शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

त्यासाठी संघालाच बदलावे लागेल

By admin | Updated: February 17, 2015 23:17 IST

भारतात हिंदूंची संख्या ८८ टक्क्यांएवढी असून, त्या साऱ्यांना संघटित करणे हे संघाचे ध्येय असल्याचे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे

भारतात हिंदूंची संख्या ८८ टक्क्यांएवढी असून, त्या साऱ्यांना संघटित करणे हे संघाचे ध्येय असल्याचे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. खरे तर गेली नऊ दशके संघाने एवढेच एक काम केले आहे आणि तरीही त्या समाजाला संघटित करण्यात त्याच्या पदरी अपयश आले आहे. हा समाज नुसता जातीपंथातच विभागला नाही तर राजकीय पक्षात व विचारसरणीतही त्याचे विभाजन झाले आहे. काँग्रेस, भाजपा, कम्युनिस्ट, समाजवादी, बहुजन समाजवादी इथपासून तर थेट लहानसहान स्थानिक पक्षांत तो विभागला गेला आहे. १९६७पर्यंत या साऱ्यांत काँग्रेस पक्षाला असलेला हिंदूंचा पाठिंबा सर्वाधिक मोठा होता. संघाची स्थापना १९२५ची असली तरी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेला जनतेचा मोठा वर्ग काँग्रेसच्या म्हणजे म. गांधींच्या मागे होता. १९६७पर्यंत संघाला व हिंदुत्वाला मानणाऱ्या पक्षाला देशात कधी साडेसहा टक्क्यांवर मते मिळाली नाहीत. नरहर कुरुंदकरांसारखा ज्येष्ठ विचारवंत काँग्रेस हीच देशातली हिंदूंची सर्वात मोठी संघटना आहे असे म्हणायचा. वर तुम्ही तसे समजणार नसाल तर बहुजन समाजाला तुम्ही हिंदू मानत नाही असे म्हणावे लागेल असेही बजावायचा. ज्या डॉ. लोहियांचे वचन भागवतांनी आपल्या भाषणात उद्घृत केले ते लोहिया संघाला ‘हिंदू विरोधी, पाकिस्तान समर्थक व फॅसिस्ट’ संघटना म्हणायचे. शिवाय माणसे काँग्रेस वा कम्युनिस्ट पक्षात असली की हिंदू राहत नाहीत आणि संघात आली म्हणजेच ती हिंदू होतात असाही हा प्रश्न नाही. नाहीतर परवापर्यंत काँग्रेसमध्ये असलेले सगळे ‘अहिंदू’ २०१४च्या निवडणुकीत भाजपात आले म्हणूनच हिंदू झाले असेच म्हणावे लागेल. हिंदूंचे संघटन अशक्य नाही. २०१४च्या निवडणुकीत भाजपाला ३० टक्के मते मिळाली तेव्हा त्याच्या शक्यताही उघड झाल्या. या स्थितीत सगळ्या हिंदूंचे संघटन करण्याचे आपले स्वप्न संघाला पूर्ण करायचे असेल तर त्याने स्वत:ला केवळ सामाजिक व सांस्कृतिक संघटनच राखले पाहिजे. आम्ही राजकारणात राहू, भाजपाच्या वतीने निवडणुकीत भाग घेऊ, इतर पक्षांवर (तेही हिंदू असताना) टीका करू आणि हिंदूंचे राष्ट्रीय संघटन करू असे ते म्हणत असतील तर त्यातील दुबळेपणाच नव्हे तर खोटेपणाही उघड आहे. हिंदुत्वाची सर्टिफिकिटे देण्याचा अधिकार संघाला कुणी दिला नाही. ममता बॅनर्जी संघाला मानत नाहीत आणि करुणानिधीही त्याला जुमानत नाहीत. म्हणून ते हिंदू नाहीत असे संघ म्हणणार