शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
2
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
3
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
4
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
5
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
6
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
7
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
8
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
9
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
10
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
11
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
12
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
13
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
14
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
15
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
16
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
17
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
18
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
19
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
20
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे

आकर्षणाचं केंद्र ठरत असलेलं सेरेंडिपिटी म्हणजे आहे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 21:43 IST

गोव्यात जाहिरात न करताही पर्यटक गर्दी करतात.

- राजू नायकपणजी : गोव्यात जाहिरात न करताही पर्यटक गर्दी करतात. कलांचेही तसेच झाले आहे. एवढे कला महोत्सव राज्यात सतत होत असतात की कला रसिकांना हे पाहू की ते अशी परिस्थिती होत असते. त्यात अनेक संग्रहालये व कलामंच येथे आहेत- तेथे तर सतत प्रदर्शने चालू असतात. नाटके, तियात्र, चित्रपट महोत्सव याची राळ उडालेली असते. त्यात सेरेंडिपिटीने आपले स्थान निर्माण केले आहे, यात तथ्य आहे.गोवा हे जाणीवपूर्वक प्रयत्न न करताही पर्यटनाचे आंतरराष्ट्रीय स्थळ झाले आहे. त्यामुळे आपोआपच गोव्यात होणा-या विविध कला उपक्रमांना आंतरराष्ट्रीय स्वरूप लाभत असते. सेरेंडिपिटीच्या आयोजकांनी गोवा हे या महोत्सवासाठी केंद्र निवडण्याचे तेच कारण असावे; परंतु गोव्याच्या लौकिकाला साजेसा हा महोत्सव होत असतो. त्यात देशभरातील ख्यातनाम कलाकार गोव्यात येतात. नाटक, सिनेमा, चित्रकलेपासून संगीत, फॅशन, अध्यात्म असे विविध विषय निवडले जातात. ते पाहाण्याचे भाग्य गोव्यातील रसिकांना लाभते. इफ्फी असो किंवा सेरेंडिपिटी त्यांनी गोव्याला प्रगल्भच बनविले आहे. परंतु असे असले तरी ‘गोवा’ या ‘सेरेंडिपिटी’त कितीसा आहे? बहुतेक सर्व कलाकार, तंत्रज्ञ व कार्यकर्तेही महोत्सवाचे आयोजक दिल्लीतून आणत असतात. त्यामुळे गोवा या महोत्सवात केवळ एक ‘प्रेक्षक’ असतो. त्यात गोव्याची थिएटरे, मैदाने व स्थळे वापरली जातात; परंतु निव्वळ ती म्हणजेच ‘गोवा’ आहे का?

जेव्हा हा महोत्सव चार वर्षापूर्वी भरू लागला, तेव्हा त्याला सरकारने पाठिंबा देण्याचे कारण या महोत्सवात भव्य दिव्य असे काही घडणार होते. जागतिक कीर्तीचे कलाकार येथे येऊन कला सादर करतील व तिचा अनुभव घेण्यासाठी जगभरातून कलारसिक येथे येणे महत्त्वाचे होते. देशात आज कला व संस्कृती क्षेत्रात जे वैशिष्टय़ आहे, त्याचा रसास्वाद लोकांना घ्यायला मिळणार ही एक पर्वणीच होती. सीमा किंवा सरहद्द ओलांडून जाणारा महोत्सव येथे होणार ही संकल्पनाच आकर्षक होती. आयोजकांच्या मते त्यांनी अजूनपर्यंत चार हजारपेक्षा अधिक कलाकारांना महोत्सवात सामावून घेतले आहे; परंतु गोवा व आसपासच्या कलाकारांचा समावेश त्यात कितीसा आहे? तरुण, होतकरू कलाकारांना तरी त्यात संधी मिळणार की नाही?नाही म्हणायला, यंदा फ्रांसिस्क न्यूटन सौझांचे नातू सोलोमन सौझा या तरुण चित्रकाराने गोव्यात येऊन इमारतींच्या भिंतीवर अनेक कलाकारांची चित्रे रंगविली. त्यात अनेक गोमंतकीय कलाकारांच्या चित्रांचा समावेश होता. त्यांची शैली येथे खूपच गाजली; परंतु सोलोमन यांच्याबरोबर १२ स्थानिक चित्रकारांचा सुसंवाद घडवून आणला असता तर ते उचित ठरले असते. स्थानिक कलाकार केवळ ‘प्रेक्षक’ बनू नयेत. त्यांना या उपक्रमांत सामावून घेतले तर येथील परंपरा, संस्कृती व स्थानिक लोककलाकारांना हा महोत्सव आपला वाटू शकला असता. तसे न झाल्याने हा महोत्सव केवळ ‘उच्चभ्रू’ म्हणून गणला जात असून अनेक अफलातून प्रयोग महोत्सवात होत असूनही स्थानिकांची उपस्थिती खूपच कमी असते. एक स्थानिक कलाकार म्हणालाही, जोपर्यंत सेरेंडिपिटी ही तळागाळात समरस होणार नाही, तोपर्यंत गोवा त्यात सहभागी होणार नाही व ‘पाहुणा’ म्हणूनच त्याचे स्वरूप राहील. गोवा सरकार महोत्सवाला अनुदान देत नसल्याने अजून त्याबाबत कलाकारांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या नाहीत, एवढेच!