शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

साहित्य संस्कृतीत सरकार कशाला?

By admin | Updated: August 11, 2015 03:26 IST

महाराष्ट्र सरकारने साहित्य, संस्कृती व भाषा या विषयीच्या संस्थांवर नेमणुका केल्यावर नेहमीप्रमाणेच वाद उफाळून आला आहे. असे वाद झडू लागले की, कायम पूर्वी या संस्थांवर किती मान्यवर

महाराष्ट्र सरकारने साहित्य, संस्कृती व भाषा या विषयीच्या संस्थांवर नेमणुका केल्यावर नेहमीप्रमाणेच वाद उफाळून आला आहे. असे वाद झडू लागले की, कायम पूर्वी या संस्थांवर किती मान्यवर व ज्ञानी लोक होते आणि आता हे काय चालले आहे, असा प्रश्न जवळ जवळ प्रतिक्षिप्तपणे विचारला जातो आणि तितक्याच सहजपणे तो काही दिवसांनी विसरलाही जातो. पूर्वीची सर आता या संस्थांच्या कारभाराला का राहिलेली नाही, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा साधा प्रयत्नही तो विचारणारे करीत नाहीत. साहित्य, संस्कृती, भाषा या सरकारी आधारावर विकसीत होऊन फोफावतील, हा समजच मुळात सर्जनशील कला व्यवहाराबद्दलचे अज्ञान दर्शवणारा आहे. तरीही भारतात आणि महाराष्ट्रातही अशा संस्था स्थापन करण्यात आल्या, त्यामागे एक विशिष्ट कारण होते. भारतासारख्या जातिप्रथाग्रस्त समाजात परंपरागतरीत्या ज्ञान हे फक्त मोजक्याच समाजघटकांच्या हाती राहील, अशी व्यवस्था होती. त्यामुळे या मूठभरांची संस्कृती, त्यांनी लिहिलेले साहित्य, ते बोलत असलेली भाषा हेच प्रमाण म्हणून सगळ्या समाजाने मानण्याकडे कल होता. पण पहिल्यांदा प्रबोधनाच्या काळात आणि पुढे स्वातंत्र्यानंतर मूठभरांपुरती मर्यादित असलेली ज्ञानाची कवाडे उघडली गेली आणि समाजाच्या सर्व घटकांना समान संधी मिळण्याची सोय झाली. परंतु ही संधी साधण्यासाठी काही सवलती दिल्या जाणे, काही प्रोत्साहनपर योजना राबवल्या जाणे गरजेचे होते. त्यामुळेच साहित्य, संस्कृती, कला, चित्रपट, नाटक, इतर दृश्य कला, एवढेच कशाला क्र ीडा, विज्ञान व तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांसाठी सरकारी पुढाकाराने संस्थात्मक संरचना निर्माण केली गेली. या अशा संस्था खऱ्या अर्थाने स्वायत्तच असतील, त्यांची सूत्रे त्या त्या क्षेत्रातील मान्यवर व तज्ज्ञांच्या हाती असतील आणि सरकार फक्त आधारभूत असेल, अशा व्यापक विचाराने या संस्थांच्या कारभाराकडे पाहिले जात होते. तशा दृष्टिकोनातून पाहणारे राजकारणी आणि या संस्था चालवणारे मान्यवर व तज्ज्ञ यांची वैचारिक जातकुळी ही लोकशाही पद्धतीची होती. व्यापक समाजिहताची प्रेरणा आणि देशहिताच्या दृष्टीतून साहित्य, संस्कृती, भाषा इत्यादीचे संवर्धन, परिपोष व जडणघडण झाली पाहिजे, अशी राजकारणी व या संस्थांत काम करणाऱ्या बहुतांशी लोकांची धारणा होती. आपला समाज सरंजामदारी प्रवृत्तीचा आहे, समाजव्यवस्था जातीग्रस्त आहे आणि आता स्वातंत्र्याच्या काळात प्रगतीच्या वाटेवर वाटचाल करताना, इतर भौतिक आघाड्यांवर विकास होत असतानाच, समाजमनाचे विधायक भरणपोषण करण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या साहित्य, संस्कृती, भाषा, कला इत्यादींही चहू अंगाने फुलून येत समाजातील सर्जनशीलतेला पुरा वाव मिळून समाजमन सशक्त व्हायला हवे, ही दृष्टी त्या काळातील अशा संस्थाच्या चालकांची होती. पण राजकारणी व ही मंडळी यांच्या प्रेरणा आणि ही दृष्टी यांना व्यापक स्तरावरच्या सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीची जोड दिली गेली नाही. सरकारी आधारावर आपण कामे करीत राहिलो, तर काळाच्या ओघात शिक्षणाच्या प्रसाराबरोबर ज्ञानभांडार सर्वांना खुले होईल, असे मानले गेले. ही जी गफलत झाली, त्यामुळे टप्प्याटप्प्याने या अशा संस्थांचे सरकारीकरण होत गेले. त्यामुळेच मग एखादे कलमाडी आॅलिम्पिक खेळाच्या निमित्ताने भारतातील संघटनेचे संस्थान बनवू शकले. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्यावर नेमाडे हे सलमान रश्दीच्या ‘ट्विट’वर टीकेचे लक्ष्य बनल्यावर ‘चौकशी’चे विनोदी आश्वासन देणाऱ्या मंत्र्यांच्या तावडीत सांस्कृतिक खाते असते. असे एक ना अनेक विनोद होत आले आहेत. अगदी गेल्या दोन दशकांपासून. तेव्हा या संस्थांच्या कारभाराला पूर्वीची सर नाही, हे रडगाणे गाऊन काही साधणार नाही. जर उपायच योजायचा असेल, तर सध्याच्या सत्तेच्या राजकारणाची एकूण रीतभात आणि त्याला समाजातून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता, साहित्य, संस्कृती, भाषा इत्यादी क्षेत्रातून सरकारने बाहेर पडल्यासच हे प्रकार थांबतील. साहजिकच मग पैसा कोण देणार, हा प्रश्न उद्भवतो; कारण काहीही सोंग आणता आले, तरी पैशाचे सोंग आणता येत नाही. ‘मराठी झेंडे’ जगात लावणारे म्हणून अनेक उद्योजक वा उद्योगपतींचा उदोउदो सध्या केला जात असतो. त्यांनी हा भार का उचलू नये? शेवटी भाषा, त्यातून निर्माण होणारे साहित्य आणि संस्कृती तगतात, त्या समाजाच्या व्यवहाराचा अविभाज्य भाग बनल्या तरच. त्यासाठी लोकशाही देशातील प्रगल्भ समाजात विविध कलांचे प्रेमी स्वत:हून पुढे येतात आणि संस्थात्मक संरचना घडवून आणतात. त्यामागे जशी व्यापक दृष्टी असते, तसा आर्थिक व्यापार-व्यवहाराचाही एक भाग असतो. आपण लोकशाही स्वीकारली, पण सरंजामी मनोवृत्ती आजही सहा दशकांनंतर तशीच आहे. त्यामुळं आपल्या देशातील कला व्यवहार हा ‘राजा-प्रजा’ या चौकटीतच अडकून पडला आहे. त्यामुळे राजे-महाराजे यांच्या दरबारात हजेरी लावून पदरात काही पाडून घेण्यासाठी धडपडणाऱ्यात जशी हमरीतुमरी होते, तशीच अशा नेमाणुकांवरून होत असते. तेच स्वरूप आज होत असलेल्या या वादाचे आहे.