शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

बर झाल, हरिपूर पूलाला विरोध केला....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 00:06 IST

सांगली ते हरिपूर आणि शिरोळ तालुक्यात कोथळीला जाण्यासाठी नवा सहाशे कोटींचा पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. हरिपूरच्या नागरिकांनी याला विरोध करायला सुरुवात केली आहे. वास्तविक या पुलाचा प्रस्ताव २०१९ मध्ये आलेल्या महापुराच्या अगोदरचा आहे. महापुराने हरिपूरच्या लोकांना जागे करून टाकले आहे. हा पूल झाल्यावर त्यावर जाण्यासाठी उंच अप्रोच रोड तयार करावे लागतील.

ठळक मुद्देरविवार जागर

- वसंत भोसलेमहाबळेश्वरला उगम पावणारी कृष्णा आणि सातारा-सांगली-रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवर पाथरपूंजला उगम पावणारी वारणा! या दोन्ही नद्यांचा संगम सांगली शहराच्या पश्चिमेस ऐतिहासिक हरिपूर गावाला होतो. या दोन्ही नद्यांवर मोठमोठी धरणे आहेत. शिवाय कोयना धरणाचा शिव जलाशय मदतीला धावून येतो. परिणामी, कृष्णा-वारणेचा संगम कधी कोरडाच पडत नाही. बारमाही पाणी वाहत असते. कोयना धरणाचे पाणी कृष्णेला कºहाडमधील प्रीतीसंगमावर मिळते आणि सांगलीच्या बंधाऱ्यापर्यंत त्याची जबाबदारी राहते की, कृष्णाकाठावरील सर्वांची तृष्णा त्यांनी भागवायची. सांगलीच्या बंधाºयानंतर दीडएक किलोमीटरवर हरिपूरला वारणा पश्चिमेकडून येतेच. चांदोलीजवळ उभारण्यात आलेल्या ११०० कोटी रुपयांच्या मातीच्या धरणातील वसंत जलाशयाचे पाणी येते. पुढे सर्वांना वारणेचे पाणी मिळत राहते. वारणेच्या उगमापासून कृष्णेला मिळेपर्यंत एका बाजूला दक्षिणेला कोल्हापूर जिल्हा आणि उत्तरेला सांगली जिल्हा आहे. पूर्वी तो दक्षिण सातारा जिल्हा होता. सातारा आणि कोल्हापूरच्या संस्थानिकांमध्ये तह झाला तेव्हा वारणा नदी ही सीमा मानली गेली होती. त्यामुळे त्याला वारणेचा तह (करार) म्हटले जायचे!

कृष्णा खोºयातील अनेक नद्यांच्या पाण्याची पातळी सह्याद्री पर्वतरांगांमध्ये होणाºया पावसाने कधी वाढेल याचा नेम नसतो. धरणांच्या आधारे महापुराचा धोका कमी झाला असला तरी अतिवृष्टी झाली की महापूर येतोच. २००५ आणि २०१९ मध्ये हा अनुभव कृष्णा खोºयातील प्रत्येक सजीव प्राण्याला आला, वनस्पतींना आला तसा तो माणसांना तडाखा देऊन गेला. प्रत्येकवेळी माणूस तरला पाहिजे, तो जगला पाहिजे, तो बुडता कामा नये, तो वाहून जाता कामा नये, अशा उपाययोजना करून महापुराचे आठ-दहा दिवस पार पाडले जातात. अतिवृष्टी ही मूळ समस्या असल्याने आपण या महापुराला काहीच करू शकत नाही, ही एक मानसिक धारणा झाली आहे. तशी परिस्थिती खºया अर्थाने यावर्षीच उद्भवली होती. सरासरी साडेचार हजार मिलीमीटरऐवजी साडेआठ हजार मिलीमीटर पाऊस सह्याद्री पर्वतरांगांमध्ये झाला. तसाच पाऊस पठारावरही झाला. परिणामी, कृष्णेसह सर्व नद्यांना मोठा महापूर आला. सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी शहरांसह असंख्य गावांत महापुराचे पाणी शिरले. याला नद्यांच्या काठावर झालेले बदल महत्त्वाचे होते.