आहे काय? आणि ‘ईश्वर-अल्ला’ अशी आळवणी करून साऱ्या देशवासीयांना कवेत घेऊ पाहणाऱ्या म. गांधींचे हिंदुत्व ते नाकारणार आहेत काय? लोकशाहीत निवडणुका होतात. त्यात पक्षोपक्ष आपापल्या सामर्थ्यानुसार जागा लढवितात. एखादा पक्ष सत्तेत येतो बाकीचे विरोधात बसतात. परवाच्या निवडणुकीत भाजपाच्या मोदींचे संघाला मानणारे सरकार सत्तेवर आले म्हणून ते हिंदूंचे झाले आणि विरोधी बाकावर बसणारे सगळे अहिंदू झाले असे होत नाही. इंग्लंडमध्ये सरकार पक्षातले जसे सगळे प्रोटेस्टंट असतात तर विरोधी बाकावरचेही सारे प्रोटेस्टंटच असतात. बराक ओबामा ख्रिश्चन असतात आणि त्यांचे विरोधकही त्याच धर्माचे असतात. पक्ष आणि धर्म किंवा राजकारण आणि धर्म यांच्यातला संबंध फक्त मागे राहिलेल्या देशातच गृहीत धरला जातो व तो निवडणुकांत वापरला जातो. हिंदू धर्मात जात अजून मजबूत राहिली आहे. त्यातल्या एकेका जातीचे पक्ष देशात आहेत. विश्वनाथ प्रताप सिंगांनी मंडल आयोग आणल्यापासून अशा पक्षांची संख्या वाढलीही आहे. त्यांची अवस्था ही की पक्ष टिकवायचा तर त्यांना जात टिकवावी लागते आणि जात टिकवायची तर राष्ट्रीयता सोडावी लागते. (आपल्या शरद पवारांच्या राजकारणाचे जे भजे झालेले आपण पाहतो त्याचेही महत्त्वाचे कारण हेच आहे) जात धरून राष्ट्रीय होता येत नाही तसे धर्म धरून राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय होता येत नाही. भारताने सेक्युलॅरिझमचे तत्त्व स्वीकारण्यामागे त्याचे सर्वसमावेशक स्वरूप कायम राखणे हाही एक हेतू त्याचमुळे राहिला आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’ ही वैदिकांची प्रार्थना आहे. तिथपर्यंत पोहोचायचे तर संघाला भाजपाशीच नव्हे तर सगळ्या राजकारणाशी आपले संबंध तोडावे लागणार आहेत आणि त्याही पुढे जाऊन कोणत्याही पक्षाचे राजकारण न करण्याची व केवळ सामाजिक आणि सांस्कृतिक भूमिका घेण्याची तयारी करावी लागेल. एकारलेल्या संघटनांभोवती कुंपणे असतात. त्यातली माणसे मग बाहेर जात नाहीत आणि बाहेरची माणसेही त्यात येत नाहीत. भाजपाचे दार खुले असल्याने व त्याने आपल्या सभासदत्वाची दुकाने गल्लोगल्ली उघडल्याने त्यात जास्तीची माणसे आली. तसे संघाचे झाले नाही. त्याच्या शाखा बेटांसारख्या मुख्य समाजापासून दूर राहिल्या. झालेच तर त्यातील अनेकींना वृद्धाश्रमांचीही कळा आली. नवी माणसे येत नाहीत, दुसरे विचार चालत नाहीत, आम्ही सांगू तेच खरे आणि इतरांचे सारे तुच्छ अशी मानसिकता एकांगीपण वाढविते व ती संघटनेत बहुविधता येऊ देत नाही. भारत मात्र भाषाबहुल, धर्मबहुल, संस्कृतीबहुल आणि पक्षबहुल लोकांचा देश आहे. तरीही भागवतांना शुभेच्छा. त्यांचे स्वप्न पूर्ण व्हावे मात्र त्यासाठी त्यांना त्यांची संघटना राजकारणापासून अलिप्त राखण्याचे बळ प्राप्त व्हावे.