शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

पठाणकोटमध्ये नेमके घडले तरी काय ?

By admin | Updated: February 11, 2016 05:37 IST

पठाणकोटच्या नुकत्याच झालेल्या प्रकरणातील आपल्या शूर वीर सैनिकांचा त्याग, कर्तव्यनिष्ठा आणि बलिदान पाहून सामान्य माणसाना त्यांच्यावर गर्व वाटतो. पण, आपल्या विरोधी ‘नेता’, निवृत्त ‘बाबू’ आणि

- ब्रिगेडियर एस.एम.जोशी (निवृत्त)
 
(पठाणकोट हवाई तळावर जैश- ए- मोहम्मदचा हल्ला, ऊत्तरार्ध.) 
 
पठाणकोटच्या नुकत्याच झालेल्या प्रकरणातील आपल्या शूर वीर सैनिकांचा त्याग, कर्तव्यनिष्ठा आणि बलिदान पाहून सामान्य माणसाना त्यांच्यावर गर्व वाटतो. पण, आपल्या विरोधी ‘नेता’, निवृत्त ‘बाबू’ आणि वातानूकुलित घरात खुर्चीवर बसून, टेलिव्हिजनवर, स्वतःला ‘नेपोलियन, रोमेल आणि चाणक्य’ समजण्याचे आव आण-ण्याऱ्यांची सतत टीका ऐकून मला आपल्या सैनिकांनी खरे काय साधले हे स्पष्टपणे सांगावेसे वाटते ! 
भाग्य, युध्दकौशल्य, शौर्य आणि शत्रुच्या बेताची जाणिव (enemy intelligence), ह्या सगळ्याच्या समन्वयामुळे तालिबानने जशी कराची विमानतळाची दुर्दशा केली होती त्याची पुनरावृत्ती टळली.
एकदातरी, तीव्र टीका त्यागून, एकजूट होऊन, जे आपण बरोबर केलं त्याचा गौरव करूया. ज्या सुधारणा करायच्या आहेत तिथे कटाक्षाने पाहून आणि कुशलतेने पुनरावलोकन करून अपल्या सुरक्षा प्रणालीला अजून सुदृढ करूया. आपल्या शूरवीरांनी भारतासाठी प्राणाहुती दिली, त्यांच्या त्यागात कमीपणा काढण्याऐवजी, त्यांची वंदना करून सलामी देवूया. या अतिरेकी हल्ल्यानंतरचा, उहापोह, टेहालणी आणि टीका पठाणकोटच्या वायुसेना बेस प्रकरणाची केली जात आहे, ती मला एकदम अमान्य आहे. 
तटस्थपणे विश्लेशण केलं तर ‘अतिशय विफलता’ आपल्या हाती आली हा विचित्र आणि विद्रुप दृष्टीकोण झाला. जर खरच अतिरेक्यांनी काही विमाने विद्धस्त केली असती, (एका मिग २१म, ची किंमत रु.१५ कोटी ; मी३५ आक्रमक हेलिकॉप्टर ची त्यापेक्षा पुष्कळ जास्त), रेडार, एयर ट्रफिक कन्ट्रोल tower; तिथले ATF(Aviation Turbine Fuel), पेट्रोल, डिझेल, रॉकेट्स, बॉम्ब, अन्य गोळा बारूद उडवले असते तर पठाणकोट छावणीच नाही, पण शहराची पूर्ण दोन लाख वस्तीचे भारी नुकसान झाले असते. याठिकाणाहून कालूचक, जम्मू जिल्हा, ७५ किलोमीटर दूर आहे. तिथे १९७६च्या आर्मी अम्यूनीशन डीपोला जेव्हा आग लागली होती, गोलाबारुद सतत ४ दिवस डेटोनेट होत होता. आपल्याला स्मरण होईल की १९७१ युद्धात आपल्या मिसाईल बोटानी कियामारी, कराची तेल रीफाइनरी वर हल्ला केला होता, तेंव्हा सतत कित्येक दिवस आग पेटत होती.  
पठाणकोटमध्ये असे काही घडले नाही, कारण, आपल्या चुका वगळून अतिरेकी काही विशेष नुकसान नाही करू शकले. हो, त्यांनी आपल्या सात शूरवीर सैनिकांची प्राणहानी केली. पण, ते सैनिक भारत देशाकरता लढत सद्गती पावले ! हो, सहा अतिरेक्यांच्या ऐवज, आपण सात सपूत गमावले ( एक गरुड कमांडो; एक लेफ्टनंट कर्नल, आणि पाच सुरक्षा कोर (DSC) कर्मी); आणि ८ वायू सेना व १३ NSG कर्मी जखमी झाले. ही किंमत फार जास्त आहे हे मान्य. पण ह्या त्यांच्या अप्रतीम त्यागामुळे वर दिलेले भयन्कर नुकसान टळले. जर त्या अतिरेक्यांनी पठाणकोट वायुसेना स्थळात किमान ३,००० रहिवाशी लोकातून काही मुलांना व स्त्रियांना बंदी केले असते किंवा त्यांना मारले असते तर? 
कमीपणा काढणारे आणि टीका करणारे, ह्या सराह्नीय Strategic उप्ल्भ्दीचा दुर्लक्ष करून Tactical स्तराच्या चुकांवर आरडा, ओरडा करत आहेत. हे सगळे त्यांचे सुरक्षा क्षेत्राचे अज्ञान आणि आपल्या हुतात्म्यांच्या त्यागची अवहेलना दर्शविते. 
 
पठाणकोट वायुसेना बेस... 
 या पूर्ण बेसच्या भोवती ११ फूट उंच भिंत आहे, त्यावर barbed wire concertina fencing पण आहे. त्याशिवाय ह्या सीमेवर रात्री security lights  आहेत. ह्या Base च्या चरी बाजू वस्ती आहे.
पश्चिमेकडे ३० किलोमीटर दूर पाकिस्तानची सरहद आहे आणि जम्मू राष्ट्रीय मार्ग १अ, ह्या बेसच्या कडेला लागून उत्तर पश्चिम ते दक्षिण पूर्व दिशेकडे जाते. हवाईपट्टी, ह्या १४४० एकर क्षेत्रफळ बेसच्या मध्यभागी आहे.  सारी टेक्नीकल व रखरखाव करता लागण्याऱ्या इमारती हिच्या जवळपास आहेत. रावी नदीची एक कालवा(canal) ह्या बेसच्यामधून वाहतो. बेसच्या भिंती खालून लोखंडी grills मधून हे पाणी वाहते. 
 
अतिरेकी आत शिरले कसे?  
पहिला अतिरेकी गट (२ अतिरेकी) या नहरच्या उत्तर पश्चिम दिशे कडून आत शिरला, आणि दुसरा (४ अतिरेकी) पश्चिमे कडून; अशी आता समजूत आहे. पहिला गट आपल्या पाकिस्तानी अतिरेकी उच्च कमांड आणि कुटुंबियांचा संपर्क मोबाईल आणि साटेलाईट फोन मार्फत साधत होता आणि उंच गवतामध्ये लपून दुसऱ्या गटाची वाट बघत होता. पहिल्या गटाकडे दारुगोळा, IED’s, booby traps, assorted grenades satellite GPS-aided cell phones होते. ४ अतिरेकींचा गट सरहद पार करून टॅक्सीने आला, टॅक्सी चालकचा खून करून, पोलीस सुपरइनटेन्डेंट सलविन्दर सिंगची गाडी बळकावून तिच्या निळ्या बत्तीमुळे बेसच्या १ किलोमीटर परिसरापर्यंत पोहचला. सलविन्दर सिंग आणि त्याच्या साथीदारांना, आधीच त्यांनी बाहेर टाकले होते. हा गट ०१ जानेवारी २०१६ ला पहाटे अंधार असलेल्या बेसच्या भिंतीच्या खालून, नायलोन दोरचा उंच युक्लेपटस झाडाच्या फांदीस कसून, आत शिरला. हे दोन्ही गट एकजूट नाही होऊ शकले ही आपली एक मोठी उपलब्धी होती. 
 