अनेक ठिकाणी अडवणूक करणारे बांध घालण्यात आले आहेत. अनेक महामार्ग करताना नद्यांच्या पाण्याला वाट काढून देण्याचा मार्ग ठेवलेला नाही. कोल्हापूर व सांगली शहरांची ही अडचण ठरली आहे. कोल्हापूर शहराच्या बाहेरून जाणारा पुणे-बंगलोर महामार्ग असा बांधला गेला आहे की, पंचगंगा नदीला आलेला पूर किंवा पुराचे पाणी पुढे कसे सरकणार, याचा विचारच केलेला नाही. याचा मोठा दणका यावर्षी बसला. सांगली फाटा ते कोल्हापूर शहरात जाणाºया रस्त्यापर्यंत उंच रस्ता तयार करण्यात आला आहे. तो बांधच ठरला आहे. त्या रस्त्याने पाणी अडविलेच शिवाय मागे फुगवटा येऊन कोल्हापूर शहराचा मोठा भाग बुडाला.

या परिसरात असंख्य बांधकामे झाली आहेत. काही शेकडो कोटींची बांधकामे चालू आहेत. ती अर्धवट आहेत. विकत घेतलेले व्यवहार रद्द करण्याचा विचार करीत आहेत, तर नवे ग्राहक यायला तयार नाहीत. महापालिकेने कोणताही विचार न करता सर्वच बांधकामांना स्थगिती दिली आहे. या व्यवसायातील लोक दिवाळखोर होण्याची वेळ आली आहे. आता जलसंपदा विभाग महापुराचा धोका असणारा भाग निश्चित करीत नाही, तोवर महापालिका परवाने देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

सांगलीतदेखील अशीच अवस्था आहे. कृष्णा नदी उत्तरेकडून दक्षिणेस वाहत जाते. या नदीवर नुकताच नव्वदावा वाढदिवस साजरा केलेला आयर्विन ब्रीज आहे. नव्वद वर्षांत या ब्रीजवर पाणी आले नाही; पण अप्रोच रोडवर पाणी आल्याने ब्रीजचा वापर महापुरात करता येत नाही. शेजारीच बाह्यमार्ग तयार केला आहे. त्या रस्त्यावर नवा पूल बांधण्यात आला आहे. आता हरिपूरजवळ जेथे वारणा-कृष्णेला मिळते तेथे नवा पूल बांधून कोल्हापूर जिल्ह्याला जवळ करण्याचा घाट घालण्यात आला आहे. वास्तविक आयर्विन ब्रीजला पर्यायी पूल बांधला तो मोठा असायला हवा होता. तो दुहेरी मार्गाचा आहे. त्यावर फूटपाथही नाही. ब्रिटिशकालीन बांधलेल्या आयर्विन ब्रीजवर उत्तम फूटपाथ आहेत. सुंदर चाळी आहेत. कलाकुसरीचा सुंदर ब्रीज आहे. अलीकडे महापालिकेने त्यावर विद्युतरोषणाई केली आहे. वसंतदादा पाटील स्मारकावरून हा देखावा सुंदर दिसतो.

सांगली ते हरिपूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कोथळीला जाण्यासाठी नवीन सहाशे कोटींचा पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. हरिपूरच्या नागरिकांनी याला आता विरोध करायला सुरुवात केली आहे. वास्तविक या पुलाचा प्रस्ताव आॅगस्ट २०१९ मध्ये आलेल्या महापुराच्या अगोदरचा आहे. महापुराने हरिपूरच्या लोकांना जागे करून टाकले आहे. हा पूल झाल्यावर त्यावर जाण्यासाठी उंच अप्रोच रोड तयार करावे लागतील. त्या अप्रोच रोडला अडलेले पाणी थेट हरिपूर गावातच शिरू शकते. भिलवडीजवळ औदुंबरकडून येणारी कृष्णा नदी पश्चिमेकडे वळण घेते. तेथे नदीच्या पात्राबाहेर पाणी पडताच भिलवडी गावच्या पूर्वेला शिरते आणि भिलवडीला बेटाचे स्वरूप येते.

