शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

रेल्वे जाळायला निघणारा नेता रेल्वेमंत्री होतो तेव्हा काय घडले..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 04:21 IST

जॉर्ज फर्नांडिस हे अजब रसायन होते. आक्रमकपणा, धमक आणि धाडसीपणा हे त्यांचे विशेष गुण. ‘जायंट किलर’, ‘बंद सम्राट’, ‘संप सम्राट’ अशी विशेषणे त्यांना कायम लागलेली.

- दिनकर रायकरजॉर्ज फर्नांडिस हे अजब रसायन होते. आक्रमकपणा, धमक आणि धाडसीपणा हे त्यांचे विशेष गुण. ‘जायंट किलर’, ‘बंद सम्राट’, ‘संप सम्राट’ अशी विशेषणे त्यांना कायम लागलेली. त्यातून एक बिनधास्त असे नेतृत्व उभे राहिले होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत मुंबईत अनेक संप घडवून आणले. मात्र हे संप कधी करावेत आणि ते कधी मागे घ्यावेत याचे एक वेगळे गणित जॉर्जनी स्वत:साठी आखलेले होते. त्यामुळे संपात सहभागी झालेल्या कोणत्याची कामगाराचे नुकसान त्यांनी कधी होऊ दिले नाही. राज्य शासन कर्मचाऱ्यांनी ७० च्या दशकात संप केला. जॉर्जनी त्यांना पाठिंबा दिला. त्या वेळी नरेंद्र तिडके कामगार मंत्री होते. मात्र जॉर्ज कायम हिणवणाºया स्वरात तिडके यांचा उल्लेख करायचे. त्या काळात त्यांनी कामगार मंत्री असा कधीही उल्लेख केला नाही, उलट, ‘‘कुठंय तो मजूरमंत्री नरेंद्र महिपती तिडके...?’’ असाच उल्लेख करत जॉर्ज यांनी त्या वेळी तासन् तास भाषणे ठोकली होती. धाडसी स्वभावाला अनुसरूनच जॉर्जनी जनता पक्षाचे सरकार स्थापन होण्याची पूर्ण शक्यता असतानाही मुंबई बंद करून दाखवण्याची खुमखुमी आम्हा पत्रकारांना बोलून दाखवली होती.१९७८ ची ही गोष्ट. विधानसभेच्या निवडणुकीत जनता पक्ष सर्वाधिक जागा घेऊन विजयी झाला होता. पण पूर्ण बहुमतासाठी त्यांना काही जागा कमी पडत होत्या. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असल्याने महाराष्ट्रातदेखील जनता पक्षाचे सरकार स्थापन व्हावे म्हणून जॉर्ज फर्नांडिस मुंबईत आले होते. आम्ही काही पत्रकार त्यांना भेटायला गेलो. चौपाटीच्या कठड्यावर खाली पाय सोडून आम्ही त्यांच्याशी गप्पा मारत बसलो. जवळच फिरणाºया चणेवाल्याकडून आम्ही चण्याच्या पुड्या घेतल्या आणि गप्पा रंगल्या. तेव्हा काँग्रेसच्या विचारसरणीचे आणि गांधीवादी नेते सादिक अली हे राज्यपाल होते. ते कोणाला सरकार स्थापन करण्यास बोलावणार याविषयी उत्सुकता होती. रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस वेगवेगळे लढले होते. त्यांनाही सत्ता स्थापन करण्यासाठी जागा कमी पडत होत्या. एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचे त्यांचे प्रयत्न चालूच होते. त्यामुळे राज्यपाल कोणाला बोलावणार हा कळीचा मुद्दा बनला होता. राज्यपालांवर दबाव टाकण्यासाठी तेव्हा केंद्रीय मंत्री असणारे जॉर्ज मुंबईत आले होते. साहजिकच आमच्या चर्चेत हा मुद्दा प्रमुख होता. तेव्हा चणे खाता-खाता जॉर्ज म्हणून गेले, ‘‘जर का आम्हाला सत्ता स्थापन करण्यासाठी बोलावले नाही, तर उद्या मुंबई बंद करून दाखवतो की नाही ते पाहाच...’’ मात्र तशी वेळ वसंतदादा पाटील यांनी येऊ दिली नाही. इकडे जॉर्ज बोलत असताना तिकडे वसंतदादांनी दोन्ही काँग्रेस आणि अपक्षांना घेऊन राजभवन गाठले आणि बहुमत सिद्ध करून दाखवत सरकार स्थापनेचे निमंत्रण मिळवले. रात्रीतून रेड्डी काँग्रेस, इंदिरा काँग्रेस व अपक्षांचे सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झाले आणि जॉर्जची मुंबई बंदची घोषणा चण्यासोबतच संपून गेली. पुढे तेच सरकार शरद पवार यांनी पाडून याच जनता पक्षाला सोबत घेत पुलोदचे सरकार स्थापन केले. पवार यांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची चर्चा तेव्हापासून आजतागायत सुरू आहे.केंद्रात उद्योगमंत्री झाल्यावर जॉर्ज मुंबईच्या दौºयावर आले. आपला नेता उद्योगमंत्री म्हणून आलेला पाहून कामगार नेते उत्साहाने आपल्या मागण्या घेऊन भेटायला आले. काही उद्योगपतीही त्यांच्या उद्योगांना सवलती द्या म्हणत भेटायला आले. काही अधिकाºयांनी या दोन्ही बाजू ऐकत, आपण एक सेमिनार घेऊन यांचे प्रश्न सोडवू असा सल्ला जॉर्जना दिला. असा सल्ला देणाºया अधिकाºयावर डाफरतच ते म्हणाले होते, सेमिनार हा गुजराती शब्द आहे. सेमी म्हणजे अर्धो आणि नार म्हणजे मुलगी... अशी मुलगी काय निर्माण करणार..? असे म्हणत जॉर्जनी सेमिनारची कल्पना फेटाळून लावली.कायम उत्साही असणाºया जॉर्जचे अनेक किस्से आहेत. असाच एक कामगार नेता ते रेल्वेमंत्री या दोन्ही भूमिकांच्या वेळी घडलेला. कामगार नेता असताना रेल्वे भाडेवाढ झाली की रेल्वे बंद करणे, मोडतोड करणे, रेल्वे जाळण्याची धमकी देणे हे जॉर्जसाठी नित्याचे होते. मात्र ते स्वत:च केंद्रात रेल्वेमंत्री झाले आणि त्यांना रेल्वेचा अर्थसंकल्प सादर करताना भाडेवाढ करावी लागली. हा एक अनोखा योगायोग होता. तेव्हा अनेकांनी आता आम्हीसुद्धा रेल्वे जाळायची का? असे म्हणत जॉर्जना भंडावून सोडले होते.काँग्रेसचे बडे प्रस्थ असणारे स.का. पाटील यांना त्या वेळी अनक्राऊन्ड किंग आॅफ मुंबई असे संबोधले जायचे. देशभरात त्यांचा दबदबा होता. आजही त्यांच्या नावाचे उद्यान चर्नी रोडजवळ आहे. त्यांच्या विरोधात जॉर्ज यांनी १९६७ साली लोकसभेची निवडणूक लढवली. आपण यांना हरवू शकतो... असे घोषवाक्य घेऊन जॉर्ज यांनी प्रचाराची रणधुमाळी उडवली होती आणि खरोखरीच जॉर्जनी स.का. पाटील यांना पराभूत केले. त्या वेळी ‘जायंट किलर’ ही उपाधी त्यांना मिळाली. ती शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहिली. मात्र पुढे केंद्रात गेल्यानंतर जॉर्ज यांचे कार्यक्षेत्र व्यापक झाले आणि ते कायम महाराष्ट्रबाहेरच रमले.बाळासाहेब आणि जॉर्जशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या संघटना वेगळ्या, विचार वेगळे, लढण्याची पद्धती वेगळी, दोघांचे राजकीय मार्गही वेगळे मात्र दोघांची मैत्री अफलातून होती. जॉर्जना सगळेच ‘जॉर्ज’ असे म्हणायचे; पण बाळासाहेबांना ‘बाळ’ अशी एकेरी हाक मारणाºया काही मोजक्या लोकांमध्ये जॉर्ज होते.(लेखक ‘लोकमत’चे समूह संपादक आहेत)

टॅग्स :George Fernandesजॉर्ज फर्नांडिस