शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

पाण्याचं गुप्तधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2016 04:13 IST

भीमा खोऱ्यातील पाण्यावर मराठवाड्याचा हक्क आहे.

भीमा खोऱ्यातील पाण्यावर मराठवाड्याचा हक्क आहे. हे आजवर कोणी सांगितले नव्हते. मुळात ही गोष्टच कोणाच्याही लक्षात आली नव्हती. म्हणतात ना ‘कान सोनाराने टोचावे लागतात.’गेल्या बुधवारी फोन वाजला; ‘प्रफुल्ल कदम बोलतोय; शनिवारी औरंगाबादला आहात का? मी येतोय. भेट होईल.’ हा फोन मला दहा वर्षांपूर्वीच्या काळात घेऊन गेला. सांगोला येथे गेलो असताना पंचविशीतला तरुण भेटला. मी गावात एक छोटा वीजनिर्मिती प्रकल्प सामुदायिक तत्त्वावर सुरू केला आहे. वेड्या बाभळीचा इंधन म्हणून वापर करून शहरातील काही घरांना वीज पुरवठा केला जातो. त्याचा प्रकल्प हा पर्याय म्हणून आजही उपयुक्त आहे. त्याचे हे पर्यायी वीज निर्मितीचे लोण बऱ्याच गावांपर्यंत म्हणजे परभणीपर्यंत पोहोचले. असा हा वेडा, ऊर्जा, पाणी पर्यावरणावर सतत बोलणारा आणि काम करणारा. पुढे तो सरकारी सल्लागार समित्यांवर गेला. काय करीत आहे हे सांगण्यासाठी संपर्कातही राहिला. प्रफुल्ल कदम औरंगाबादला आला ते मराठवाड्याचे हक्काचे पाणी दाखविण्यासाठी. तोपर्यंत या आपल्या पाण्याची कल्पनाही नव्हती. सरकार दरबारी ना नोंद ना चर्चा. पाणी नाही, टँकर कमी पडले म्हणून रेल्वेने पाणी आणले. शंभर वर्षांपूर्वी टाटा कंपनीने ब्रिटिश सरकारशी करार करीत लोणावळा परिसरात वलवट, शिरवटा, ठोकरवाडी, सोमवाडी, मुळशी ही सहा धरणे बांधली. या ठिकाणी ४४५.५ मेगावॅट क्षमतेचे जलविद्युत प्रकल्प उभे केले. मुंबई शहरातील साडेचार लाख ग्राहकांना ही वीज १०० वर्षांपासून मिळते आहे. सोमवडी ६.३४ टी.एमसी, लोणावळा ०.४१, वलवड २.५५, शिरवटा ७.१२, ठोकरवाडी ११.८९, मुळशी २६.३८ हे ४८.९७ टी.एमसी पाणी भीमा नदीच्या तुटीच्या खोऱ्यातील आहे. हा भाग महाराष्ट्रात उंचीवर असून, दुष्काळी भाग खाली, खोल आहे; हे पाणी दुष्काळी भागाकडे म्हणजे भीमेवरील उजनी धरणापर्यंत नैसर्गिकरीत्या वाहून येऊ शकते; पण टाटाने पाणी अडवून ते बोगद्यामार्गे खोपोलीत नेले आणि वीजनिर्मिती केली. हा प्रकार उलटी गंगा वाहण्यासारख्या भीमेचे पाणी कोकणात गेले. ऊर्ध्व भीमा खोरे के-५ मधील या पाण्याच्या लाभक्षेत्रात उस्मानाबाद जिल्हा आणि बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा हे तालुके येतात. याचाच अर्थ हे या पाण्यात मराठवाड्याचा वाटा आहे. सद्य परिस्थितीत कृष्णेच्या पाण्यात जो २२ टी.एमसी हक्क आहे तो वेगळा. भीमा खोऱ्यातील हे पाणी १०० वर्षांपासून कोकणात उतरविले त्याच्या हक्काचा हा प्रश्न आहे. उस्मानाबाद हा जिल्हा तर पर्जन्यछायेतील कायम दुष्काळी, तसेच शेजारचे आष्टी आणि पाटोदा हे बीड जिल्ह्यातील तालुकेही तसेच. या खोरे के-५ मध्ये लागवडीलायक क्षेत्र ८४ टक्के असून, भूपृष्ठावरील पाण्याची उपलब्धता ३४०० द.ल.घ.मी., तर गरज ३५०५ द.ल.घ.मी. असल्याने हे तुटीचे खोरे आहे. जलनीती आणि जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायद्यानुसार हे प्राधान्य म्हणून दुष्काळी भागाला आणि शेवटाकडचा भाग म्हणून मराठवाड्याला मिळायला पाहिजे.भीमेच्या खोऱ्यातील हे पाणी खोपोलीला वळविणे म्हणजे कोकणात नेणे मुळी पर्यावरण धोरणाच्या विरोधात आहे. कारण कोकणात प्रचंड पाऊस पडतो आणि ज्या भागात तूट असेल तेथे पाणी पाठवावे असे कायदा सांगतो. त्यापुढची गोष्ट म्हणजे २०१० साली सरकारने नेमलेला ब्रिजेश कुमार लवाद म्हणतो की, नदी खोऱ्यातील पाणी स्थलांतरित करता येत नाही. म्हणजे भीमेच्या खोऱ्यातील हे मराठवाड्याच्या हक्काचे पाणी आहे आणि त्यामुळे दुसऱ्या पाण्याची मागणी करणे ही अव्यवहार्य गोष्ट ठरते.मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या बैठकीत प्रफुल्ल कदमांनी ही बाब स्पष्ट केली. आपल्या हक्काचे पाणी कोठे आहे. हे पश्चिम महाराष्ट्रातील सांगोल्याचा प्रफुल्ल आपल्याला सांगण्यासाठी येथपर्यंत येतो. याअगोदर ही चर्चा कधी झाली नाही. सरकार, नोकरशाही यांनीसुद्धा कधी याचा अभ्यास केला नाही. अचानक गुप्तधनासारखे हे पाणी सापडले आहे ते आणावे लागेल आणि संघर्षही करावा लागेल.- सुधीर महाजन