शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

आध्यात्म म्हणजे काय? - सद्गुरू जग्गी वासुदेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 05:41 IST

या शब्दाच्या नुसत्या उल्लेखानेच, आजच्या लोकप्रिय संस्कृतीत त्याच्या असलेल्या विविध प्रतिमा, आपल्या नजरेसमोर उभ्या राहतात.

‘आध्यात्म’ या शब्दाच्या नुसत्या उल्लेखानेच, आजच्या लोकप्रिय संस्कृतीत त्याच्या असलेल्या विविध प्रतिमा, आपल्या नजरेसमोर उभ्या राहतात. दुर्दैवाने, त्यामुळे प्रचंड प्रमाणात गैरसमज निर्माण होतात. प्रामुख्याने आध्यात्म म्हणजे, शारीरिक मर्यादा पार करून आयुष्य अनुभवण्याची क्षमता.मानवी स्वभावाचे स्वरूपच असे आहे की, त्याचा एक भाग ज्याची सहजप्रवृत्ती आत्मसंरक्षण आहे, तो सतत मर्यादा निर्माण करून त्यांचे संरक्षण करत राहतो. मनुष्याची अजून एक बाजू आहे, ती या क्षणी आहे, तो जो आहे, त्यापेक्षा काहीतरी अधिक होण्याची इच्छा त्याच्यात सदैव कार्यरत असते. तुम्ही कोण आहात, किती मोठे आहात, तुम्ही तुमच्या आयुष्यात कितीही साध्य केले असले, तरीही त्याहूनही आणखी अधिक काही होण्याची इच्छा सदैव मनात असतेच. ती इच्छाच तुम्हाला सतत नवे काही करण्याची आशा जागृत करण्यास, त्यासाठी धडपड करण्यासाठी प्रोत्साहन देण्यास कारणीभूत ठरते.याचा अर्थ असा आहे की, आपल्यात असे काहीतरी आहे, जिला मर्यादा आवडत नाहीत. आपल्यात असे काहीतरी आहे, जे अमर्याद होण्यासाठी तळमळत आहे. ती दूर करण्यासाठी, लोकांनी सर्व प्रकारची शांततावादी तत्त्वज्ञाने अंगीकारण्याचा प्रयत्न केला आहे. आपण लोभी बनू नये, अशी शिकवण देऊन, सध्याच्या तुमच्या मर्यादांमध्येच कसे समाधानी राहायचे हे शिकवून, काहीतरी करून ती तळमळ थांबविण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्यांनी तुम्हाला कोणतीही शिकवण दिलेली असली, तरीही आज तुम्ही आहात, त्यापेक्षा अधिक काहीतरी बनण्याची तळमळ, या पृथ्वीतलावरील एकाही मनुष्याच्या मनात शमलेली नाही. कारण अमर्याद राहण्याची इच्छा अनंतकाळपासूनची आहे. त्यामुळे सतत काही ना काही नवे मिळवण्याची उर्मी सर्वांमध्ये निर्माण होत राहते.मनुष्याची ही तळमळ जेव्हा अगदी स्थूल रूपाने व्यक्त होते, तेव्हा आपण त्याला लैंगिकता म्हणतो. जर तिला भावनिक अभिव्यक्तीची जोड मिळाली, तर आपण त्याला प्रेम म्हणतो. जर या तळमळीत मानसिक अभिव्यक्ती आढळली, तर सहसा समाजात त्याकडे लोभ, महत्त्वाकांक्षा, विजय वगैरे म्हणून बघितले जाते. त्याला ते नाव किंवा रूप दिले जाते. फक्त जेव्हा तिला एक जागृत अभिव्यक्ती गवसते, तेव्हा ती एक आध्यात्मिक प्रक्रिया होते. ती प्रक्रिया गाठणे म्हणजेच आध्यात्म होय. त्यासाठीचे प्रयत्न गरजेचे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक