शहरं
Join us  
Trending Stories
1
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
2
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
4
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
5
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
6
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”; मंत्री चंद्रकांत पाटील
7
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
8
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
9
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
10
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
11
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
12
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
13
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
14
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
15
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
16
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
17
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
18
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
19
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
20
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरिया द्वीपकल्पावर शांतता नांदेल काय?

By अोंकार करंबेळकर | Updated: September 21, 2018 03:52 IST

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इन आणि उत्तर कोरियाचे एकाधिकारशहा किम जोंग उन यांच्यामध्ये सुरू असलेली तीन दिवसांची चर्चा परिषद आज संपली आहे.

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इन आणि उत्तर कोरियाचे एकाधिकारशहा किम जोंग उन यांच्यामध्ये सुरू असलेली तीन दिवसांची चर्चा परिषद आज संपली आहे. उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग येथे मून जे इन स्वत: विमानाने सोल ते प्योंगयांग असा विमानप्रवास करून गेल्याने नवा इतिहास रचला गेला आहेच, आता या चर्चेतून काय फळ मिळेल हे काही काळानंतर स्पष्ट होईल.यापूर्वी पॅनमुन्जोम येथे ऐतिहासिक सीमेवर झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. तेव्हा कोरिया द्वीपकल्पावर शांतता नांदेल, युद्ध समाप्तीसाठी प्रयत्न होतील, द्वीपकल्प अण्वस्त्रमुक्त होईल असे संकेत मिळाले.मात्र हे संकेत अजिबातच स्पष्ट नसल्याचे त्यांच्या बैठकीनंतर काहीच दिवसांमध्ये उघड झाले. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व किम यांची सिंगापूरच्या सेंटोसा बेटावर भेट झाली. यामध्ये अण्वस्त्रमुक्तीसाठी कोणताही ठोस विचार करण्यात आला नाही. तेव्हाच किम आणि मून भेट तकलादू होती हे स्पष्ट झाले. आता मात्र दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून यांना किमकडून अण्वस्त्रमुक्तीसाठी काही तरी ठोस वदवून घ्यावे लागणार आहे. ट्रम्प प्रशासनाच्या बेभरवशीपणाचाही या शांतता प्रक्रियेवर परिणाम होत आहे. अमेरिकेचे सेक्रेटरी आॅफ स्टेट माइक पोम्पेओ यांनी अचानक उत्तर कोरियाची भेट रद्द करणे त्याचेच प्रतिबिंब म्हणता येईल.पोम्पेओ यांची भेट रद्द झाल्यावर ट्रम्प प्रशासन मन मानेल तसे वागते, एकतर्फी निर्णय घेते, असा आरोप करण्याची उत्तर कोरियाला पुन्हा संधी मिळाली. या सर्वाचा परिणाम शांतता चर्चेवर होईल आणि आंजारून गोंजारून शांत केलेले किम नावाचे शिंगरू पुन्हा उधळेल अशी भीती मून यांना वाटते. अण्वस्त्रमुक्तीच्या चर्चेची गाडी रुळावरून खाली घसरू नये यासाठी त्यांना प्रयत्न करायचे आहेत. त्यातच आपल्या आर्थिक सहाकार्य स्वप्नाचे घोडे दामटायचे आहे. गेली अनेक वर्षे दक्षिण कोरिया उत्तर कोरियाबरोबर आर्थिक सहकार्य करण्यासाठी प्रयत्न करत आहे. दोन्ही कोरियामध्ये रेल्वेवाहतूक पुन्हा सुरू व्हावी, मालवाहतूक व्हावी तसेच नैसर्गिक वायू व इंधन भूमार्गाने दक्षिणेत यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.संपूर्ण शांतता हे जरी दूरचे स्वप्न असले तरी आधी अशी सहकार्याची लहान पावले टाकली पाहिजेत, असे मत मून यांचे आहे. एक चांगली बाब म्हणजे नुकतेच उत्तर कोरियाच्या केसाँग शहरामध्ये लायझन आॅफिस सुरू करण्यात आले आहे. यामुळे कोणत्याही प्रकारचा संवाद सुरू करण्यासाठी अत्यंत सोपे जाणार आहे.अण्वस्त्र आणि कथित हायड्रोजन बॉम्बच्या धमक्यांवर किम जोंग उनने अमेरिका, दक्षिण कोरिया, जपान यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. सात दशकांहून अधिक काळ चिघळलेल्या, शीतयुद्धातही कायम धगधगत राहिलेला कोरियाचा निखारा आता खरंच शांत होईल की नाही हे आताच सांगता येणार नाही. सध्या तरी किम जोंग उन काय म्हणतात हे पाहणे आपल्या हातामध्ये आहे.