२००५ मध्ये संपूर्ण गाव पाच गल्ल्यांत जमून जीव मुठीत धरून बसले होते. गावचे बेट तयार झाले होते. हा धोका हरिपूर गावाला निर्माण होऊ शकतो. सांगलीकडून पुढे जाणारी कृष्णा नदी पश्चिमेकडे वळून पुन्हा वारणा नदीला घेऊन पूर्वेकडे वळते. तेथे जयसिंगपूरकडे जोडणारा ब्रीज आहे. तोदेखील नव्वद वर्षांचा आहे. मोठा आहे. आजवर तो बुडालेला नाही. त्याला पर्यायी नवा पूल बांधला आहे. जुना ब्रीज मजबूत करून त्याचे रुंदीकरणही केले आहे. हा योग्य मार्ग आहे. या चार पुलांशिवाय पाचवा पूल केवळ आठ-दहा किलोमीटरमध्ये बांधण्याची गरज आहे का? जयसिंगपूरला ये-जा करणारे दोन पूल, इस्लामपूरकडून पुण्याला जाण्यासाठी दोन पूल आहेत. यात पाचवा पूल म्हणजे सांगली शहर आणि हरिपूर गावावर संकट ओढवून घेण्याचा मार्ग ठरणार आहे.

सांगली शहरही आताच पर्यावरणीयदृष्ट्या धोकादायक अवस्थेत आहे. कारण या शहरातील पाणी वाहून घेऊन जाणारे नाले बुजविण्यात आले आहेत. पावसाचे पडणारे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग राहिलेले नाहीत. केवळ तासभर पाऊस पडला तर सांगली शहराचा मारुती चौक, टिळक चौक, राजवाडा चौक पाण्यात जातो. ते पाणी बाहेर पडण्यास सहा-सहा तास लागतात ही अवस्था आहे. ज्या भागात गुंठेवारीवर घरे झाली आहेत ती चिखलातच असतात. या शहरावर कधीही अतिवृष्टीचे संकट कोसळू शकते. तशात शहराला वळसा घालून जाणाºया नदीवर पुलांचे जाळे तयार केले, तर पाणी अडविणारी ती यंत्रेच ठरतील. परिणाम एकच होईल. सांगली शहर पन्नास टक्के पाण्याखाली गेले होते. पुढे ते पूर्णपणे जाऊन कदाचित कृष्णा नदीच शहरात शिरू शकते. हा धोका वेळीच ओळखून सांगली शहराची पर्यावरणीय रचना सांभाळण्याचे नियोजन करण्याची गरज आहे.

हीच स्थिती कोल्हापूरची आहे. पंचगंगा नदी लांबून का असेना वळसा घालूनच जाते. या नदीचे पाणी जितके वेगाने पुढे जाईल त्यासाठी मार्ग काढून देण्यात येईल तेवढे कोल्हापूर वाचणार आहे. नदीच्या बाजूनेच बांधकामे करण्याचा आग्रह धरून शहर वाढते आहे. कोल्हापूर महापालिकेने एक ऐतिहासिक चूक करून लोकांच्या मनात भीती घालून दिली आहे. १९७२ मध्ये स्थापन झालेल्या महापालिकेने वीस वर्षांनी १९९२मध्ये शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव तयार केला. त्यामध्ये ४२ गावांचा समावेश केला. पंचगंगा नदीही पोटात घेऊन टाकली. त्यावरून रस्ते तयार होणार होते काय? कळत नाही. पंचगंगा नदीच्या पश्चिमेकडील वडणगेसारखी गावेही शहराच्या हद्दीत धरली.

