस मिळालं नाही. पण या स्पर्धेमुळे अशा गाड्या फक्त लष्करासाठीच नाहीत, तर सामान्य नागरिकांसाठीही तयार करता येतील, असं अनेक  कंपन्यांना वाटायला लागलं. पण २००७-०८ सालच्या जागतिक मंदीमुळे हे प्रयत्न मागे पडले.नंतर जसजशी मशीन/डीप लर्निंग या तंत्रज्ञानात वेगानं प्रगती होत गेली, तसतशी ऑटोनॉमस कार्सच्या दिशेनंही भराभर पावलं पडत गेली. आज ऑटोनॉमस गाड्या बनवण्यात टेस्ला, ऑडी, एनव्हिडिया, फोर्ड, गुगल (अल्फाबेट) अशा कंपन्या अग्रेसर आहेत.

आता जहाजं, रेल्वे आणि विमानं ही वाहनंही ‘ऑटोनॉमस’ होण्याच्या मार्गावर आहेत. २०५० सालापर्यंत  ऑटोनॉमस रेल्वे प्रवासी घेऊन सगळीकडे धावायला लागतील. सिंगापूर, न्यूरेम्बर्ग आणि पॅरिस इथे अशा रेल्वे स्थानिक पातळीवर अनेक वर्षांपासून धावताहेत; पण त्या अजून पूर्णपणे स्वयंचलित नाहीत. त्यांना दूरवरून नियंत्रित करावं लागतं. भारतातही अशा रेल्वे लवकरच दिसायला लागण्याची शक्यता आहे. भविष्यात अधिक सुधारणा झाल्यावर या रेल्वेमध्ये मानवी हस्तक्षेप फारच कमी प्रमाणात असेल, अशी आशा आहे.स्वयंचलित गाड्या मोठ्या प्रमाणात धावायला लागल्यावर अनेक गोष्टी बदलतील. मानवी चुकांमुळे होणारे अपघात कमी होतील. गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या गाड्या जलद मार्ग निवडतील. विशेष म्हणजे त्यांच्याकडे दर क्षणी रहदारीचा अपडेट असेल.

यामुळे आपल्या प्रवासाचा वेळ वाचेल. मालाची देवाण-घेवाणही जलदगतीनं होऊ शकेल. यामुळे एकूणच कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढेल. स्वयंचलित गाड्या नवीनतम ऊर्जा/वीज वापरणाऱ्या असल्यामुळे हवेतलं कर्बवायूंचं उत्सर्जन खूपच कमी होईल. या गाड्या स्वत:हून पळतील,  इंधन भरायला जातील, विम्याचे हप्तेही स्वत:च भरतील आणि स्वत:मध्ये काही गडबड वाटली तर स्वत:हूनच गॅरेजला जातील. गाडीच्या मालकाला यातलं काहीच बघावं लागणार नाही. त्यामुळे या गाड्या फार लवकर लोकप्रिय होण्याची शक्यता आहे. २०४० सालापर्यंत नवीन (साध्या) गाड्या घेण्याचं प्रमाण ५०%नं घटण्याची शक्यता वर्तवली जाते आहे !कुठलंही वाहन पूर्णपणे स्वयंचलित होण्यासाठी त्या वाहनाला एकूण ४ टप्पे पार करावे लागतात. यातल्या ३ टप्प्यांमध्ये कॉम्प्युटरबरोबरच मानवी हस्तक्षेपाची गरज भासतेच. आता आपण यातल्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचलो आहोत.पूर्णपणे स्वयंचलित गाड्या तयार व्हायला तरी अजून काही काळ जावा लागेल; पण नंतर आपला प्रवास भन्नाट असेल, त्याबरोबर लाखो ड्रायव्हर्सच्या नोकऱ्याही जातील, हे मात्र नक्की!godbole.nifadkar@gmail.com

टॅग्स :carकार