०२ जानेवारी ते प्रकरण संपेपर्यंत...
त्यांना पाकिस्तानी अतिरेकी उच्च कमांड चा ०२ जानेवारी, ०३३० वाजता, आक्रमण सुरु करण्याचा हुकूम मिळाला. ४ अतिरेकींच्या गटांनी, ५४६ DSC प्लाटूनच्या, लंगर (जेवण बनवायच्या आणि खानावळ स्थानी) वर हल्ला बोलला. तिथे पाच DSC गार्ड मृत्युमुखी पडले. पण इथे, शिपाई जगदीश चंद ची अप्रतीम शौर्य गाथा वाखाणण्याजोगी आहे. तो निहत्ता होता, पण निर्भीडपणे एका अतिरेक्याला, धावत जात, त्याची कालाश्निकोव हिसकावून, त्याला ठार मारले, पण तोपर्यन्त त्याला स्वतःला इतक्या गोळ्या लागल्या होत्या, की तो सद्गती पावला.
त्याच्या ह्या बलिदान ला मान देऊन, २६ जानेवारी, गणतंत्र समारोह वेळी, त्याला देशाने कीर्ती चक्र प्रदान केले. हे घोषित युध्द स्थिती नसताना, देशाचे अशोक चक्र च्या नंतर येते, म्हणजे, युध्द कालीन महा वीर चक्र च्या स्तराच्या मानाचा हकदार ठरतो. नंतर ते तीन अतिरेकी ४०० मीटर पुढे सरकले वायू स्थळ च्या मार्मिक टेक्निकल आगारा कडे. तिथे वायू सेनेच्या शूरवीर गरुड, कार्पोरल गुरसेवक सिंग नी लढा दिला, आणि गोळीबार चे प्रत्युत्तर व लढत देत प्राणाहुती दिली.
०२ जानेवारी काळोख होई पर्यन्त ४ अतिरेकींचा अंत झाला होता. पण आपले सहा वीर, होनोरेरी कॅप्टन,सुभेदार फतेह सिंग, कॉमनवेल्थ रजतपदक विजेते (राइफल निशानेबाजित) सगट, सद्गति पावले.
०३ जानेवारी सकाळी, दोन उरलेले अतिरेकी गोळीबार करू लागले. ते ज्या बिल्डिंग मधे घुसले होते त्यात वरच्या मजल्या वर आपले पाच वैमानिक अडकले होते. नशिबाने, त्यांनी आपल्या वरच्या मजल्या ला जाणारी माडी समान, जमवून आपल्याला सुरक्षित केले होते. आधी त्यांना वाचवणे अतिआवश्यक होते. ते आपल्या NSG च्या कमान्डो तुकडी ने अत्यंत बहादुरी आणि चतुराई ने केले. मग त्यांनी उरलेल्या दोन अतिरेक्यां ना आटोक्यात घ्यायचं ठरवलं. तेवढ्यात एक विदेशी पायलट जो शिकायला ह्या बेसवर होता, घाबरुन पळत असताना, अतिरेकी आणि कमान्डो चकमक मधे आला. त्याला पण अत्यंत शिताफीने कमांडो नी वाचवले. मग पूर्ण आक्रमण केले, त्या दोन उरलेल्या अतिरेक्यान वर. शेवटी, गोळ्या संप्ल्यावर, अतिरेकी एका जाड लाकडी कपाटात शिरले होते. जेव्हा त्या तळमजल्यावर रॉकेट लौन्चर नी आक्रमण केले गेले, ते अतिरेकी इतके जळून गेले की त्यांचे DNA प्रमाण सुद्धा नाही मिळवता आले.
 