कोल्हापूरपासून सतरा किलोमीटरवरील गावेही शहराच्या हद्दीत घेतली. या ४२ गावांची सुपीक जमीन नागरिकीकरणात हडप केली जाणार, हा किती गावकऱ्यांच्या पोटात गोळा आणून बसून राहिला आहे. तो जाण्यासच तयार नाही. वास्तविक कळंबा, मोरेवाडी, आर.के.नगर, पाचगाव, उजळाईवाडी, सरनोबतवाडी आणि उचगाव एवढीच गावे शहराच्या हद्दीत घ्यायला हवीत. शहराची हद्द कोठे संपते आणि गावांची कोठे सुरू होते हे समजतच नाही. एवढी ही गावे वाढत शहराला बिलगली आहेत. तेवढीच शहरात घ्यायला हवीत. पंचगंगा नदीच्या पलीकडे जाताच कामा नये. कोल्हापूर शहराच्या दक्षिण व पूर्वेकडे शहर वाढले पाहिजे. यासाठी नियोजन व्हायला हवे.

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा पहिला प्रस्ताव तयार करणा-यांनी हे पाप केले आहे. त्यातून गुंता

यातून महापुराची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा फेरनियोजन करण्याची गरज आहे. सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील नद्यांकाठच्या गावांच्या नियोजनाची गरज आहे. सांगली, कºहाड, इचलकरंजी आणि कोल्हापूर आदी शहरांचीही फेरआखणी करण्याची गरज आहे. त्याचवेळी सांडपाणी, घनकचरा, वाहतूक आदी समस्याही वाढल्या आहेत. हरिपूरला पूल नको, ही गावकऱ्यांनी घेतलेली भूमिका योग्य आणि दिशादर्शक ठरणार आहे. यासाठी त्यांचे स्वागतच करायला हवे!सोनवडे घाटासाठी पैशाचा अपव्यय!सह्यादी पर्वतरांगांनी घाटावरील व खालील असे महाराष्ट्राचे भौगोलिक विभाजन केले आहे. पालघर ते बांदापर्यंत कोकण किनारपट्टी आहे. घाटावर नाशिक ते कोल्हापूरसह सहा जिल्हे आहेत. कोकणात जाण्यासाठी या जिल्ह्यांतून सोळा घाट रस्ते आहेत. त्यापैकी सात घाट रस्ते कोल्हापूर या एकाच जिल्ह्यात आहेत. आंबा, अणुस्कुरा, भुईबावडा, गगनबावडा, फोंडा, आंबोली व तिलारी यांचा यात समावेश आहे. इतके घाट रस्ते असताना गारगोटीमार्गे सोनवडेतून जाणारा आणखी एक घाट रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हरिपूरला जशी कृष्णा नदीवर पुलाची गरज नाही, तशीच सोनवडे घाटाची गरज नाही.

या घाटासाठी आता तरी ५०० कोटींचा प्रस्ताव आहे. त्याचा सुधारित प्रस्ताव येईल व एक हजार कोटींपर्यंत खर्च वाढेल, शिवाय हा घाट रस्ता संवेदनशील अशा जंगलातून जातो आहे. त्यामध्ये दीड कि.मी.चा ओव्हर ब्रीज बांधला जाणार आहे. या ठिकाणाहून वन्यप्राण्यांचा संचार आहे. अशा जैविकदृष्ट्या संवेदनशील परिसरातून हा घाट रस्ता बांधण्याचा अट्टाहास कशासाठी आहे, हे समजत नाही. हा रस्ता झाला तर विकास होतो, असाही शोध लावण्यात आला आहे. आजरा व चंदगड किंवा शाहूवाडी, गगनबावड्याचा विकास शिरोळ किंवा हातकणंगले तालुक्याहून अधिक व्हायला हवा होता.

टॅग्स :riverनदीSangliसांगली