शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

बाईला ‘डाकीण’ ठरवून चटके दिले जातात, तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 06:37 IST

एखादी स्त्री डाकीण असते, माणसं-प्राण्यांचा जीव घेते, पिकपेरा कमी करते, गाई-म्हशीचे दूध आटवते यावर आजही लोकांचा विश्वास बसतो, याला काय म्हणावे?

विनायक सावळे, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, विद्यापीठाचे कुलगुरू, जिल्ह्यातील सर्व प्रमुख, संस्था-संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पूर्ण एका दिवसाची परिषद, त्या परिषदेत डाकीण प्रश्नावर सखोल चर्चा आणि प्रबोधन झालेले, प्रत्येक गावात असलेल्या पोलीस पाटलांचे प्रशिक्षण झालेले, प्रत्येक गावात असलेल्या अंगणवाडी सेविका, पाडा सेवक, आशा वर्कर, शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी या सगळ्यांचे प्रशिक्षण झालेले, पोलीस पाटलांची तत्कालीन गृहराज्यमंत्री यांच्या उपस्थितीत ‘डाकीण प्रथाविरोधी संकल्प परिषद’ पार पडलेली, गावागावात प्रबोधनासाठी काढलेल्या अक्काराणी ते याहामोगी संवाद यात्रा, डाकीण ठरवत असलेल्या होऱ्यापाणीच्या चंपालाल महाराजाचा भांडाफोड, पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने पाड्यापाड्यावर प्रत्यक्ष प्रबोधनाचे कार्यक्रम, कितीतरी डाकीण पीडित महिलांना समोर आणून त्यांच्या व्यथा समाजासमोर आणल्या, त्याच्यावर एक पुस्तक; ज्याला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ‌्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला, सर्व अधिकारी, राजकीय पुढारी यांच्याशी संवाद, त्यांच्या सहभागाने अनेक कार्यक्रम... इतका विविधांगी प्रयत्न कदाचितच कोणी एखाद्या विषयावर सातत्याने केला असेल; पण तरीही डाकिणीचा प्रश्न आपली क्रूरता जराही कमी करायला तयार नाही.

गेल्या आठवड्यात एका तरुण महिलेला निर्वस्त्र करून, ‘तू कोणाकोणाला खाल्लं? अजून कोण तुझ्यासोबत आहे? त्यांची नावं सांग’, अशी विचारणा करीत तिला चटके देऊन छळ केला जात असतानाचा एक व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल झाला.  कार्यकर्ते, प्रशासन, पत्रकार सगळ्यांनाच हादरवून टाकणाऱ्या या व्हिडिओने डाकीण प्रश्नाचे आव्हान किती भयंकर आहे, याची परत जाणीव करून दिली.२१ व्या शतकात ज्याला आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग म्हणतो, अशा युगात आजही, ‘एखादी स्त्री डाकीण असते. ती माणसांना खाते, मारून टाकते, प्राण्यांचा जीव घेते, पीकपेरा कमी करते, गाई-म्हशीचे दूध आटवते, अपघात घडवते, आजारी पाडते, जंगली प्राण्यांच्या रूपाने हल्ला करते’ असे भ्रम घेऊन जगणारी माणसे आहेत. या अघोरी अंधश्रद्धेतून कितीतरी महिलांना डाकीण ठरवून मारहाण करणे, गावातून हाकलून देणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, नग्न करून तिचा छळ करणे आणि प्रसंगी तिचा खूनच करणे हे सारे काही आजही घडत आहे.

शिक्षण क्षेत्राने सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन, भारताच्या संविधानाने कर्तव्य म्हणून सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन पोहोचवायला आपण सारेच कमी पडलो. मोबाइलचा डाटा पोहोचला, रस्ते पोहोचले, योजना पोहोचल्या, विजेचे खांब पोहोचले, सौरदिवे पोहोचले, आदिवासी पाडे प्रकाशमय झाले, पण मनातील अंधश्रद्धांचा अंधकार दूर करण्यासाठी विवेकाच्या प्रकाशाची साधी एक तिरीपही तिथे पोहोचली नाही... हे सारे मन विषन्न करणार आहे. शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर म्हणून म्हणत होते, ‘ही शतकांची लढाई आहे, ती अधिक निकराने लढावी लागणार आहे.’ - ही लढाई केवळ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने लढून भागणार नाही तर येथील राजकीय पुढारी, प्रशासन, शिक्षण संस्था, माध्यमे, विविध संस्था, संघटना या सर्वांनी मिळून लढायची आहे. पोलीस प्रशासनाची जबाबदारी यात  मोठी आहे. पोलीस पाटलांच्या माध्यमातून त्यांचा सर्व गावांची थेट संबंध येतो. जादूटोणाविरोधी कायद्याचा धाकदेखील पाड्यापाड्यावर पोहोचण्याची गरज आहे.

मंत्रतंत्र, जादूटोणा जगात  अस्तित्वात नाही. कोणत्याही घटनेमागे काहीतरी कार्यकारणभाव असतो, हे विज्ञानाचे पायाभूत तत्त्व पोहोचण्यासाठी सर्व माध्यमांना पुन्हा नव्याने प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने जमेल ती भूमिका पार पाडायला हवी. ज्याला याविरोधात बोलणे शक्य त्याने बोलावे, ज्याला संघटित कामात सहभागी व्हायचे असेल त्यांनी संघटनेत सहभागी व्हावे, एखाद्याने पीडित महिलेला मदत करावी, एखाद्याने याबाबत लिहावे...  अशा सगळ्या मार्गांनी सगळ्यांनी कृतिशील राहूया..

vinayak.savale123@gmail.com