लेफ्टनंट कर्नल इ. के. निरंजन, CO, NSG Bomb Disposal Unit, (BDU) चा अपूर्व त्याग...
सुमारे दुपार ०३ जानेवारी, ११ जम्मू आणि काश्मीर राईफल्स नी, ४ अतिरेकींच्या गटाचे दोघाना जमीनदोस्त केले होते. त्यांचे शव जिथे पडले होते त्याजागेवर, protective gear घालून जाणे अशक्य होते, म्हणून कर्नल निरंजन त्याशिवाय गेले, आणि स्वतः त्यांच्या शवावर booby traps ची पाहणी करायला लागले. पहिल्या शवचे निरीक्षण आणि  booby traps नसल्याची खात्री करून, त्याला पुढची कारवाईची परवानगी दिली. दुसऱ्या शवच्या कोटच्या झिप वर booby trap, अगदी पेरीस अतिरेकी प्रकरण सारखे, होता, आणि त्याला हलवताच तो booby trap फुटण्या जोगी झाला. ते कळताच, कर्नल निरंजन, जोरात आपल्या BDU च्या साथीदारा ना ओरडून सावध केले आणि पळून आपला बचाव करण्याचा आदेश देत, स्वतः ला त्या शवा वर झोकून आपल्या शरीराचा दुसऱ्यांच्या करता कवच केला. तो booby trap जेव्हां फुटला तर कर्नल निरंजन जबर जख्मी झाले, पण त्यांच्या त्याग मुळे, आणि सगळ्या  जूनियर सैनिकांत फ़्क़्त ५ जखमी झाले. त्यांनी परत सेनेचे ब्रम्हवाक्य , “तुम्च्या देशाचं संरक्षण, प्रतिष्ठा आणि कल्याण, याला सतत आणि प्रत्येक वेळा अग्रक्रम आहे; त्यानंतर, तुमच्या नेतृत्वाखाली जें जवान आहेत त्यांची प्रतिष्ठा, कल्याण आणि सुख सोयी, यांना महत्व आहे; तुमच्या स्वतः च्या सोयी, सुरक्षा आणि सुख सतत आणि प्रत्येक वेळा शेवटी येते.” , हे आपल्या अप्रतीम त्यागाने अजरामर केले आहे. या जख्मा मुळे त्यांनी वीरगती पावली, पण त्यांचे साथी ह्या त्यागाचे वर्णन अजून पाणावलेल्या डोळ्यांनी करत आहेत.
५वा अतिरेकी त्या दिवशी मारला गेला, आणि ६वा, ५ जानेवारी, किमान संध्याकाळी ४ वाजून १५ मिनिटांनी मृत्यू पावला. त्यांनी जागी-जागी २९ booby traps, लावले होते. आणि त्यांना निष्काम करण्यात खूप वेळ गेला. ६ अतिरेक्यात, ३ ना ११जम्मू आणि काश्मीर राईफल्स नी मारले, २ ना NSG  कमांडो व ICV BMP नी आणि १ ला DSC च्या शिपाई जगदीश चंदनी.
 
पुढे काय ?
ह्या Strategic विजय वर आपल्या शूरवीर सैनिकांना वंदन आणि मान दिलाच पाहिजे. पण जसे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर म्हणाले,  ‘gaps exist’ ज्यांच्या कडे सूक्ष्म लक्ष घालायला हवे. शत्रु बद्दल माहिती, focussed intelligence, त्या करता थर्मल इमेजर्स, बोर्डर सुरक्षा दलाची सरहद निरीक्षणांमध्ये सुधारणा, अफीम, कोकेन तस्करीवर मात, तसेच उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्थेची ताबडतोब सुधारणा केली पाहिजे, जसे की CDS (Chief of Defence Staff) ची नेमणूक करणे अत्यंत गरजेचे आहे. असे केल्याने, Inter-Service co-ordination वाढेल, सुरक्षतेसाठी लागणारी अत्यावश्यक शस्त्रे, उपकरणे लवकरात लवकर गृह मंत्रालय आणि संपक्षण मंत्रालयाने आणून संरक्षण दलाला सुपूर्द करणे, सोपे होईल.
शेवटी, अशा हल्ल्यात शूरांची आहुती होणारच, पण हे कबूल करून त्या हुतात्म्यांचा आदर करावा, त्यांच्या विधवा, आणि आप्त जणांच्या कल्याण आणि देखरेखची जबाबदारी घ्यावी आणि नुसती वायफळ टीका राजकीय फायद्यापोटी करू नये, हीच प्रार्थना .